इतरांच्या नजरेतील भारतीय

 त्यामुळे पुढल्या रविवारी त्याच्याकडून चहाचं आमंत्रण आल्यावर ते नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी ठरल्यानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच्या घरी पोहोचलो.

"दिलेल्या वेळेच्या एक मिनिट आधीच आलेला तू पहिला भारतीय आहेस." चुंग प्रसन्न हसत म्हणाला.
"एक रस्ता क्रॉस करण्यात कशाला उशीर होईल?" मीही हसलो.
"पण होतो. शेजारच्या डेस्कवरून माझ्या डेस्कवर पोचायलाही उशीर होतो." आता भारतीयांच्या तक्रारींचा पाढा सुरू होणार! आपल्यातल्या उणिवा आपल्याला माहीत असतात; पण त्यांची उजळणी झालेली काही वाईट नाही. मसाला चहाचे वाफाळते कप, तैवानमधून आणलेली चीज भरलेली बिस्किटं आणि कोलंबीच्या फ्लेवरच्या रताळ्याच्या चिप्ससारखं उत्तम खाणं समोर आल्यावर तर अजिबातच नाही.
"भारतीयांचं कुठलं कुठलं वागणं तुझ्या डोक्यात जातं?" मी पिन मारली.
"वेळ आणि नियम न पाळणं.. कधी स्वार्थासाठी, तर कधी काहीही कारण नसताना उगाच खोटं बोलणं.. रस्त्यावरच्या पशुपक्ष्यांना खायला घालणं आणि त्यांना माणसासारखं ऐदी आणि आळशी करून ठेवणं.."
भूतदयावादी असलो तरी चुंगच्या बोलण्यातल्या मिश्किल टिप्पणीने मला हसू आलं. त्याची यादी अजून संपलेली नव्हती.
"..स्वत: डोळे फाडून बघत राहतील आणि आपण स्माइल दिलं तर नजर चुकवून दुसरीचकडे बघतील. पण ते एक वेळ परवडलं, काही काही जण तर जुजबी ओळखीवर कुठलेही पर्सनल प्रश्न विचारायला लागतात.. बाकी त्यांची कल्पनाशक्ती मात्र सॉलिड असते हा. आणि बऱ्याचदा ते आपल्याच विश्वात मग्न असतात.."

मी क्षणभर चपापलो. कारण मीसुद्धा फक्त हसण्यात आणि खाण्यातच मग्न होतो.


एका दाण्याचे शंभर दाणे

 पण एका दाण्याचे शंभर दाणे होताना बघणं अतिशय आनंददायक असतं. एक बी पेरली, रुजली की तिच्यापासून शेकडो फळं तयार होतात. तितक्या फळांना निर्माण करायची शक्ती त्या इवलुश्या बीमध्ये असते, ही निसर्गाची किमया अक्षरशः अवाक करते. जोवर त्या बीला योग्य वातावरण मिळत नाही, तोवर ही जिगीषा सुप्त अवस्थेत असते. जमिनीच्या गर्भात जाऊन ओलावा मिळाला की सृजनाची प्रक्रिया सुरू होते. हे सगळं आश्चर्य बघताना माझ्या मनाभोवतीचा ‘पैसे मिळवणे’ ह्या विचाराचा घट्ट वेढा सैलावला. पैसे मिळवणे म्हणजेच काम करणे आणि पैसे ज्या प्रमाणात मिळतात त्याच प्रमाणात आनंद-समाधान मिळतं, ही माझी गृहीतकं बदलली. आता त्या पलीकडे जाऊन मी आनंद मिळवायला लागले आहे.

पलीकडचं गवत सगळ्यांनाच हिरवं वाटतं. मलाही वाटतं. शेतात काम करायला लागल्यापासून मात्र आपण कष्टाने जोपासलेलं तितकंसं हिरवं नसलेलं गवतही अतिशय  देखणं वाटायला लागलं आहे.

https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html

क्षुल्लक कारणावरून हत्या

क्षुल्लक कारणावरून झालेली हत्या असे या बातमीचे स्वरूप आहे.

https://www.lokmat.com/crime/mystery-behind-horrible-murder-woman-has-been-solved-shocking-truth-revealed-police-a594/

नालासोपारा पुर्व चंदन नाका, झालावड पार्कसमोर मयत स्त्री (वय 32) 27 जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. 26 जूनला नगीना या काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या त्या प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानात शिवा (वय 30) याच्याशी किंमतीवरून बाचाबाची झाली. त्याच वेळी शिवा याने तिच्या केसांना धरून दुकानाच्या आतील रूममध्ये नेवून तिचा गळा दाबून चाकूने वार केला आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला.

पण थोडे खोलात गेल्यावर काही गोष्टी लक्षात येतात. प्रथम नोटाबंदी, मग जी.एस.टी., त्यानंतर ऍमेझॉन सारख्या बड्या ऑनलाईन विक्रेत्यांकडून होणारी जीवघेणी स्पर्धा आणि आता कोरोना महामारीमुळे ''रिटेल'’ म्हणजेच किरकोळ दुकानदारांचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. त्यातून धंद्यासाठी कर्ज घेतले असेल तर मग बघायलाच नको. अपराधाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या दुकानदाराने इतका भीषण गुन्हा एकट्याने केला हे पाहता काही लोकं कोणत्या परिस्थितीतून जात आहेत त्याचा अंदाज यावा. नोकरदार वर्गातील काहींना या कशाचीच झळ लागलेली नसल्याने त्यांना आपल्या आजूबाजूला सारे काही आलबेल आहे असे वाटत असते. पूर्वीप्रमाणे चार दुकाने हिंडून, चौकशी करून आणि घासाघीस करून वस्तू विकत घेण्याचा आनंद आता संपल्यात जमा आहे हे विशेष करून गृहिणींनी ध्यानात घेणे आवश्यक आहे!
_____

ही आणखी एक बातमी:


टिश्यू पेपरवरून झालेल्या वादात तरुणाची हत्या!