साथ सोबत

आक्काचं बालपण खेडेगावात गेलं. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं यांमुळे आक्काचा आणि शिक्षणाचा कधी संबंधच आला नाही. तिचा आवाज भसाडा आणि किंचित घोगरा. आक्काच्या नाकाडोळ्यांबद्दल न बोललेलं बरं. उंचीनं बेताची आणि आडव्या अंगाची. अशा मुलीचे शंभर / दिडशे वर्षांपूर्वी लग्न जमणे जवळपास अशक्यच होते. त्यामुळे तिच्या बापाने ती तेरा - चौदा वर्षांची असतानाच पैसे घेऊन एका ७५ वर्षे वयाच्या म्हातार्‍याबरोबर तिचे लग्न लावून दिले. अपेक्षेप्रमाणे दोन - चार वर्षात म्हातारा मेला. ती सतराव्या वर्षीच विधवा झाली. मग तिचे हात पाय बांधून तोंडात बोळा कोंबून तिला बोडकी केली.  सुंदर केस गेल्यावर ती आपोआप सोवळी झाली. पण पुढे तिने आपल्या शारीरिक गरजा कशातरी पूर्ण करून घेतल्या असे या कथेत जाता जाता सुचविलेले आहे. मला एक गोष्ट कळत नाही की या सगळ्यात तिची नेमकी काय चूक झाली? त्या काळातील पुरुष मानसिकता तपासून पहायला नको का? 

अक्काच्या वडिलांना मरून शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली असली तरी काही प्रश्न त्या काळातील पुरुषांना विचारावेसे वाटतातः

१) "घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं ":
घरात जे आहेत त्यांनाच खायला अन्न नसताना दर वर्षा - दोन वर्षांनी खाणारे एक तोंड वाढविण्याचा विचार देखील कसा सुचू शकतो? 

२) नाइलाजाने मुलगी विकली असे समर्थन करताना थोडी तरी लाज वाटली का? की त्या वेळी आपल्या दारिद्र्याचा अभिमानच वाटला?

३) पैशांसाठी पंचाहत्तर वर्षांच्या म्हातार्‍याबरोबर तिचे लग्न लावून दिले, ठीक आहे. त्यावेळी ती लवकरच विधवा होण्याची शक्यता आहे हे माहीत नव्हते का? अपेक्षेप्रमाणे तसे घडल्यानंतर केशवपनासंबंधी निर्णय घेण्याचे स्वातंत्र तरी तिला देवून आपण तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करायची संधी वाया का घालवली? रूढी / परंपरा जपण्याच्या अट्टाहासात आपण दुसर्‍या मनुष्यप्राण्यावर अमानवी अत्याचार करीत आहोत याची जाणीव शेवटपर्यंत झालीच नाही का?

_____

पुस्तकः साथ सोबत
लेखिका:  सिंधू (उषा) वसन्त कानेटकर
पहिली आवृत्ती: २००६ / १९२८

एक पेटती मशाल

विशेषनाम अर्थवाही नसतं, हा व्याकरणाचा नियम तितकासा खरा नाही. पुष्कळवेळा काही विशेषनामं बरंच काही सांगून जातात. एक दोन महिन्यांपूर्वी मी बेळगावला गेले होते. जाताना निपाणीजवळ एका दुकानावर पाटी लटकत असलेली दिसली-"पट्टणकोडीकर ब्रदर्स". ती पाटी वाचल्यावर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. या पट्टणकोडी गावात आक्काखेरीज आणखी कुणी लोकं राहत असतील ही कल्पनाच आम्हांला कधी आली नाही. सगळं गाव आक्काला "पट्टणकोडीची आक्का" या नावानं ओळखायचं. दुकान मागे गेलं, निपाणी गावही मागे पडलं, पण त्या पट्टणकोडीची आक्का मात्र माझा पाठपुरावा करीत होती. त्या एका विशेषनामानं माझ्यापुढे आठवणींचा डोंगर उभा केला. गाडी बेळगावच्या दिशेने धावत होती; पण मन मात्र कोल्हापूरच्या दिशेने धावत होतं. क्षणार्धातच साठ वर्षांचं अंतर मी ओलांडलं. काहीसं विस्मरणात गेलेलं आक्काचं चित्र अगदी डोळ्यांपुढे स्पष्ट उभं राहिलं. तशी ही आक्का आमच्या नात्यातली नव्हती की शेजारीणही नव्हती. पण एक-दोन दिवसांआड आक्काचा फेरा आमच्या घरी असायचा. आक्का आली की थेट स्वयंपाकघरात घुसायची. तिचा आवाज भसाडा आणि किंचित घोगरा. आधी वीज चमकते आणि मग गडगडाट ऐकू येतो हा शास्त्रातला नियम आक्कानं पार धाब्यावर बसवला होता. ती कोपऱ्यावरून आमच्या घराकडे वळली की आधी तिचा भसाडा आवाज ऐकू येई, मग पाच मिनिटांनी तिचं प्रत्यक्ष दर्शन घडे. माझी आजी तर तिला "अंबाबाईचा घाट"च म्हणायची. तसं आक्काचं दिसणं, वागणं, बोलणं सगळंच जगावेगळं होतं. आक्का बालविधवा होती आणि ती सुद्धा सोवळी. पण अशा दयनीय परिस्थितीत सापडलेल्या त्या काळच्या स्त्रीचं जे चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं, त्यापेक्षा आक्का फार वेगळी होती. ती कधी लाल आलवण नेसायची नाही की कधी खाली मान घालून रस्त्यानं चालायची नाही. ती नेहमी गर्भरेशमी माहेश्वरी साड्या नेसे किंवा टोपपदरी इरकल तरी ! अंगात चोळी कधी नसायची, पण गळ्यात पाच पदरी सोन्याचा चकचकीत गोफ असायचा. दोन-तीन बोटांत अंगठ्या आणि डाव्या हातात वजनदार सोन्याचं कडं. आक्काच्या नाकाडोळ्यांबद्दल न बोललेलं बरं. तिच्या एक डोळ्यात फूल पडलेलं होतं आणि दुसरा डोळा तिरळा होता. नाक होतं सांडगा घातल्यासारखं आणि ती ते बोलताना आणखीच फेंदरायची. वर्णानं आक्का गोरीही नव्हती आणि काळीही नव्हती. उंचीनं बेताची आणि आडव्या अंगाची, पण रूपाची सगळी कसर आक्का अर्वाच्य बोलण्यानं भरून काढी. आक्काचा आवाज जसा नंबरी होता, तसा शिव्यांचा संग्रहही जबरदस्त होता. ती म्हणजे अस्सल कोल्हापुरी शिव्यांचा चालता बोलता शब्दकोशच ! बोलताना प्रत्येक दोन-तीन शब्दांआड ती एखादी शिवी हासडायची. विशेषतः ती कुणाशी भांडायला लागली म्हणजे तिच्या प्रतिभेला अगदी ऊत यायचा. मूर्ख, कार्टा, हरामखोर असल्या पेदरट ब्राह्मणी शिव्या आक्काच्या तोंडातून कधी निघायच्या नाहीत. "तुझं मढं बसवलं", "तुझी तिरडी आवळली", "तुला आईसाहेबाच्या घाटावर नेऊन जाळलं (कोल्हापूरचं स्मशान)" इथं आक्काचं भांडण संपायचं. तिच्या या भडिमाराला घाबरून तिचे शेजारीपाजारी, नातेवाईक, तिचं खंडकरी सुद्धा गप्प बसत. मला तर ती कधी 'सिंधू' म्हणायची नाही. 'शिंदळीची' किंवा 'सटवी' ही तिची आवडती नावं होती.

आक्का एकदा बोलायला लागली की तिला भीड, मर्यादा राहायची नाही.

आक्काची अशीच एक गोष्ट मला आठवतेय. आक्का सोवळी होती. साहजिकच तिला केशवपन करण्यासाठी न्हावी बोलवायला लागायचा. असंच तिनं एका न्हाव्याला बोलवून आणलं. तो आक्काला म्हणाला, "मी चार आणे घेईन, आधीच सांगतो." आक्का कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, - "अरे चार आणेच कशाला, सव्वा रुपाया देते, पाट मांडते, वर खण घालते, सव्वाशेर धान्य देते, माझं जावळच काढायचं आहे." तो न्हावी आपली धोपटी घेऊन पळाला. तो पुन्हा आक्काच्या दाराशी आला नाही. आक्काचं हे वक्तव्य माझ्या आजीपर्यंत गेलं. तिला आक्काचं असलं अर्वाच्य बोलणं अजिबात आवडायचं नाही. आक्का आल्यावर आजी तिला रागावून म्हणाली "आक्का, असलं बोलणं बायकांच्या जातीला शोभत नाही." आक्का इतकी तोंडाळ, पण आजीपुढं ती गप्प असे. "थोडी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी माणसानं," आजी पुढे बोलली. आक्का शांत होती. ती खालच्या आवाजात, आणि पाणावलेल्या डोळ्यानं म्हणाली, "नवरा मेल्यावर माझ्या बापानं माझं डोकं न्हाव्याच्या हाती दिलं, तेव्हाच सगळी लाज, भीड, मर्यादा जळून खाक झाली." इतकं बोलून आका उडून गेली, पण आजीच्या डोळ्यांत पाणी तरारलं.

