वैद्य शैलेश नाडकर्णी
गरम / कोमट पाणी प्या
नको त्या वेळी खाऊ नका
कधीही, मिळेल ते खाणे योग्य नाही.
पदार्थ कसा बनवला जातो ते पाहून मग खावा.
आंबट, गोड, खारट, कडू, तिखट, तुरट या सहा रसांना आपल्या जेवणात महत्त्व आहे. करांदेसारखे तुरट पदार्थ जेवणातून हद्दपार झाले आहेत. लिंबू, कोकम, डाळिंबाचे दाणे आंबट पदार्थ खावेत.
शेंगदाणे वातूळ असतात कमी खा.
डेंग्यु झाल्यास तांदळाऐवजी गहू / नाचणी खावी.
फळे रात्री/ दुधाबरोबर खाऊ नयेत. रात्री पाणी पिउ नये.
पचवायची तेवढी ताकद असेल तरच मोड आलेले कडधान्य खा. भाजून भिजवल्यास कडधान्य फुगतील पण त्याला मोड येणार नाहीत.
तारुण्यात शरीर सांभाळून घेते पण वय वाढल्यावर केवळ आवडते म्हणून काही पदार्थ खाऊ नका.
वैद्य अश्विन सावंत
रोजच्या जेवणात चटणी असायला हवी. सुके खोबरे, शेगदाणे, मेथी, कारळे, लसूण, आळशी हे सर्व समप्रमाणात असावे.
डॉ. राजेन्दर आगरकर
मद्यपान, धूम्रपान वाईटच, पण त्याहीपेक्षा वाईट आहेत साखर आणि मीठ. मेंदूतील रसायने बिघडवण्याचे काम ते करतात. वेफर्स आणि गोडाचे पदार्थ एकदा खाऊन माणसं थांबतच नाहीत. रोज पाच-सहा चमचे साखर ठीक पण जास्त साखर योग्य नव्हेच. जिभेला काय आवडते यापेक्षा शरीराला काय उपयोगी आहे, याचा विचार करून खा. हा पदार्थ खरंच गरजेचा आहे ना. हे विचारा. असं विचारायला लागलात की उत्तरेही आपोआप मिळतील आणि हळूहळू प्रश्न संपतील.
लवकर निजे - लवकर उठे ही आजोबांच्या काळातील जीवनशैली योग्य आहे. तीच आपल्या सगळ्या समस्यांवर उत्तर आहे. साखर, मीठ, मैदा, ताण, सोशल मिडिया यांना वेळीच रोखा. तुमचे आयुष्य खरेच सुंदर होईल.