अंबाडीची भाजी

साहित्य :- 
धुवून बारीक चिरलेली अंबाडी, 
पाच - सहा हिरव्या मिरचीचे तुकडे, 
गुळ २ पोफळाएवढा, 
मीठ चवीप्रमाणे, 
तिखट अर्धा चमचा, 
शिजलेला भात चुरडून एकजीव केलेला १ वाटी, १/२ वाटी तांदुळाच्या कण्या, 
पंधरा - वीस लसूण पाकळ्या सोललेल्या, 
निम्मेनिम्मे तुकडे केलेली मोहरी, 
एक डाव तेल. 
हरभरा डाळ एक डाव, २-३ चहाचे चमचे डाळीचे पीठ 
१/२ वाटी तुरीची डाळ, 
दाणे १ डाव लहान.
हळद- मोहरी प्रत्येकी एक चमचा, 

कृती :- प्रथम डाळ, दाणे भिजत टाकून कुकरला चिरलेली भाजी, डाळ, दाणे गाळून उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. 
नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. 
१ डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. 

नंतर मीठ,मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी.

उपमा


साहित्य:
१/२ कप रवा
सव्वा ते दिड कप पाणी
१/२ कप कांदा बारीक चिरुन
१ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
फोडणीसाठी : १/४ टिस्पून हिंग
२-३ मिरच्या बारीक चिरुन
३-४ कढिपत्त्याची पाने
१/४ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून उडीद डाळ
चवीनुसार मीठ
१ टिस्पून साखर
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टिस्पून लिंबूरस

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कांदा, कढिपत्ता, मिरच्या, व्यंजन म्हणून बटाटे घालून फोडणी करावी. चिरलेला परतून घ्यावा.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे.
५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.

ओळख रानभाज्यांची - घेटुळी

शास्त्रीय नाव - Boerhavia Diffusa (बोरहेव्हिया डिफ्युसा)
कूळ - Nyctaginaceae - नेक्टॅयाजिनेसी
स्थानिक नावे - घेटुळी या वनस्पतीला ‘खापरा’, ‘तांबडी वसू’, ‘घेंटुली’, ‘पुनर्नवा’ अशीही स्थानिक नावे आहेत.
इंग्रजी नावे - ‘स्प्रेडिंग हॉग वीड’ व ‘हॉर्स पर्सलेन’ या इंग्रजी नावाने घेटुळीला ओळखले जाते.

http://www.agrowon.com/agrowon/20140415/4643241536803172591.htm