आक्काच्या घरात बैठकीच्या खोलीत एक मोठा फोटो टांगला होता. डोक्याला पगडी, अंगावर उपरणं, कपाळावर गंध, आकडेबाज मिशा आणि चेहेऱ्यावरचा खत्रूड भाव हे त्या फोटोचं वैशिष्ट्य. या बैठकीच्या खोलीतच दाराशी एक काळ्या शिसवी लाकडाचा आणि पितळेच्या कड्या असलेला झोपाळा टांगला होता. त्या झोपाळ्याच्या समोरच्या भितीवरच तो फोटो लटकत होता. त्या फोटोतल्या माणसाचा उल्लेख आक्का नेहमी "मुडदा" असा करे. मला सुद्धा ते आवडायचं नाही. मी एकदा तिला म्हटलं, "या पट्टणकोडीकर इनामदारांना नेहेमी तू मुडदा का म्हणतेस? बरं नाही दिसत ते."

आक्का उसळून म्हणाली, "त्या मुडद्याला मुडदा नको म्हणू तर काय रावबहादूर म्हणू? मेल्या खोकडानं माझ्या जन्माचं वाटोळं केलं आणि ही सटवी मला शहाणपण शिकवतये. मेल्या खोकडानं माझ्या जन्माचं वाटोळं केलं."

मी देखील जरा धीटपणाने म्हणाले, "काय वाटोळं झालं ग तुझं? घरदार, दागदागिने, शेतीवाडी, पैसा-अडका, काही म्हणजे काही कमी नाही." आक्का फुणफुणत म्हणाली, "हा मुडदा पंचाहत्तर वर्षांचा! पहिल्या तीन बायका गिळून बसलेला. माझ्या बापानं चक्क पैसे घेऊन मला विकलं त्या म्हाताऱ्याला. आणि या निर्लज्ज खोकंडानं माझे काय धिंडवडे काढले ते माझं मला माहीत! अगं, बारा-तेरा वर्षांचं वय असेल माझं त्यावेळी. हा त्याचा फोटो बघितला तरी त्याचा गळा दाबावा असं वाटतं बघ." हे सगळं बोलताना ती संतापानं अगदी थरथरत होती. मी तिच्या पाठीवर हात ठेवला, तेव्हा ती हळूहळू शांत झाली. तसं तिच्या आणि माझ्या वयात तीस-चाळीस वर्षांचं अंतर असेल. पण तिला मन मोकळं करायला जवळचं असं कोणीच नव्हतं. तिच्या फटकळ आणि अर्वाच्य बोलण्यानं शेजारच्या बायकाही तिच्याकडे फारशा येत नसत. त्यामुळे ती माझ्यापुढे आपलं मन मोकळं करी. तिच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी मला फारसा समजायचा नाही. मी फक्त श्रोत्याचं काम करी.

आक्काला माझी वेणी घालायला फार आवडायचं. माझे केस खूप जाड आणि लांब होते. वेणी घालताना ती अखंड बडबडत असायची. तिचा बाप, तिचा नवरा, तिची खाष्ट नणंद हेच तिच्या बोलण्याचे विषय असत. सुट्टीच्या दिवशी बेसनाच्या लाडवाचं आमिष दाखवून ती मुद्दाम मला बोलावून घेई. मग एका वाटीत तेल घेऊन माझ्या डोक्याला चांगलं चोळे आणि जटा काढून घट्ट वेणी घाली. मी लहान होते त्यावेळी मी हे तेल चोपडणं मुकाट्यानं सोसून घेई. पण मोठी झाल्यावर ते तेल आणि घट्ट वेणी हे दोन्हीही मला आवडेनासं झालं. एक दिवस भी जरा पुश्शातच तिला म्हटलं, "माझ्या डोक्याला इतकं तेल नको बाई फासूस, नाहीतर मी येणारच नाही वेणी घालायला."

आक्कानं माझे केस आपल्या हातात धरले होते आणि ती कुठंतरी हरवली होती. माझे शब्द कानावर पडल्यावर ती एकदम भानावर आली. माझ्या पाठीवर एक जोराचा धपाटा मारला आणि मला दूर ढकलून दिलं. तेलाची वाटी बाजूला करीत ती म्हणाली, "सटवे, मी काही तुझ्या बापाचं देणं लागत नाही, तुझ्या टाळक्यावर वाटीभर तेल जिरवायला. उठ चालती हो. माझा एवढा आनंद सुद्धा बघवत नाही दैवाला." ती खिडकीशी जाऊन उभी राहिली आणि माझ्याकडे न बघताच म्हणाली, "तुझे केस हातात घेतले की मला माझ्या केसांची आठवण येते गं! असेच होते बघ, लांब आणि जाड. पण त्या केसांना कधी ठिपकाभर तेल मिळालं नाही की त्यावर प्रेमानं कधी कुणाचा हात फिरला नाही." इनामदारांच्या फोटोकडे हात दाखवून पुढं म्हणाली, "हा मुडदा मेल्यावर सहा महिन्यांतच माझ्या बापानं अगं बाप कसला, कसाईच तो - माझं डोकं भादरून मला सोवळी करायचा चंग बांधला. मी पुष्कळ रडले, भेकले, पण त्या कसायाला पाझर फुटला नाही. माझे हात-पाय बांधून आणि माझ्या तोंडात बोळा कोंबून त्या मेल्यानं माझं डोकं न्हाव्याच्या हातात दिलं. सोळा, सतरा वर्षांची असेन बघ मी त्यावेळी. रडून आकांत केला पण काही उपयोग झाला नाही." इतकं बोलून आक्का ढसाढसा रडू लागली. तिचा तो आकांत बघून मी म्हटलं, "आक्का, मुडदा कसा मरेल गं?" माझा प्रश्न ऐकून ती अगदी गडगडा हसली आणि डोळ्यांतलं पाणी पुशीत ती म्हणाली, "ढालगज भवानी मेली!" आक्काचं ते हसणं तिच्या रडण्यापेक्षाही हृदय पिळवटून टाकणारं होतं. आक्काच्या आयुष्यातला एकेक प्रसंग मला तिच्या अधिक जवळ नेत होता.

आक्काचा आणखी एक शौक म्हणजे निरनिराळे पदार्थ तयार करणं आणि ते सगळ्यांना पोटभर खाऊ घालणं. साजूक तुपातले बेसनाचे लाडू, निरनिराळ्या वड्या, ह्या वस्तूंनी तिचे डबे सदैव भरलेले असत. शिवाय खारका, बदाम, बेदाणे, काजू असा सुकामेवाही काचेच्या बरण्या भरभरून ठेवलेला असे. यांतलं ती स्वतः फारच थोडं खाई. गल्लीतली मुलं, शेजारीपाजारी, येणारे जाणारे या सर्वांना ती हे जिन्नस उदार हस्ताने वाटून टाकी. तिच्या या उदार स्वभावामुळेच तिच्या शिव्या, शेजारी-पाजारी मुकाट्यानं ऐकून घेत आणि तिचं भांडणं फारसं मनावर घेत नसत. एकदा दुपारच्या वेळी मी आजीचा काही निरोप घेऊन तिच्याकडे गेले होते. आक्का हात पुसत पुसत स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, "आत्ताच बेसनाचे लाडू केलेत. बस झोपाळ्यावर दोधी मिळून खाऊ या. मग आकानं दोन चांदीच्या वाट्यांत लाडू घालून आणले आणि आम्ही दोघी झोपाळ्यावर बसून खायला सुरुवात केली. मी लाडू खाण्यात इतकी गुंग झाले होते की आकाकडं माझं लक्षच नव्हतं. एकदम कानावर शब्द आले "मेल्या, आत्ता कसं वाटतंय? तेव्हा सगळ्या जिनसा कुलपांत ठेवून एकटा एकटा खायचास. आता बस मुडद्या हात चोळीत."

बघितलं तर इनामदारांच्या फोटोकडे बपून आका स्वतःशीच बोलत होती आणि हसत होती. मी तिला गदगदा हलवून विचारलं, 'अगं ए! कुणाशी बोलतीस?" आका म्हणाली, "अगं या खोकडाशी. लाडू, पेढे, सुकामेवा, सगळं काही मेला कुलपात ठेवायचा आणि एकट्या एकट्यानं खायचा. पुन्हा किल्ली सदैव जानव्याला. एक लाडू कधी मेल्यानं हातावर ठेवला नाही. दिवसभर काम करून भूक लागायची. ती माझी नणंद - हडळ मेली - पोटभर जेवायलाही द्यायची नाही. असं वाटायचं की या थेरड्याचा गळा दाबावा आणि सगळा डबा हिसकावून घ्यावा. अगं, लाडू वळता वळता मी हळूच एक लाडू तोंडात टाकला तर त्या दोघांनी मला डाग दिला होता. आता माझी वासनाच गेली आहे, पण त्या कंजूष थेरड्याची खोड मोडायला मी हा उपद्व्याप करते." आक्काच्या वाटीतला लाडू तसाच होता. गतकाळातल्या वेदनांचे वण अजूनही ठणकताना दिसत होते. एकीकडे मी गलबलून गेले होते. दुसरीकडे म्हाताऱ्यावर सूड उगविण्याच्या तिच्या कल्पनेचं हसू येत होतं.

