’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: संग्राम बारा वर्षांचा आहे...

’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: संग्राम बारा वर्षांचा आहे...: 

संग्राम बारा वर्षांचा आहे. संग्रामच्या वडिलांची कार एजन्सी आहे, त्यांच्या मालकीचा एक पेट्रोल-पंप आहे, ते बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ते सम...

कणगर लागवड

कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत जमीन चांगली असते, अशा जमिनीत मोठ्या आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असणारे कंद पोसले जातात. लागवड करताना जमिनीत शेणखत मिसळून त्यानंतर 90 सें. मी. अंतरावर सऱ्या सोडाव्यात. कणगराची कोकण कांचन या जातीची निवड करावी.
या जातीचे प्रति हेक्‍टरी 18 मे. टन उत्पादन मिळते. लागवडीपासून खंदणीचा कालावधी 180 ते 200 दिवसांचा असतो. पाण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी. सरीमध्ये 60 सें. मी. अंतरावर कंद लावून मातीने झाकावेत व ताबडतोब पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे. लागवडीसाठी 120 ते 150 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी लागवडीसाठी 180 ते 200 कंदांची आवश्‍यकता असते.

एक गुंठा लागवडीसाठी 400 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्यांनी 400 ग्रॅम नत्र द्यावे. लागवडीच्या वेळी द्यायचा हप्ता खड्ड्यात विभागून द्यावा. लागवडीनंतरचा हप्ता बांगडी पद्धतीने द्यावा. लागवडीनंतर वेलास आधार द्यावा. जेथे सरी लागवड आहे, त्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यावर वरंब्याची माती ओढून लागवड केलेल्या सरीचे रूपांतर वरंब्यात करावे. लागवडीनंतर खते देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारावेत.

आवश्‍यकतेनुसार बेणणी करावी. या पिकावरील पाने कुरतडणाऱ्या अळ्या व बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात 1.5 मि. लि. मोनोक्रोटोफॉस व 2 ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिश्रण करून फवारणी करावी. लागवडीनंतर सुमारे साडेसहा ते सात महिन्यांनी वेलाची पाने पिवळी पडू लागतात. या वेळी वेली अलग करून नंतर कंदाची काढणी करावी. हेक्‍टरी 18 टन उत्पादन मिळते. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून कंद वापरण्यासाठी लिटरभर पाण्यात 2 ग्रॅम बाविस्टीन व 2 मि. लि. मोनोक्रोटोफॉस या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये कंद बियाणे किमान अर्धा तास बुडवून काढावेत, असे कंद मडक्‍यात, राखेत किंवा वाळूमध्ये साठवून ठेवावेत.

Millet names in Indian Language


ज्वारी / जोंधळा great
बाजरी pearl
नाचणी / नागली / रागी finger
वरी / भगर barnyard / small
राळं / कांगणि / कांग / राळा foxtail
कोद्रा / हरीक kodo
कुटकी little
बंटी / बरटी / बर्री proso
मका

Other millets:
जव
ओट
सावा
चिनो
बराटी
भादली
डेंगळी