सीबीएसई प्रवेशावरून मायलेकीची आत्महत्या

19 जून २०२४ लोकसत्तातील बातमी: 

लातूर : परिस्थिती बेताची असल्याने सीबीएसई शाळेत आपल्या मुलीला प्रवेश देता येणे शक्य नसल्याने आईने मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावात घडली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (वय २६) व समीक्षा व्यंकट हालसे (वय ५ रा. माळेगाव ता. निलंगा) अशी दोघींची नावे आहेत.

व्यंकट हातसे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समीक्षा असे सदस्य. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र शेती आई-वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजीविका करीत असल्याने हातसे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. हालसे यांच्या पत्नीची आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश द्यावा, अशी इच्छा होती. मात्र, पती काही न बोलता, बघूया असे सांगत होता. आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मंगळवारी भाग्यश्री हालसे हिने समीक्षासह एका विहिरीत उडी टाकली. मुलगा समर्थ हा खेळत होता. आईने त्याला बोलावूनही तो गेला नाही म्हणून तो वाचला.






Former Secretary Fined

 An Article in Loksatta - 9 March 2013

Former Secretary Fined | गृहनिर्माण सोसायटीच्या माजी सचिवांना तीन लाखांचा दंड; उच्च न्यायालयाचा निर्णय

पारसनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माजी सचिव चिंतामणी पांडे यांना सहकारी संस्थेच्या डी/ई-प्रभागाच्या उपनिबंधकाने ३ मार्च २०२२ रोजी याचिकाकर्त्याला पाच वर्षांसाठी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. गृहनिर्माण संस्थेचे सचिव म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित न केल्याबद्दल याचिकाकर्त्याला दोषी ठरवून ठरवून उपरोक्त कारवाई केली होती.

मयुर फडके, मुंबई: प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला (CHS) राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) घेणे आवश्यक आहे. मात्र दोन वर्षे सभा न बोलवल्याने गृहनिर्माण संस्थेची निवडणूक (election) लढवण्यास पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या माजी सचिवाला (Former Secretary) उच्च न्यायालयाने (High Court) चांगलाच दणका दिला या माजी सचिवाला निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय (Decision to Disqualify) योग्य ठरवून न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल त्याला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

पारसनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माजी सचिव चिंतामणी पांडे यांना सहकारी संस्थेच्या डी/ई-प्रभागाच्या उपनिबंधकाने ३ मार्च २०२२ रोजी याचिकाकर्त्याला पाच वर्षांसाठी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. गृहनिर्माण संस्थेचे सचिव म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित न केल्याबद्दल याचिकाकर्त्याला दोषी ठरवून ठरवून उपरोक्त कारवाई केली होती. याचिकाकर्त्याने या निर्णयाला सुरूवातीला विभागीय सहनिबंधकासमोर आव्हान दिले होते. मात्र ते फेटाळण्यात आल्याने याचिकाकर्त्याने निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्या गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, गृहनिर्माण संस्थेची व्यवस्थापकीय समिती सोसायटीचा मुख्य गाभा असते. त्यामुळे ही समिती आणि तिचे सदस्य संस्थेच्या हिताच्या विरोधात कृती करू शकत नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांसाठी एजीएम घेण्यात आली नाही. तसेच ती न घेण्याचे योग्य ते स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा विचार करता ही एकप्रकारची गंभीर चूक असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि याचिका करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला तीन लाख रुपयांचा दंड आकारला.

काय आहे प्रकरण 

उपनिबंधकांनी गृहनिर्माण संस्थेला १४ जुलै २०२१ रोजी अचानक भेट दिल्यानंतर २०१७-१८ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली नसल्याचे उघड झाले. २०१८-१९ या वर्षासाठी एजीएम घेण्यात आली नाही आणि का घेण्यात आली नाही त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे उपनिबंधकांनी अहवालात नमूद केले आणि अहवालाच्या आधारे निबंधकाने याचिकाकर्त्यासह नोटीस बजावली. त्यानंतर सोसायटीच्या इतर पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी सोसायटीची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. मात्र उपनिबंधकांनी गृहनिर्माण संस्थेच्या समितीने पार पाडलेल्या कर्तव्यांच्या नोंदी पाहिल्या असत्या तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याचे सिद्ध झाले असते, असा दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता.



तर कधी येऊ भेटायला?

आमचे साहेब तुमची खूप इज्जत करतात आणि तुम्हाला भेटण्याची त्यांची  इच्छा आहे. तुम्हाला कदाचित त्यांच्याविषयी फारशी माहिती नसेल.  म्हणून थोडी ओळख. 

मोठ्या लोकांच्या शिफारसपत्रांच्या आधारावर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्वीच बंदूक बाळगण्याची परवानगी दिली आहे. आजपर्यंत त्यांनी एक-दोन अपवाद वगळता कधीही गोळी झाडलेली नाही. फक्त एकदा एक जण अगदीच अंगावर आला म्हणून स्व- संरक्षणार्थ त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला कायमचे जायबंदी केले आहे. त्यातही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सरळ डोक्यात किंवा छातीवर गोळी झाडणे शक्य असूनही त्यांनी तसे केले नाही यावरून त्यांची थोरवी लक्षात येते. चर्चा करताना अधे-मधे खिशातील बंदूक काढून तिच्या नळीच्या टोकावर हलकीशी फुंकर मारायची आणि बंदूक परत खिशात ठेवायची अशी त्यांची जुनी सवय आहे. पान खाऊन पचापच थुंकणाऱ्यांच्या सवयीकडे जसे तुम्ही  दुर्लक्ष करता तसे या सवयीकडे दुर्लक्ष करा आणि चर्चा चालू ठेवा.

दुर्गादेवीचे आणि महालक्ष्मीचे उपासक जसे महत्त्वाचे तसेच सरस्वतीचे उपासकही महत्त्वाचे आहेत असा त्यांचा दृष्टीकोन आहे. तुमच्यासारख्या अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तीबरोबर चर्चा करायला त्यांना फार म्हणजे फारच आवडते. तुम्हाला कदाचित आवडत नसेल याची त्यांना कल्पना आहे. पण तुमच्या आगामी पुस्तकाच्या काही शे प्रती आगाऊ रक्कम देवून विकत  घेतल्या तर त्यांना भेटण्याची इच्छा तुमच्यामध्ये आपोआप जागृत होईल हेही त्यांना माहीत आहे. माहिती जमा करून तिचा यथायोग्य उपयोग करणे हे ऍमेझॉन आणि गूगल देखील करते. त्यांच्यावर कोणी ब्लॅकमेलिंगचा आरोप करत नाही. साहेबांवर मात्र खोट्या केसेस दाखल करून विनाकारण मनस्ताप देणारे हितशत्रू आजूबाजूलाच आहेत. पण त्यांना पुरून उरलेले साहेब अजून बाहेर आहेत आणि ते "आत” जाण्याची काहीही शक्यता नाही  ही  गोष्ट  हायकोर्टाला देखील माहीत आहे.

बोलण्याचा भरात थोडी जास्तच माहिती दिली. खरं तर त्याची काही गरज नव्हती.  तुमच्यासारखी लोकं नुसत्या एका निरोपावर भेटायला येतात. तेव्हा साहेब स्वतः खाली उतरून एखाद्याला भेटायला जातात म्हणजे एक आश्चर्यच आहे. पण त्यातही त्यांचा काही विचार असेलच. परिसराची रेकी करायची, घरच्यांशी घसट वाढवायची, शेजारी-पाजारी संपर्क ठेवायचा ही कामे पंटर लोकांवर सोपविता येत  नाहीत. 

तर कधी येऊ देत भेटायला?