आक्काचं बालपण खेडेगावातच गेलं. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं यांमुळे आक्काचा आणि शिक्षणाचा कधी संबंधच आला नाही. ती अशिक्षित असली तरी बुद्धिमान होती. तिचे विनोदच तिच्या बुद्धीची साक्ष देत. गल्लीतल्या निम्म्या लोकांना तिनं टोपणनावं दिली होती. वामनराव हसबनीस वकिलांना ती गंगाधरपंत म्हणे कारण, त्यांनी ठेवलेल्या सोनारणीचं नाव गंगुबाई होतं. देसाई इनामदारांना ती फॅगडू इनामदार म्हणे कारण, ते फेंगडे चालत, तर काळे मास्तरांना ती बालगंधर्व म्हणे, कारण ते बाईसारखे हावभाव करीत. माझ्या आजीला ही आनंदस्वामी म्हणे, कारण तिचं नाव आनंदी आणि स्वभावानं फार शांत आणि सोज्वळ ती नकलाही फार छान करी. एखादी हकीगत सांगताना त्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवाजासारखा आवाज ती काढे, जणू काही एखादा एकपात्री प्रयोगच ! आका अक्षरशत्रू असल्याने वाचनाचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. आकाचं एकमेव करमणुकीच साधन म्हणजे सिनेमा ! देवधर्माच्या वाटेला ती फारशी जायची नाही. तिला फिअरलेस नादियाचे स्टंटपट फार आवडत. आजीला 'संत तुकाराम बघायला जातो' असं सांगूर आम्ही 'हंटरवाली' बघायला जात असू. 'तुफान मेल' तर आम्ही चार वेळा बघितला होता. सिनेमा बघताना ती इतकी तन्मय होई की आपण थिएटरमध्ये आहोत हे विसरूनच जाई. खलनायकाला शिव्या घालणं, त्याच्या नावाने बोटं मोडणं, मारामारी सुरू झाली की उभं राहून हातवारे करणं, हे प्रकार ती बिनदिक्कत करी. घरी आल्यावर देखील ती दोन-तीन दिवस त्या सिनेमाच्याच जगात असे. मला सारखं सांगायची, "त्या संत सखूसारखी नाहीतर त्या तुकोबासारखी पेदरट होऊ नकोस. हंटरवाली हो हंटरवाली. आणि बाकी तुझी आजी कसली तुला हंटरवाली बनवणार. तू होणार तिच्यासारखी पेदरट." तिला 'कुंकू' सिनेमा फार आवडे. तो बघताना तिला रडू आवरायचं नाही.

आक्का नवऱ्याचा उल्लेख अखंड 'मुडदा' असा करायची, पण इनामदारांचं श्राद्ध लाडू अगदी साक्षेपानं करायची. ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा द्यायची, पुरणपोळीचं जेवण असायचं आणि सगळ्या शेजारीपाजारी लोकांना जेवायला बोलवायची. एकदा माझ्या मामानं त्याबद्दल तिला विचारलं तर हसत म्हणाली, "अरे, मनातल्या मनात तो मेल्याचा आनंद मी साजरा करते". मग हळू आवाजात म्हणायची, "त्याच्या पैशावरच मी राणीसारखी राहते ना, मग थोडं नको का ते स्मरायला?"

आक्काचा सगळ्यात आवडता दिवस असायचा हादगा बोलावणीचा. आक्काच्या घरी हादगा नाचायच्या वयाची कोणीही मुलगी नव्हती. केवळ हौस म्हणून ती हा समारंभ करायची. गल्लीतल्या सगळ्या मुलींना आणि माझ्या मैत्रिणींना ती आवर्जून फेर धरायला बोलवी. त्या आधी आठ दिवस तिची ह्या समारंभाची तयारी चालायची. या दिवसांत ती लहानाहून लहान व्हायची. अखंड नव्या नव्या खिरापतीबद्दल आणि हादग्याच्या गाण्यांबद्दल बोलत असायची. नवी, कुणाला न ओळखणारी खिरापत कोणती करायची, याबद्दल तिचा सारखा विचार चालू असे. त्या दिवशी ती अंगण स्वच्छ करून घेई. मधोमध मोठी आणि सुबक हत्तीची रांगोळी काढी. फेर धरून मुली नाचायला लागल्या की एका कोपऱ्यात गम्मत पाहत बसे. मधून मधून मुलींच्या बरोबर गाणी म्हणे. खिरापत ओळखायला मुली हरल्या की आनंदाने टाळ्या वाजवी. फेर संपल्यावर सगळ्या मुलींना आग्रह कर करून जेवायला वाढी. त्या दिवशीची आक्का अगदी वेगळीच असायची. एकदा सगळ्या मुली घरी गेल्यावर मी आणि अक्का दोघीच घरात राहिलो. ती दिवसभराच्या दगदगीने खूप दमली होती. मी तिला म्हटलं, "तुला होत नाही तर कशाला इतकी धडपड करतेस?" जरा वेळ आक्का काहीच बोलली नाही. कुठंतरी हरवल्यासारखी दिसायला लागली, मग म्हणाली, "अगं! लहानपणी हादगा नाचायची मला फार हौस. सगळ्या मैत्रिणींच्या घरी मी आवर्जुन जायची. पण मला कधी कोणाला बोलवता आलं नाही घरी! दोन वेळा जेवायला मिळायची मारामार तर खिरापत कुठली देणार? मी निर्लज्जपणानं मैत्रिणींच्या घरी जायची. पण मनात ओशाळल्यागत व्हायचं. आत्ता माझ्या घरी फेर धरून नाचणाऱ्या मुलींच्या जागी मला माझी लहानपणातली एकेक मैत्रीण दिसते. त्यांनाच जेवायला घातल्याचं समाधान मिळतं. या आनंदासाठी तर मी वर्षभर या दिवसाची वाट बघत असते." आक्काकडून मी घरी आले तरी आक्काच्या वागण्याचाच विचार करीत होते. त्यावेळी मी असेन १२-१३ वर्षांची. आक्काचं बोलणं, वागणं, याचा अर्थ मला फारसा समजायचा नाही; पण आता लक्षात येतं की तिच्या, वरकरणी विसंगत वाटणाऱ्या वागण्यातही एक संगती होती. तिचा तोंडाळपणा आणि शिवराळपणा हा तिच्या दबलेल्या भावनांचा आणि सोसलेल्या मनस्तापाचा आविष्कार होता.

मी आजोळहून माझ्या आईवडिलांच्याकडे राहायला गेले आणि आक्काचा सहवासही संपला. मनात घर करून राहिल्या त्या तिच्या सहवासाच्या आठवणी. माझं लग्न झाल्यावर ४-५ वर्षांनी मला आक्का गेल्याचं कळलं. बालपणीच्या सुखद आठवणींचा एक धागा तुटला होता.

आक्का बालविधवा असली तरी निरांजनाची ज्योत वगैरे नव्हती. कोणत्याही सामाजिक चालीरितींच्या दबावाखाली ती दबली गेली नाही. तिला जो आनंद हवा होता तो तिनं कोणालाही न जुमानता मिळविला. रडत भेकत आपल्या नशिबाला दोष देत तिनं खाली मान घालून आयुष्य घालविलं नाही. लहानपणी तिच्या वाट्याला आलेले भोग तिनं भोगले. त्या दुःखानं व्याकूळही झाली, पण वाट्याला आलेली समृद्धी आणि सुख यांचाही तिनं उपभोग घेतला. इतरांनाही समृद्धीतून मिळालेला आनंद वाटला. आक्का कधी दीनवाणी दिसली नाही. ती होती एक पेटती मशाल, धगधगणारी, भडकणारी, पण आत कुठंतरी कणाकणानं जळणारी !

झुंबर

लेखकः पु. भा. भावे 

त्या बाटेविषयीची एक आठवण आम्ही दोघेही अद्याप विसरलेलो नाही. विशेषतः दारू प्यायला बसलो म्हणजे ती आठवण आम्हाला अनेकदा होते.
त्या सायंकाळी आम्ही खूप फिरलो आणि दमलो. मग आम्हाला थंडगार बीअरची (Chilled Beer) आठवण झाली. परंतु त्या वेळी आमच्यापैकी कुणाच्याही खिशात पैसे नव्हते. मग मी माझ्याजवळचा एक जुना शब्दकोश मातीमोलाने जुन्या पुस्तकांच्या दुकानात नेऊन विकला. बाबानेही कुठले तरी पुस्तक विकले. तरी पुरेसे पैसे उभे झाले नाहीत. त्यावर बाबाने विलक्षणच तोड काढली.
महाराजबागेच्या फाटकासमोर बसणाऱ्या एका तिरळ्या पानबिडीवाल्या पुरभय्याकडे बाबाचे (व माझेही) उधारी खाते होते. बाबाने सरळ त्याच्याकडून उसने पैसे घेतले व आम्ही 'एंपायर' हॉटेलची वाट धरली. आमच्या जवळची संपत्ती केवळ बीअरच्या दोन बाटल्यांना पुरेल इतकीच होती. (बीअर हे त्या काळात माझे आणि बाबाचेही आवडते पेय होते.) तेव्हा त्या दोन बाटल्या बीअरवरच आम्ही दोघांनी समाधान मानले. पावाचे दोन तुकडे व कांदे-टमाटे त्या काळात बीअरबरोबर विनामूल्य मिळत असत. बीअरच्या घोटाबरोबर आम्ही त्यांचा समाचार घेतला आणि तृप्त झालो. 'नेपालिन' व 'हेनेसी' ब्रँडीपासून 'ब्लॅक लेबल जॉनी वॉकर' आणि 'ब्लॅक डॉग' व्हिस्कीपर्यंत अनेक प्रकारचे उंची मद्य मी आणि बाबाने पुन्हा एकत्र बसून अनेकदा घेतले. पण त्या बीअरच्या दोन बाटल्यांची गंमत केव्हाही आली नाही !

