पुदीना चटणीची रेसिपी


पुदीना चटणी:

साहित्य:
१/२ कप पुदीना पाने
१/२ कप कोथिंबीर
१/२ कप कोवळ्या लसणीची मुळे
२ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ टिस्पून जिरे
चवीपुरते काळे मीठ
१/४ टिस्पून साखर

यातील बहुतेक सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळत असल्यामुळे एकाच वेळी आणता येतात. वर दिलेल्या प्रमाणात घेऊन मिक्सरमधून काढण्याचेच काम काय ते बाकी राहते! मग झाली पुदीना चटणी तयार!

Distribution Release: SystemRescueCd 1.6.0

Distribution Release: SystemRescueCd 1.6.0: "François Dupoux has released a brand new version of SystemRescueCd, a Gentoo-based live CD featuring a number of useful utilities for data rescue and disk management tasks. The most important change is the introduction of Linux 2.6.35 as the default kernel. From the changelog: 'Re-based standard kernels on...."

उपयुक्ततावाद

... या क्रूरतेच्या मुळाशी परवलीचा शब्द आहे, उपयुक्तता. जो आजच्या काळाला त्वचेसारखा घट्ट चिकटलेला आहे. ज्याचा काहीच फायदा नाही ते अस्तित्वात असण्याची काही गरज नाही, ही भूमिका 'यूज अ‍ॅण्ड थ्रो' थिअरी मानणाऱ्यांना पटणारीच आहे. ती मांडण्यासाठी वेगवेगळे आधार घेतले जातात. जसं गुजरात सरकार धर्माचा आधार घेतंय. गाय ही हिंदूंसाठी पूज्य. तेव्हा तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बैलाला खाटिकखान्यात पाठवणं हिंदू मनाला कसं पटेल? त्यापेक्षा त्याला जन्मालाच येऊ द्यायचं नाही. पोटी मुलगा जन्माला आला तरच स्वर्ग मिळेल, मुलगी आली तर नाही, हा बागुलबुवाही धर्मशास्त्रानेच दाखवला ना?

भुवनरत्न महाराज म्हणतात, बैलांचा शेतीसाठी उपयोग होतो. त्यांच्या शेणाचा खतासाठी वापर होतो. ते बैलाची उपयुक्तता सांगतात, पण सरकारच्या नैतिकतेला प्रश्न करत नाहीत. स्त्री भ्रूण हत्येला विरोध करणारे म्हणतात, आता मुलीही पुढे गेल्या आहेत. त्या इंदिरा गांधी होतील, किरण बेदी होतील, मेधा पाटकर होतील. आपल्या आईबापाचं नाव मोठं करतील. घराण्याचं नाव उज्ज्वल करतील.

प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी वा किरण बेदी न होताही सर्वसामान्य मुलगी म्हणून जन्माला येण्याचा आणि जगण्याचा मुलीला अधिकार आहे की नाही? कुणासाठीही उपयुक्त न ठरता केवळ जगण्याचा मुक्या जनावराला हक्क आहे की नाही?

- जयंत पवार

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5928677.cms

(महाराष्ट्र टाईम्स - १४ मे - दखल)