कारळ्याची चटणी

साहित्य : कारळे १ वाटी, तीळ अर्धी वाटी, कलोंजी पाव वटी, सुके खोबरे पाव वाटी, कढीपत्ता एक वाटी, सुक्या लाल मिरच्या १० – १५, काळे मीठ साखर चवीप्रमाणे,  हिंग किंवा जिरे चवीनुसार

कृती : कारळे, दाणे, तीळ हे सर्व भाजून घ्यावे. कढईत तेल घालून कढीपत्ता, लाल मिरची, सुके खोबरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. सर्व पदार्थ मीठ व हिंग घालून वाटून घ्या.

टीप :  कारळ्याच्या चटणीप्रमाणे तीळ (पांढरे आणि काळे ) व जवस ह्याची चटणी करता येते. कारळ्याऐवजी तीळ किंवा जवस १ वाटी घ्यावे. बाकी सर्व साहित्य व कृती कारळ्याच्या चटणीप्रमाणे घ्या. जवस चटणीत पाव वाटी लसूण टाकण्यास हरकत नाही.

पुदीना चटणीची रेसिपी


पुदीना चटणी:

साहित्य:
१/२ कप पुदीना पाने
१/२ कप कोथिंबीर
१/२ कप कोवळ्या लसणीची मुळे
२ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ टिस्पून जिरे
चवीपुरते काळे मीठ
१/४ टिस्पून साखर

यातील बहुतेक सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळत असल्यामुळे एकाच वेळी आणता येतात. वर दिलेल्या प्रमाणात घेऊन मिक्सरमधून काढण्याचेच काम काय ते बाकी राहते! मग झाली पुदीना चटणी तयार!

Distribution Release: SystemRescueCd 1.6.0

Distribution Release: SystemRescueCd 1.6.0: "François Dupoux has released a brand new version of SystemRescueCd, a Gentoo-based live CD featuring a number of useful utilities for data rescue and disk management tasks. The most important change is the introduction of Linux 2.6.35 as the default kernel. From the changelog: 'Re-based standard kernels on...."