अंबाडीची भाजी

साहित्य :- 
धुवून बारीक चिरलेली अंबाडी, 
पाच - सहा हिरव्या मिरचीचे तुकडे, 
गुळ २ पोफळाएवढा, 
मीठ चवीप्रमाणे, 
तिखट अर्धा चमचा, 
शिजलेला भात चुरडून एकजीव केलेला १ वाटी, १/२ वाटी तांदुळाच्या कण्या, 
पंधरा - वीस लसूण पाकळ्या सोललेल्या, 
निम्मेनिम्मे तुकडे केलेली मोहरी, 
एक डाव तेल. 
हरभरा डाळ एक डाव, २-३ चहाचे चमचे डाळीचे पीठ 
१/२ वाटी तुरीची डाळ, 
दाणे १ डाव लहान.
हळद- मोहरी प्रत्येकी एक चमचा, 

कृती :- प्रथम डाळ, दाणे भिजत टाकून कुकरला चिरलेली भाजी, डाळ, दाणे गाळून उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. 
नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. 
१ डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. 

नंतर मीठ,मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी.