पावसाळ्यातील करडू भाजी


PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पावसाळी भाज्या, ताज्या ताज्या!

पावसाळी भाज्या, ताज्या ताज्या!
================================================================================
सतीश पाटणकर on 03 June, 2012 04:30:00 AM
 
पावसाच्या सरी कोसळू लागल्या की, डोंगरात, रानवाटांवर, शेताच्या बांधावर आणि परसदारीसुद्धा कोवळ्याशार पोपटी रंगाची दुनिया अवतरते. या पावसाळी वनस्पतींमध्ये कंटोळी, करडू, टाकळा, रानकंद, टेरी, कोरांटी, मायाळू, सुरण, दिंडा, शेवगा, कवळा, कुलू, भारंगी, शेवळ, वाघेटी, शेंडवेल, काकड, मेकी, नाना बोंडाचा पाला, तेलटप, दिणी, फोडशी आणि इतर अशा कितीतरी खाद्योपयोगी वनस्पती वा रानभाज्या असतात. यातील अनेक भाज्या जरा कडसर चवीच्या, पण पावसाळ्यात त्या चार-दोन वेळा तरी खायलाच हव्यात. छोटय़ा गावातली व वाडय़ापाडय़ातली वारली, गिरिवासी, कातकरी, ठाकर आदी मंडळी रानावनांत हिंडून गोळा केलेल्या रानभाज्या बाजारात विकायला आणतात. ते स्वत:ही या रानभाज्या आवडीनं खाऊन पावसाळी आजारावर मात करतात. कारण त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि पोषकद्रव्यं असतात. या रानभाज्यांचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत चालू असतो. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार असतात. अळंबी थंड आणि गोड असतात. त्याला मशरूम असंही म्हटलं जातं. मशरूम पचनास जड असले तरी शक्तीवर्धक असतात. त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. त्यातील पोटॅशियम, फॉस्फरस आणि सोडियमचं प्रमाणही लक्षात घेण्यासारखं आहे. निरनिराळ्या भाज्यांबरोबरही अळंबीचा वापर केला जातो. मशरूमची भाजी करण्यासाठी त्याचे पातळ काप करावेत. पातेल्यात तेल तापवून फोडणीला बारीक चिरून लसूण-कांदा घालावा. मीठ घालून परतून घ्यावं. बारीक चिरलेला टोमॅटो व लाल तिखट घालून ढवळावं. नंतर त्यात अळंबीची कापं टाकून नीट परतून घ्यावं. या भाजीत बेबीकॉर्न, बटाटा, ब्रोकोली, फ्लॉवर अशा आवडीच्या भाज्या टाकून हवा तसा स्वाद देता येतो. पावसाळ्यात मिळणा-या भाज्या आणि या ऋतूंमध्ये येणारे सण यांचाही अगदी जवळचा संबंध आहे. कोकणात गरम गरम उकडय़ा तांदळाची पेज, कुळथाची लसूण घातलेली पिठी आणि टाकळ्याची किंवा कुर्डूच्या पाल्याची भाजी असा छान बेत ठरवला जातो. पोटाला हलका पण पूरक आहार घेतला जातो. ‘राइससूप’ आणि ‘कुळीथाची पिठी’ म्हणजे ‘सिलर्स सूप’ या दिवसात कोकणी माणूस आवडीनं घेतो, अगदी ‘सूपा’सारखं! टाकळ्याची भाजी कृमीनाशक म्हणूनही खाल्ली जाते. अळूचे मुंडले (कंद) चांगला पाऊस झाल्यानंतर छान देठापानांनी उभे राहाते. कोवळ्या अळूच्या पानांची पातळ भाजी मस्तपैकी जिभेला चव आणते. श्रावणात शितला सप्तमीचं व्रत करणारे ‘आकोबा तुकोबा’चा नवेद्य करतात. त्यात वरणभात, दही आणि अळूच्या भाजीचा समावेश असतो. चतुर्थीचा दुसरा दिवस ऋषीपंचमीचा. या दिवशी ऋषींची आठवण करत कंदमुळाची भाजी ही कोकणातल्या माणसांची अत्यंत आवडीची भाजी. अळूचा बेस ठेवून त्यात अनेक प्रकारचे कंद (रताळी, कारिंदे, कणग्या, चिनी, आंबाडा) तसेच त्यावेळी मिळणा-या भाज्या शिजवल्या जातात. आंबाडय़ाच्या आंबटपणामुळे अळूला येणारी खाज निघून जातेच, आणि मस्त चवसुद्धा येते. गणेश चतुर्थीबरोबर घरोघर गौरी पुजल्या जातात. गौर म्हणजे त्या घरातील माहेरवाशीण. तिला अनेक घरांत भाजी-भाकरीचा नवेद्य दाखवतात. त्यातल्या भाजीचं वैशिष्टय़ म्हणजे ती पालेभाजी असते. गणेश चतुर्थीचे पहिले दोन दिवस गोड खाऊन जिभेला आलेला जडपणा या पालेभाजीनं निघून जातो. आघाडा ही रानभाजी पावसाळ्यात भरपूर ठिकाणी उगवते. आघाडय़ाच्या कोवळ्या पाल्याची भाजी छान होते. त्याच्या पानात बहुमूल्य द्रव्यं असतात. यामुळे स्थुलत्व कमी होतं, हाडं मजबूत होतात. पावसाळा सुरू झाला की, कोकणात तरवटा किंवा टाकळा या नावाची वनस्पती उगवते. या भाजीची पानं लांबट गोल असतात. भाजी पचायला हलकी, उष्ण, तिखट आणि तुरट असते. ती पित्तनाशक, मलसारक आहे. याचबरोबर कटरेली या वेलीची हिरवीगार, मऊ आणि काटेरी फळांची भाजी खोकला, दमा, कफविकार, त्वचाविकार यावरही उपयुक्त आहे. शेताच्या बांधावर किंवा माळरानावर उगवणारी हिरवीगार भारंग्याची पालेभाजी दमा आणि खोकल्यावर उत्तम मात्रा आहे. कडवट चवीच्या कुडय़ाच्या शेंगाची भाजी मूत्रविकारावर गुणकारक मानली जाते. हिरवीगार, मऊ पण काटेरी कवच असलेली कंदोळी सर्व रानभाज्यांमध्ये महागडी समजली जाते. या बहुतेक सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असून प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजं विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्या पोटाच्या विकारावर आणि आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जातात. शिवाय त्यात खतं, किटकनाशकं नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्त असतात. शहरातील लोकांना पूर्णपणे अपरिचित असणाऱ्या या रानभाज्या चवदार तशाच आरोग्यवर्धकही असतात. म्हणूनच विशिष्ट हंगामातच उपलब्ध होणा-या या पावसाळी रानमेव्याचा स्वाद घ्यायलाच हवा.