भारतीय साहित्याचे निर्माते - मामा वरेरकर

लेखकः सदा कर्‍हाडे 

Page 28

मामा साहित्याकडे जीवनवादी दृष्टीने पहात होते. आपल्या लेखनाची भूमिका स्पष्ट करताना ते लिहितात, "हिंदुस्तानला केवळ मनोरंजनात्मक किंवा मनोरंजनप्रधान साहित्याची गरज नाही. तर हिंदुस्तानच्या विद्यमान परिस्थितीत लोकजागृतीची आवश्यकता असल्यामुळे लोकजागृती करणे, हेच साहित्यनिर्मितीचे ध्येय असले पाहिजे." सामान्य माणसं सामाजिक, राजकीय वास्तवाच्याबाबतीत अनभिज्ञ असतात. त्यांच्यासाठी सुबोध, सरळ, सहज आणि स्वाभाविक भाषेत सामाजिक वास्तवाचे चित्रण करणे अनिवार्य गरजेचे आहे. आपल्या या दृढ विचारांमुळे मामा आपल्या साहित्याच्या जीवनवादी व वास्तववादी भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अगदी कठोरपणे अखेरपर्यंत आपली ही भूमिका निभावली. हरि नारायण आपटे यांनी आपल्या 'पण लक्षात कोण घेतो?' या कादंबरीने सामाजिक कादंबरीच्या ज्या परंपरेचा आरंभ केला, मामा वरेरकर त्याच परंपरेतील कादंबरीकार मानले जातात.


मामांची पहिली कादंबरी 'विधवा कुमारी'

इ.स. 1928 मध्ये त्यांनी 'विधवा कुमारी' नावाने कादंबरी लिहिली. या पहिल्याच कादंबरीमुळे मामा वादाच्या भोवऱ्यात अडकले. या कादंबरीने साहित्यविश्वात खळबळ माजवली. एकतर 'विधवा कुमारी' नावामुळे असे वाटत होते की, ही अनामिक लेखिका स्वतः विधवा असल्यामुळे यातील अनुभव वास्तववादी आहेत. दुसरे असे की या कादंबरीतील नायिका 'मधु'ने समाजव्यवस्थेबद्दल जी विद्रोही भूमिका घेतली होती ती मराठी कादंबरीतील स्त्री-चित्रणाच्या दृष्टीने सर्वथा नवीन होती. हरि नारायण आपटेंच्या पहिल्या कादंबरीची नायिका 'यमु'ने रूढी-परंपरेच्या निबंधामुळे अन्याय, अत्याचार सहन करणे कठीण असूनही विद्रोही भूमिका घेतली नाही. परंतु या निर्बंधाचा विरोध करण्याच्या दृष्टीने समाजसुधारणेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरीची नायिका 'रागिणी' यमुपेक्षा कितीतरी पुढे जाऊन आधुनिक विचारांचा स्वीकार करत सुधारणावादी किंवा प्रगतीशील होण्याचा प्रयत्न करीत राहिली. प्रचलित उदारमतवादी समाजसुधारणेची (Liberal Social Reforms) ही अनिवार्य आविष्कृती होती. मामांच्या कादंबरीची नायिका 'मथु' तर 'यमु' आणि 'रागिणी'पेक्षा वेगळ्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोही भूमिका घेत राहिली. खीमुक्ती आंदोलनाचा कदाचित हा पहिला प्रखर आवाज होता. ज्यामुळे समाजात खळबळ तर माजली परंतु त्याचे कौतुकही झाले.

न. चिं. केळकरसारख्या साहित्यसम्राटांनी या कादंबरीची प्रशंसा करताना ही कादंबरी हरि नारायण आपटेच्या कादंबरीपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे, हे सिद्ध केले. खरी गोष्ट तर ही आहे की, पुण्यातील साहित्यिकांनी मामांची खूपच उपेक्षा केली होती आणि त्यांना साहित्यविश्वातून बेदखल करण्याचे प्रयत्न केले होते. म्हणून मामांनी आपली पहिली कादंबरी 'विधवा कुमारी', 'गतभर्तृका' या टोपणनावाने लिहिली आणि खळबळ उडवून दिली. लेखक म्हणून आपले नाव मामा गोपनीय ठेवू इच्छित होते. परंतु झाले असे की, याच कादंबरीचा दुसरा भाग 'पुनर्मिलन' प्रकाशित होण्यापूर्वीच कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने दावा केला की, 'विधवा कुमारी' त्यांनी स्वतः लिहिलेली कादंबरी आहे. या दाव्यामुळे मामांना आपल्या टोपणनावाचे रहस्य उलगडावे लागले. परंतु या रहस्योद्घाटनामुळे साहित्यविश्वात अधिकच खळबळ उडाली. 'विधवा कुमारी' कादंबरीची प्रशंसा करणारे न. चिं. केळकरांनीच नंतर लिहिले, 'ही कादंबरी मामा वरेरकरांनी लिहिली हे जर माहित असते तर आम्ही त्या कादंबरीची प्रशंसाच केली नसती.'

हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यक्तिगत मतभेदामुळे मराठी साहित्यविश्वात मामा सतत वादग्रस्त आणि चर्चेचा विषय झाले. तसेच हेही खरे आहे की मामा वरेरकरांनी लिहिलेल्या 'विधवा कुमारी' या कादंबरीने मराठीतील सामाजिक कादंबरीच्या परंपरेला विशेषकरून पारंपरिक स्त्रीचित्रणाला एक वेगळे परिमाण देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

आत्मपुराण

- महादेवशास्त्री जोशी

Page 26/ 31/ 62/ 70

पुरुषांच अन् मुलांचं काम उरकलं की न्हावी मग प्रत्येक घरच्या गोठ्यात जायचा. दीड-दोन महिने ताटकळल्याने ' तशा ' बायकांची दशा दयनीय व्हायची. पदर दाबून बसावायचा तरी किती ! अशा सगळचा बायका आत्मारामाच्या नावाने बोटं मोडीत त्याला' काळमुखा ' म्हणत. घरोघरी एक-दोन अशी गिऱ्हाइकं त्याला उरकावी लागायची.

कसं ते कोण जाणे ! समजायला लागल्यापासून या क्रूर रूढीची मला चीड होती. त्याला कारणही तसंच घडलं होतं. आमच्याच घरात राहणाऱ्या माझ्या आतेची सून! विचारी पंधराव्या वर्षी बालविधवा झाली. आमचा तो आतेभाऊ सांगलीला अध्ययनासाठी गेला होता, तो तिकडेच प्लेगने वारला. आमचं सगळं घर हुंदक्यांनी घुमलं अन् अश्रूनी भिजलं. या घटनेचं गांभीर्य समजण्याचं माझं वय नव्हतं. माझी ती वहिनी मला खूप आवडायची. गाडग्यात शिजवलेलं 'आटवल' ती मला रोज भरवायची. पण तिला गोठ्यात पाठवण्याचा 'समारंभ' ज्या दिवशी झाला अन् ती जेव्हा माथ्यावर पदर घेऊन रडत, आक्रंदत घरात आली, तेव्हा तिचं ते विद्रूप पाहून मी ढसढसा रडलो होतो. त्यानंतर मी कधीच तिच्याजवळ गेलो नाही.

आमच्या मुलांचं शिक्षण म्हणजे मुख्यत्वे अक्षरओळख. पुढे संध्या, वैश्वदेव, जानव्याचा मंत्र आणि डोक्यावरून पाणी म्हणजे रुद्र-पवमान !

आमच्या गावातल्या पुरुषांची पाच बोटं एखाद्या पुस्तकाला लागली आहेत, असं जन्मात कधी घडलं नाही. यामुळे कुळवाड्यांचा अन् आमचा सांस्कृतिक स्तर सामान्यपणे सारखाच. कुळवाड्यांसारखीच आमची विचारसरणी. आम्हीही देवदेवस्की, धाडीभगत हे सारं करीत होतो. त्यातला फोलपणा समजण्याइतकी आमची बुद्धी कधी विकसित झालीच नाही. कुळवाडी अन् भट यांच्यांतला एकच फरक म्हणजे भटाच्या खांद्यावरचं जानवं. आमच्या घरचा एकमेव 'ज्ञानग्रंथ' म्हणजे भितीवर टांगलेलं पंचांग. ते मात्र आम्ही सगळे वाचू शकत होतो. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग अन् करण हे आम्हाला माहीत होतं. 'अभकृ' किंवा 'विप्री आ' ही कशाची आद्याक्षरं आहेत, ते आम्ही जाणत होतो.

_____

आमच्या गावात विरेभट नावाची एक ' कीड' होती. बायको मेल्यावर त्याने एक 'विठ्ठल सवाशीण' घरात आणली होती. कुठनं आणली होती देव जाणे ! पण ती जन्मभर त्याला घरून राहिली होती, हे विशेष. हा विरेभट दिवसभर एका पंचाची 'काष्टी' लावून असायचा. त्याची पडवी म्हणजे गावाची चावडीच जणू ! विरेभट गावात कलागती लावण्यात नारदाचा बाप होता. त्याने वाळपईच्या काही अधिकाऱ्यांना 'मुखलेप' करून आपल्या कलागतींच्या मागे सामर्थ्य उभं केलं होतं. गावातले सगळे लोक त्याला वचकून असायचे. तो प्रथम एखाद्याचा बुद्धिभेद करी, त्याला तालुक्याला जायला लावी आणि 'दक्षिणा' घेऊन मग त्याच्या पाठीशी उभा राही. बरेचसे दावे विन-बुडाचे असल्यामुळे पुष्कळदा त्याला अपयशही येई. मग तो दुसरं शस्त्र बाहेर काढी. बहिष्कार ! ज्याने दावा जिंकला असेल त्याच्यावर सगळ्या गावाचा बहिष्कार ! विरेभटानं सांगितलं म्हणजे सगळ्यांना ऐकावंच लागे. बहिष्कृत व्यक्तीकडे कोणी जेवाखायला जायचं नाही. त्याला आपल्या घरी बोलवायचं नाही. त्याच्याशी बोलणंही टाकायचं. बहिष्कार म्हणजे त्या गावढ्या गावातलं एक 'ब्रह्मास्त्र' होतं. त्यामुळे बहिष्कृताचा जीव मेटाकुटीला यायचा. तो माणसांतूनच उठायचा.

आमच्या आजीवरही या विरेभटाने एकदा हा प्रसंग आणला होता. काही फणसाच्या झाडांवरून आजीचं भाव्यांशी भांडण होतं. विरेभटाने भाव्यांचा पक्ष घेतला होता. पण दिवाणीत आजीचा दावा खरा ठरला होता. विरेभटाच्या माथी अपयश आलं होतं. आणि ते धुवून काढण्यासाठी गावकी भरवून त्याने आमच्या घरावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारामुळे कानकोंडा कोण झाला असेल, तर तो मी. बरोबरीची मुलं माझ्या अंगणात येईनात. मला खेळायला घेईनात. शेजारी कुठे सत्यनारायण व्हायचा, कुठे लग्नकार्य व्हायचं, कुठे बारसं, कुंठे काही होत असायचं. सगळं गाव तिथे गोळा व्हायचं. मुलं गोंधळ घालायची. मी मात्र घरच्या घरी. मी त्या घराकडे नुसता बघत राहायचा. डोळे गाळायचा, घरात घड जवायचा नाही. माझी अशी सामा-जिक उपासमार झाली होती. आणि वर मुलं मला चिडवीत होती. त्या चिडवण्याला मी उत्तर देऊ शकत नव्हतो. माझ्या सगळया कळाच उतरल्या होत्या. आजीला हे जाणवलं. आपल्या एकुलत्या नातवाची ही 'अवस्था' तिला पाहवली नाही. तिने मग काय केलं असेल ते तिचं तिलाच ठाऊक ! कदाचित तिने विरेभटाचं 'हिरण्यश्राद्ध' केलं असेल. मग विरेभटाच्या सांगण्यावरून आजीने आमच्या घरी सत्य-नारायण केला. आणि मग त्याच्या तीर्थप्रसादाला सगळे ग्रामस्थ आमची पडवी चढले. मी पुन्हा माणसांत आलो.

_____

असं हे आमचं गाव ! आमचंच कशाला ! सगळीच गावं याच स्थितीची अन् एकाच प्रवृत्तीची. त्या काळी आधुनिक शिक्षणाकडे कोणी लक्षच दिलं नाही. आपला एखादा तरी मुलगा पोर्तुगीज शिक्षणाकडे घालावा, त्याला नवा मार्ग दाखवावा, असं कधी कोणाला भावलंच नाही. ते भावलं असतं, तर काही मुलं तरी पोर्तुगीज शिकली असती अन् त्यामुळे सरकारदरबारी होणारी भटांची मानखंडना टळली असती. महत्त्वाकांक्षा नावाची एक स्पृहणीय वस्तू असते अन् ती सारं जीवनच बदलून टाकते, हे कोणी त्यांना शिकवलंच नाही. सगळेच पूजा, पुरुषसूक्त अन् जानव्याचा मंत्र घोकीत राहिले. त्यांना आपल्या मागासलेपणाची, परावलंबित्वाची कधी खंत वाटलीच नाही.

मात्र एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. त्यांनी आपल्या गरीब संसाराचं कधी कोणापुढे प्रदर्शन केलं नाही. ते 'आल्या अतिथा मुठभर द्याया' कधीच चुकले नाहीत. त्यांच्या कपाळावर कधी आठी दिसायची नाही. चार लोक एकत्र जमले की हसून-खेळून वेळ घालवीत. सिने-नटाच्या ऐटीत ते विड्या फुंकीत अन् चंची सोडून नवाबी रुबाबात पान-तंबाखू खात. त्यांच्या अंतरात एक गोष्ट पक्की भिनलेली असे-

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असो द्यावे समाधान ।।

_____


अध्ययनाचा श्रगिणेशा

मला पाचवं वर्ष केव्हा लागेल, याची आजी जणू वाटच पाहत होती. ते पौषात लागलं आणि माघात तिने उपाध्यांना बोलावणं धाडलं. त्यांनी मुहूर्त पाहून माझ्याकडून गणपतिपूजन करून घेतलं. आतेने मातीचं वस्त्रगाळ चूर्ण करून धूळपाटी तयार केली. उपाध्यांनी मला चिमुट करायला लावून माझ्याकडून धुळपाटीवर 'श्रीगणेशायनमः ओनामासिधम्' ही अक्षरं काढून घेतली.

त्यानंतर मग आतेने माझा ताबा घेतला. तिने एका वर्षांत मला अक्षरओळख करवली. मग पहिली-दुसरीची पुस्तकं आणून ती माझ्या-कडून वाचून घेतली. त्या कामी मी आतेच्या हातचा थोडा प्रसादही खाल्ला. मला आठवतं, की त्यावेळच्या दुसरीच्या पुस्तकात 'एका कोळियाने' ही कविता होती आणि काळया पिऱ्याची गोष्टही होती. ती गोष्ट मला फार आवडायची.

अशा रीतीने पुस्तक वाचायला यायला लागल्यावर आतेनं मला आपल्या यजमानांच्या म्हणजे गाडगीळ भटजींच्या स्वाधीन केलं. त्यांनी लगेच शिक्षेची पोथी माझ्यापुढे उलगडली. 'अथ शिक्षां प्रवक्ष्यामि-' ज्याला शास्त्री-वैदिक व्हायचं असेल, त्याची अंकलिपी म्हणजे पाणिनीय शिक्षा. शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंटू आणि अष्टाध्यायी ही वेदाची पांच अंगं. ती पाचही मुंज होण्याच्या पूर्वी पाठ झालीच पाहिजेत, असा दंडक असायचा. अर्थात् ज्याला वेदशास्त्रसंपन्न व्हायचं असेल, त्यालाच हा दंडक लागू.

शिक्षा ही पाणिनीच्या नावावर असली, तरी तिचा कर्ता दुसराच कोणीतरी आहे. संस्कृत आणि प्राकृत श्लोक अन् वेद यांच्या योग्य उच्चारणासाठी शिक्षेची नितान्त गरज असते. शिक्षेमध्ये त्या उच्चारणाचे नियम सांगितले आहेत. प्राचीन काळापासूनच वैदिक लोक मंत्राच्या योग्य उच्चारासाठी कमालीची दक्षता बाळगीत. ती परंपरा आजतागा-यतही खंडित झालेली नाही. अस्सल वैदिकाने म्हटलेला मंत्र आणि परंपरागत अध्ययन न झालेल्या पुरुषाने उच्चारलेला मंत्र यातली तफा-वत कोणाच्याही कानाला सहज समजते. हे देणं त्या शिक्षेचं. हा ग्रंथ अवघ्या साठ श्लोकांचा आहे.

दुसरं वेदांग ज्योतिष. अवघ्या ३६ श्लोकांचा हा ग्रंथ लगधाने निर्माण केलेला आहे. वैदिक आर्यांना यज्ञयागासाठी दिशा, देश अन् काल यांच्या ज्ञानाची गरज होती. यज्ञाची कुंडं, आणि यज्ञमंडप यांच्या रचनेसाठी दिशासाधन आवश्यक असायचं. विशिष्ट नक्षत्रांवर विशिष्ट विधी करायचे असत. त्यासाठी नक्षत्र अन् ग्रह यांच्या गतिस्थितीचं ज्ञान होणं जरूर असायचं. ही गरज लगधाच्या ज्योतिष ग्रंथाने पुरी केली आहे. पिंगलनाग या छंदःशास्त्रज्ञाने छंद नामक वेदांग निर्माण केलं. मंत्र म्हणायचा तर छंदज्ञान अत्यावश्यक होय. ऋग्वेद हा सात मुख्य छंदात निबद्ध असून हे अक्षरपरिमाणाचे छंद आहेत. इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा वसंततिलका इत्याडी छंद हे लौकिक होत. ते गणबद्ध आहेत. त्यांचीही लक्षणं सांगून लगधाने पुढे संस्कृत काव्याचं अध्ययन करणाऱ्यांची सोय करून ठेवली आहे.

निघंटू म्हणजे वेदांतल्या कठीण शब्दांचा कोश. प्रजापतिकाश्यप हा या कोशाचा कर्ता आहे. 'गौः ग्मा, क्ष्मा, क्षमा इथून याची सुरुवात होते. याचे पांच अध्याय आहेत. पहिल्या तीन अध्यायांत सगळे एकार्थ-वाची शब्द आहेत. चौथ्या अध्यायांत अनेकार्थवाचक शब्द येतात. पांचवा अध्याय हा दैवतकांडाचा आहे. याच निघंटूवर आधारून यास्काने आपलं निरुक्त लिहिलं आहे.

