19 जून २०२४ लोकसत्तातील बातमी:
लातूर : परिस्थिती बेताची असल्याने सीबीएसई शाळेत आपल्या मुलीला प्रवेश देता येणे शक्य नसल्याने आईने मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावात घडली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (वय २६) व समीक्षा व्यंकट हालसे (वय ५ रा. माळेगाव ता. निलंगा) अशी दोघींची नावे आहेत.
व्यंकट हातसे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समीक्षा असे सदस्य. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र शेती आई-वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजीविका करीत असल्याने हातसे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. हालसे यांच्या पत्नीची आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश द्यावा, अशी इच्छा होती. मात्र, पती काही न बोलता, बघूया असे सांगत होता. आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मंगळवारी भाग्यश्री हालसे हिने समीक्षासह एका विहिरीत उडी टाकली. मुलगा समर्थ हा खेळत होता. आईने त्याला बोलावूनही तो गेला नाही म्हणून तो वाचला.
