साहित्य:
१/२ कप रवा
सव्वा ते दिड कप पाणी
१/२ कप कांदा बारीक चिरुन
१ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
फोडणीसाठी : १/४ टिस्पून हिंग
२-३ मिरच्या बारीक चिरुन
३-४ कढिपत्त्याची पाने
१/४ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून उडीद डाळ
चवीनुसार मीठ
१ टिस्पून साखर
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टिस्पून लिंबूरस
कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात हिंग, आले, उडीद
डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कांदा, कढिपत्ता, मिरच्या, व्यंजन म्हणून बटाटे घालून फोडणी
करावी. चिरलेला परतून घ्यावा.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत
ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे.
५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.