अष्टाध्यायी हे पांचवं वेदांग. हा व्याकरणाचा ग्रंथ आहे. नांवावरूनच त्याचे आठ अध्याय आहेत, हे कळून येईल. हा ग्रंथ पाणीनिक्कृत असून तो सूत्रबद्ध आहे. यांतली काही सूत्रं अगदी छोटी, तर काही मालगाडीसारखी लांबलचक आहेत. काहीतर सगळी जोडाक्षरांचीच आहेत. ती पाठ करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. पण प्रयत्नाने ती मुखो-द्गत केली, तर जीभ तलवारीच्या पात्यासारखी 'धारदार' होते. 'अशी लवे, तशी लवे !'

एवढं सगळं पाठांतर करून मी आठव्या वर्षी मुंजीला उभा राहिलो. आजी खूष होती. माझं योग्य तेवढं अध्ययन झाल्याचा तिला आनंद झाला होता. ही सारी गाडगीळभटजींची कृपा होती. म्हणून मग आजीने माझ्या मुंजीचा थाट उडवून दिला. साऱ्या सत्तरीला सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण धाडलं. शकुनउंडे हे पक्वान्न. वर तुपाची धार. आजीने त्या बाबतीत 'वित्तशाठ्य' केलं नाही. मुंज म्हणजे उपनयन. आणि उपनयन म्हणजे पुढील अध्ययनासाठी बटूला गुरुगृही पाठवणं. अवघ्या आठ वर्षाच्या नातवाला पदराखालून दूर करणं.

आजीने तीही तयारी आधीच करून ठेवली होती. धावे हे आमच्या गावाला लागूनच असलेलं गांव. तिथे माझी मावशी राहत होती. तिचे यजमान दामोदरशास्त्री जोशी हे व्युत्पन्न होते. आजीने मला तिथे ठेवायचा निर्णय घेतला. रामनवमी हा प्रस्थानाचा मुहूर्त निश्चित केला. हे सगळं खरोखर माझ्या जिवावर आलं होतं. विद्येसाठी कष्ट सोसणं भाग आहे, ही जाणीव निर्माण होण्याइतकं ते माझं वयही नव्हतं. पण मी अगतिक होतो.

पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. सकाळच्या वेळची संथा माझी कधी चुकली नाही. दत्तूमामा त्या बाबतीत मात्र तत्पर होता. उणीपुरी अडीच वर्षं मी मावशीकडे राहिलो. तेवढ्या अवधीत मी शब्द-रूपावली, समासचक्र आणि अमरकोश एवढं सुखेनैव पाठ केलं. माझी पाठशक्ती चांगली होती. मी 'एकपाठी' नसलो तरी 'त्रिपाठी' खासच होतो. कोणताही श्लोक तीन वेळा म्हटला किंवा लक्ष देऊन ऐकला, की तो मला पाठ होत असे. अमरकोश हे भारतीय संस्कृत साहित्यातलं एक आठवं आश्चर्य आहे. तो शब्दकोश खरा; पण श्लोकबद्ध. त्याची तीन कांडं असून तिन्ही मिळून त्यांत दहा हजार शब्द आहेत. एकाच शब्दाला कितीतरी प्रतिशब्द. उदाहरणार्थ 'देव' हा शब्द घ्या. त्याचे अमर, निर्जर, त्रिदश, विबुध, सुर, त्रिदिवेश, दिवौकस असे कितीतरी पर्याय शब्द त्यात आहेत. शब्दाचे प्रतिशब्द तर कळावेच; पण त्याबरोबरच त्याचं लिंगही समजावं, अशी त्याची आश्चर्यकारक रचना आहे. त्याचं खरं नांव आहे, 'नालिगानुशासनम्' पण कोण्या अमरसिहाने तो रचला असल्यामुळे 'अमरकोश' याच नांवाने तो प्रसिद्ध झाला. आजही संस्कृताच्या अभ्यासकांच्या तोंडी तेच त्याचं नाव आहे. असं पुष्कळ ग्रंथांच्या बाबतीत घडलं आहे. ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरांनी दिलेलं नांव आहे 'भावार्थ दीपिका.' पण त्या नांवाने वारकरीसुद्धा त्याला ओळखणार नाहीत. ज्ञानेश्वरकृत म्हणून ज्ञानेश्वरी हेच त्याचं नाव सर्वांच्या तोंडी बसलेलं आहे. अमरकोशाचीही तीच कथा ! अमरकोशावर अनेक पंडितांनी टीका लिहिल्या आहेत. यावरून संस्कृत भाषेच्या अभ्यासकाला प्राचीनकाळापासूनच अमरकोशाचं किती महत्त्व होतं ते कळून येतं. अमरकोशामुळे संस्कृतभाषेच्या महासागरांत सुखाने प्रवेश करता येतो. त्याच परिपाटीला अनुसरून मीही अमरकोश पाठ केला यात नवल नाही. त्या बाळपणी पाठ केलेल्या ग्रंथाचा मला अजूनही उपयोग होतो. कोणी एखाद्या संस्कृत शब्दाचा अर्थ विचारला, तर मी अमरकोशातली ती पंक्तीच म्हणून जातो.

अमरकोश मुखोद्गत झाल्यावर गुरुजींनी माझ्या हातात रघुवंशाचं पुस्तक दिलं. गुरुजींची शिकवण्याची पद्धत फार चांगली होती. ते शिकवीत नसत; तर विद्यार्थ्याला स्वतःच शिकायला लावीत. रघुवंश हे संस्कृत रसिकांच आवडतं महाकाव्य. कालिदासाला पंडित मंडळी कालि-दास म्हणून उल्लेखण्याऐवजी 'रघुकार' याच पदवीने उल्लेखितात. गुरुजींनी त्यांतले दुसरा अन् पांचवा हे दोन सर्ग मला पाठ करायला लावले अन् तेवढ्यांचाच अभ्यास घेतला. ते दोन्ही सर्ग पदच्छेद, समास, विग्रह, अन्वय, प्रतिशब्द अशा प्रकारे घोटून घोटून घेतले. त्यावरची मल्लिनाथीही वाचायला लावली. मला मल्लिनाथी कळत नसे. पण गुरुजी म्हणत, 'वाचीत जा, आपोआप कळायला लागेल.' आणि झालंही तसंच. थोड्या काळानंतर मला संस्कृतात रस वाटू लागला. हा लाभ सर्वांत मोठा होता.


कोलाज - अमेरिकेच्या अंतरंगाचा

 कोलाज - अमेरिकेच्या अंतरंगाचा

संपादकः

डॉ. लतिका भानुशाली

डॉ. गजानन सबनीस


लेख: डॉ. भूषण केळकर ( पान १८० आणि १८१)


तिथे 'आवश्यक' या सदरात मोडणाऱ्या गोष्टी इथे 'लक्झरी' या सदरात मोडतात. इथे कामातील चालढकल, नवीन गोष्ट शिकण्यामागची अनुत्सुकता, 'काय फरक पडतो' ही प्रवृत्ती या मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत.

परदेशातील आणि विशेषतः अमेरिकेतील वास्तव्याचा लेखाजोखा मांडायचा म्हटला तर अमेरिकेत काय कमावलं ही यादी खरंच मोठी आहे। श्रमप्रतिष्ठा, देशाभिमान, कुतूहल असलं तरीही दुसऱ्याच्या जीवनात 'भोचकपणा' न करण्याचं सौहार्द, स्वतःच्या स्वातंत्र्याबरोबरच दुसऱ्याचेही स्वातंत्र्य मानण्याची वृत्ती, कामाप्रती उत्तरदायित्व, दिलेला शब्द पाळणं हे प्रमुख ! व्यावहारिक-वैयक्तिक पातळीवर आर्थिक संपन्नता-स्यैवं, अनुभवसंपन्नता आणि निःसंशयपणे जागतिक दृष्टिकोन !

अमेरिकेतील वास्तव्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या गमावल्या त्यात पहिलं म्हणजे आई-वडील व बहीण यांसोबतची १५ वर्षे; जी हानी कधीच भरून निघणार नाही. दुसरं म्हणजे १९९१ ते २००५ पर्यंत आर्थिकी उदारीकरणामुळे भारत ज्या ऐतिहासिक संक्रमणातून जात होता त्यात प्रत्यक्ष सहभाग घेता न आल्याची खंत!

भारतात परत येऊन काय गमावलं ? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती ! (अर्थात 'निष्काम कर्मयोगाचे फुकट धडे' ही त्याची जमेची बाजू!) खरोखरच सामान्य असणाऱ्या (लायसन्स, गॅस, लाइट, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, सर्वांची लाडकी KYC...!) गोष्टीतील अनाकलनीय क्लिष्टता, दिरंगाई, बेमुर्वतखोरपणा, त्यात 'दुष्काळात तेरावा' म्हणून जात-पात-धर्म या विषमतेच्या वल्लीवर उभी असणारी संवेदनाशून्य सरकारी यंत्रणा - त्यामुळे बोकाळलेली 'चलता है', 'मला काय त्याचे' ही बेपर्वा समाजव्यवस्था आणि या सर्वातून एकसमयावच्छेदेकरून उभरणारी निराशा जी निष्क्रियतेला खतपाणी घालते त्यामुळे नवनिर्मितीच्या ऊर्मीला पडलेली खीळ!