अंबाडीची भाजी

साहित्य :- 
धुवून बारीक चिरलेली अंबाडी, 
पाच - सहा हिरव्या मिरचीचे तुकडे, 
गुळ २ पोफळाएवढा, 
मीठ चवीप्रमाणे, 
तिखट अर्धा चमचा, 
शिजलेला भात चुरडून एकजीव केलेला १ वाटी, १/२ वाटी तांदुळाच्या कण्या, 
पंधरा - वीस लसूण पाकळ्या सोललेल्या, 
निम्मेनिम्मे तुकडे केलेली मोहरी, 
एक डाव तेल. 
हरभरा डाळ एक डाव, २-३ चहाचे चमचे डाळीचे पीठ 
१/२ वाटी तुरीची डाळ, 
दाणे १ डाव लहान.
हळद- मोहरी प्रत्येकी एक चमचा, 

कृती :- प्रथम डाळ, दाणे भिजत टाकून कुकरला चिरलेली भाजी, डाळ, दाणे गाळून उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. 
नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. 
१ डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. 

नंतर मीठ,मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी.

उपमा


साहित्य:
१/२ कप रवा
सव्वा ते दिड कप पाणी
१/२ कप कांदा बारीक चिरुन
१ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
फोडणीसाठी : १/४ टिस्पून हिंग
२-३ मिरच्या बारीक चिरुन
३-४ कढिपत्त्याची पाने
१/४ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून उडीद डाळ
चवीनुसार मीठ
१ टिस्पून साखर
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टिस्पून लिंबूरस

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कांदा, कढिपत्ता, मिरच्या, व्यंजन म्हणून बटाटे घालून फोडणी करावी. चिरलेला परतून घ्यावा.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे.
५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.