भारतात येऊन काय कमावलं, याची यादी पण उपर्युक्त कारणांमुळेच, केवळ टीका करत न बसता ते बदलता कसे येईल याचा आपल्या परीने जीव ओतून यशापयशाची क्षिती न बाळगता, ठाम निर्धाराने काम करत राहण्याच्या प्रयत्नवादाने सुरू होते आणि त्यानेच संपते! 

१८० / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा


मला खरंच वाटतं की अमेरिकेकडून बर्गर घेण्यापेक्षा तेथील श्रमप्रतिष्ठा प्यावी! इथे देवी स्वरूपातील पूजन करता करता 'निर्भया' घडते अन् त्यानंतर संवेदनाशून्य भाष्ये घडतात. यापेक्षा अमेरिकेतील (तुलनेने) स्त्रियांचे सन्माननीय स्थान घ्यावे! जेमतेम ४०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या त्या देशाकडून, त्यापेक्षा कित्येक पट देदीप्यमान इतिहास असणाऱ्या भारताने, डोळस अभिमान शिकावा! जात-पात-पंथ यात शकले झाल्याने एकेकाळची सुवर्णभूमी भारत, इस्लामी अन् इंग्रज आक्रमकांकडून कशी बलात्कारीत झाली हे समजूत घ्यावे! त्या गेल्या सहस्रकाची काजळी आपण प्रखर राष्ट्रवादाने पुसून, कसे पुरून उरू शकतो हे अमेरिकेकडून शिकावे! आणि हे शिकू शकू की 'कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' अथवा 'अवघे विश्वचि माझे घर' हा भारताचा मूलभूत हुंकार आपण स्पष्टपणे उमटवू शकतो, हा विचार महत्त्वाचा आहे.


हवी आहे ती गतानुगतिकाची मरगळ झटकून, हा शतखंडित समाज एकदिलाने उभा राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ! हवी आहे ती इतिहासाचे अगतिक दास न होता 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' ही वृत्ती सोडण्याची दुर्धर जिजिविषा !! हवी आहे भूतकाळात अडकून न पडता, विज्ञान अन् नाविन्याची कास धरत, नवचैतन्याने उजळून जाऊन, भविष्याचे कर्तुमकर्तुम स्वामी होण्याची प्रखर विजिगीषु मनोधारणा !!!


मुलाखतकार - लतिका भानुशाली / गजानन सबनीस

शब्दांकन : लतिका भानुशली

_____


लेखकः प्रशांत कर्‍हाडे (पान २०४ ते २०७)

माझ्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे, एकंदरीत अमेरिकेतील लोक आयुष्याकडे कसे बघतात, कसे जगतात याविषयी कळले. आता गेली बारा वर्षे मी भारतात आहे पण अमेरिकेविषयीचे विचार सतत माझ्या मनात येतात आणि त्याची तुलना भारताशी करतो. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

अमेरिकन लोक मुळातच शिस्तप्रिय व नियमांचे पालन करणारे आहेत. माझ्यामते बहुतेक अमेरिकन हे प्रामाणिक असतात. आयुष्य हे ठराविक पद्धतीनेच जगले पाहिजे अशी त्यांची धारणा नसते. प्रत्येक अमेरिकनला एक भले मोठे घर, ज्यात कमीतकमी तीन बेडरूम्स्, दोन गाड्या, त्या पार्क करायला गॅरेज असावे असे वाटते. प्रत्येक मार्ग हा "बरोबरच" हे ते जाणतात. अमेरिकन तुम्हाला नेहमी असं विचारताना आढळतील. तुला काय आवडते? काय आवडत नाही? किंवा तू काय चांगले करू शकतोस? किंवा याबाबतीत तुझं काय मत आहे? या प्रश्नांमध्ये त्याचा जोर "तू" या शब्दावर असतो. अगदी लहान मुलांनाही असे प्रश्न विचारले जातात. ज्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व व्यक्तिविशेष (इंडिव्हिज्युएलिटी) जोपासले जातात "यंग अॅडल्ट" हा शब्द मला खूप आवडतो. मला खात्री आहे की हा शब्द अमेरिकन मंडळींनीच शोधून काढला असणार.

याउलट बहुतेक भारतीय मंडळी, आपली रोजीरोटी कमविण्यात व्यस्त असतात. मग नवीन शोध लावण्यासाठी व वर्चस्व मिळविण्यासाठी वेळच कुठे आहे? पण आश्चर्य याचे वाटते की ज्या लोकांकडे अमाप पैसा आहे, त्यांनी सुद्धा नवीन शोध नाही लावले. टाटा मोटर्स कित्येक दशकांपासून ट्रक्स बनवत आहेत. त्यात काही नाविन्यपूर्ण सुधारणा करून डबल फ्युएल एफिशन्सी ट्रक्स का बनवले नाहीत? मोठमोठ्या इंडियन आयटी कंपन्या, त्यांच्या सर्व्हिसेस, परदेशी कंपन्यांना देऊन, सुस्थितीत आहेत. पण कोणी आयपॉड किंवा फेसबुक बनविण्याचा विचार का केला नाही?

२०४ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा


मला वाटतं अमेरिकन्स नेमके यातच वेगळे आहेत. नाविन्याचा शोध घेण्यासाठी, धोका पत्करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. जेव्हा केव्हा काही "वेडे" यशस्वी होतात, तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांना व समाजाला भरभरून दान देतात. त्यामुळे अजून बरेच "वेडे" तयार होतात. सुजनतेला मदत करण्यासाठी एक अख्खी इकोसिस्टिम अमेरिकेत आहे. म्हणून ते जगावर राज्य करतात.

अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवला व अवकाश जिंकले. त्यांनी सेमीकंडक्टर्स, कॉम्प्युटर्स, मोबाईल शोधून काढले. नवनव्या क्रांतीकारक, एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजीजही शोधून काढत आहेत. थोडक्यात काय ते आज जगावर राज्य करत आहेत आणि अजून काही शतकेही तसंच करत रहाणार.

अमेरिकन लोक "गुड डील-बॅड डील" या चक्रव्यूहात अडकले आहेत आणि गुड डील आहे म्हणून किंवा आपल्या खिशाला परवडतं म्हणून कुठली गोष्ट न घेता, त्याची गरज आपल्याला आहे का? हा साधा, सोपा विचार करण्याची क्षमता गमावून बसले आहेत.

त्यांचे खाद्यसंस्कृतीवरील प्रेम पाहून, आपले मन सुन्न होऊन जाते. अमेरिकेमध्ये जेव्हा मी प्रथम तेथील सॉफ्ट ड्रिंकच्या कपाचा साइज बघितला, तेव्हा अवाक् झालो. यामुळेच अमेरिकन लोक गलेलठ्ठ होत चालले आहेत. अतिसमृद्धीचा हा विकार अमेरिकन लोकांमध्ये झपाट्याने पसरत चालला आहे. काही वेळा अशा या गलेलठ्ठ लोकांकडे मी आवासून बघत असे, तेव्हा ते माझ्याकडे वैतागून पहायचे, मी संकोचून जायचो. हे कमी म्हणून की काय, ते अर्धी चड्डी घालत असत. अमेरिकेत जितके नेत्रसुख मिळू शकते, तितकेच डोळ्यांवर अत्याचारही होऊ शकतात.

केवळ अती खाणे हा एकच मुद्दा नाही तर एक साधारण अमेरिकन एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये जेवताना जितका कचरा निर्माण करतो, ते फार भयानक आहे. अमेरिकन लोकांचा, वीजेचा दरडोई उपयोग, हा जगात एक नंबरचा आहे. त्यामुळे प्रदूषण करण्यात पण त्यांचा प्रथम क्रमांक लागतो. एकंदरीत विकसित देशातील वीस टक्के लोकसंख्या, जगातील ऐंशी टक्के ऊर्जा स्रोत व खनिज संपत्ती वापरत आहेत. त्यांनी याविषयी निश्चितच विचार करणे गरजेचे आहे.

२०५ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगा


करमणूक हा अमेरिकेतील जीवनाचा एक महत्त्वाचा भाग, त्यांच्याकडे मोठे व प्रसिद्ध चार खेळ आहेत. फुटबॉल (त्यांचा जीव की प्राण), बेसबॉल (वेळ घालविण्याचे प्रमुख साधन), बास्केट बॉल व ICE हॉकी. या सर्वांच्या वेळा चांगल्या पद्धतीने आयोजित केलेल्या असल्यामुळे, वर्षभर त्यांची खेळाद्वारे करमणूक चालू राहते. मी हे सर्व खेळ पहात होतो. मी त्यांचा आनंद मनमोकळेपणाने लुटला. या सर्व खेळांचे वैशिष्ट्य असे की हे सर्व खेळ, बहुतांश वेळेला तीन तासात संपतात. त्यामुळे त्यांच्या ऑफिस कामावर त्याचा परिणाम होत नाही.

अमेरिकेमध्ये खेळाशिवाय "सिटकॉमस" हे त्यांच्या दैनंदिनीचा मोठा भाग आहेत. माझ्या वास्तव्यात, मी बऱ्याच सिटकॉमस पाहिल्या. त्यातील साईन फेल्ड व होम इम्प्रुव्हमेंय, या माझ्या सर्वात आवडत्या. माझ्यासारख्या संगीतप्रेमींसाठी, संगीताचा आनंद लुटायला, अमेरिकेत भरपूर वाव आहे. जॅझ संगीत मला विशेष प्रिय होते. या संगीतनिर्मितीचा अमेरिकन लोकांना खूप अभिमान वाटतो.

निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या पैशाचे प्रयोजन कसे करायचे हा प्रश्न अमेरिकेला पण समाधानकारकरित्या सोडवता आलेला नाही, त्यांची लोकशाही व्यवस्था २४० वर्षे जुनी असूनही ! निवडणूक प्रचारासाठी प्रचंड पैसा लागतो. हा पैसा अतिश्रीमंत उद्योजकांकडूनच उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीवर मूठभर अतिश्रीमंत उद्योजकांचेच नियंत्रण राहणार. तुम्हास आवडो अथवा न आवडो. म्हणूनच अमेरिकन्स म्हणतात की लोकशाही ही परिपूर्ण व्यवस्था नाही. पण उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी सर्वश्रेष्ठ मात्र आहे !

श्रेष्ठ असो अथवा नसो, पण अमेरिका त्यांच्याकडे लोकशाहीखेरीज इतर कुठली पद्धती येऊ देणार नाही. पण स्वतःच्या फायद्यासाठी, इतर देशांमध्ये हुकूमशाहीची स्थापना करण्यास त्यांनी कधी पुढे-मागे बघितलं नाही. ते स्वतःच्या नागरिकांना सन्मानाने वागवतात. पण दुसऱ्या देशातील नागरिकांना मात्र कस्पटाप्रमाणे वागवतात. अमेरिकन लोकांना, त्यांचे सरकार, बाकीच्या देशात जाऊन काय धुमाकूळ घालतात, हे माहीतही नसते.

२०६ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा


कधी कधी तिथे स्वातंत्र्याचा अतिरेक होतो. अती खाणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक आहे. एक डझनापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवणे या लैंगिक स्वातंत्र्याचा अमेरिकेत अतिरेक झाला आहे असे मला वाटते. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले पण मानसिक आजार असलेल्या माणसाला है स्वातंत्र्य देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलित देणे आहे आणि त्यामुळेच अमेरिकन शाळांमध्ये अंदाधुंद गोळीबाराच्या कित्येक दुर्दैवी घटना घडत आहेत. जीवनातील समप्रमाणाचा अभाव हे अमेरिकेतील बऱ्याचश्या, व्यक्तिगत व सामाजिक समस्यांचे मूळ आहे असे वाटते.

याउलट या स्वातंत्र्याची एक सकारात्मक बाजूही आहे आणि गुणवत्ताधारित पद्धतीमुळेच, तेथील लोकांची व देशाची चांगली प्रगती झाली आहे. त्यामुळे सर्व जगातून गुणवंत व बुद्धिवंत माणसे तिथे आकर्षिली गेली. अमेरिकेत या, काम करा, निर्मिती करा आणि आपला स्वतःचाही उत्कर्ष करा. हेच खरे अमेरिकेचे घोषवाक्य आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे २०व्या शतकापर्यंत, अमेरिकेत येणाऱ्यांचे प्रमाण कमी असायचे. हे लोक आल्यानंतर अमेरिकेत स्थायिक व्हायचे. काही वर्षातच, तेथील पद्धती आत्मसात करायचे. पण गेल्या काही दशकांपासून मात्र अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. आणि आता ते अमेरिकन पद्धतीचा भाग बनत नाहीत तर ते त्या भागातून आलेल्या लोकांचे समूह बनवितात. यामुळेच सध्या अमेरिकेमध्ये, इतर नागरिकांविषयी द्वेषाचे वातावरण वरचेवर वाढत चालले आहे. ५० वर्षांनी अमेरिका हा अमेरिकन लोकांपेक्षा, आफ्रिकन अमेरिकन, एशियन व मेक्सिकन यांचा जास्त असेल. मग "मूळचे" अमेरिकन कसे वागतील, ही माझ्यासाठी कुतूहलाची गोष्ट आहे.


मुलाखतकार - लतिका भानुशाली 

शब्दांकन : पुरुषोत्तम आणि पद्मा कर्‍हाडे

आलोचनेचे सांस्कृतिक कार्य

 मराठी संशोधन पत्रिका (एप्रिल  - सप्टेंबर २५)


आलोचनेचे सांस्कृतिक कार्य

(आलोचनेला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रसिद्ध झालेल्या संवादिनी या स्मरणिकेतील लेख)

चंद्रकांत बांदिवडेकर


आज विज्ञानाच्या साहाय्यानें प्रगति करून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच देशांपुढे एक फार मोठे सांस्कृतिक संकट उभे आहे. विज्ञानाच्या पोटांतून निर्माण होणाऱ्या टेक्नॉलॉजीनें इतकें अवाढव्य स्वरूप प्राप्त करून घेतलें आहे की, हा भस्मासुर प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचीच राखरांगोळी करून टाकतो आहे असे नाही, तर समाजाच्या विकासाची सर्वच बाजूनें कोंडी करील असें लक्षण अत्यंत प्रगत देशांतूनहि दिसूं लागलें आहे. एका बाजूनें कांहीतरी भव्य व विराट करण्याच्या आकांक्षांनीं पछाडलेला अमेरिकन समाजांत माणसाच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या स्वातंत्र्याचा लोप होऊं लागलेला आहे व तो एकमेकाला न ओळखणाच्या, न समजावून घेऊं शकणाऱ्या बिनचेहऱ्याच्या माणसांच्या गर्दीचें स्वरूप प्राप्त करून घेऊ लागला आहे. विज्ञान व टेक्नॉलॉजीच्या विकासाच्या बळावर अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या कर्तृत्वानें स्वत्व विसरून त्या मार्गानें जाणाऱ्या समाजांवर आज ना उद्यां हे संस्कृतिविनाशाचे व आत्मभान विसरून सर्व बाजूनें धक्के खाणाऱ्या माणसांच्या समूहाचे रूप प्राप्त होण्याचें संकट वेगानें येत आहे. याच जोडीस भारतांत लोकशाही स्वरूपाच्या राज्यव्यवस्थेचें व समाजव्यवस्थेचें ध्येय ठेवलेलें आहे. लोकशाहींत प्रत्येक माणसाच्या व्यक्तित्वाची प्रतिष्ठा हें प्राणभूत तत्त्व असलें, तरी संस्कृतिरहित व संस्कारविहीन समाजांत या लोकशाहीचीं कटु फळें प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते. हीं कटु फळे म्हणजे राजकीय दारुण वंचना. त्याचबरोबर जनता हें सर्वच चांगल्या गोष्टींचे, मूल्यांचे व ध्येय धोरणांचे निर्मिति-क्षेत्र आहे, जनता जनार्दन आहे, असा एक अपसमज निर्माण होतो. या अपसमजांतूनच जनतेला जें हवें तेंच योग्य म्हणून तेंच द्या असा आग्रहहि होतो. इथूनच सर्वच मूल्यांचा गोंधळ सुरू होतो. जें जनतेंला हवें ते देण्याच्या विचारांतून जो लोकशाही लोकानुनय सुरू होतो त्यांतून सर्वच 'पॉप्युलर' गोष्टींना या ना त्या रूपानें राजकीय आश्रय मिळतो. यांतून सांस्कृतिक मूल्यांचें जतन करण्यासाठीं धडपडणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाविषयीं एक प्रकारची अनावडच नव्हे, तर तिरस्कारबुद्धि निर्माण होते. अशा समाजाच्या सांस्कृतिक कार्यासाठीं लोकाश्रय नाहींसा होतो आणि राजाश्रय देण्याचें शासनाला फारसें प्रयोजनच नसतें. एवढेच नव्हे, तर ही सांस्कृतिक मूल्यांचे जतन करू पाहणारी मंडळी लोकदृष्ट्या अव्यवहारी व वेडी ठरत असतात. या सर्वच प्रक्रियेत भर घालणारी एक घटना म्हणजे शिक्षणाच्या सार्वत्रिकतेचा शासनाचा प्रयत्न. लोकशाही काय किंवा सार्वत्रिक शिक्षण काय दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, असे कोणीच म्हणू शकणार नाहीं. पण त्यांची एक धोकादायी बाजू असते व ती यांचा अर्धवट व्यापार करणाऱ्या समाजात फार घातक ठरू शकते याची पुरेशीं दखल शासनकर्त्यांनीं व लोककल्याण करणारांनी नेहमींच घेतली पाहिजे व या घातक बाजूंचा प्रभाव शक्य तों कमी व्हावा म्हणून अल्पसंख्यांकांच्या सांस्कृतिक प्रयत्नांची बूज सतत राखली पाहिजे. सार्वत्रिक शिक्षणाच्या पातळ पण सर्वव्यापी प्रवाहामुळे कला, ललित साहित्य, सांस्कृतिक (?) कार्यक्रम, यासंबंधी अर्धवट जिज्ञासा निर्माण होते व आपली पातळी गाठण्याच्या पाण्याच्या गुणधर्माप्रमाणे समाज आपली जिज्ञासा व भूक कला व साहित्य यांच्या सुलभ, सहज पचणाऱ्या, फारसे बौद्धिक परिश्रम न करतां मजेत वेळ घालवतां येण्याचे साधन बनणाऱ्या कथांना आश्रय देतो. आठ तासांचा कामाचा दिवस तंत्रविध्ये तंत्रविद्येच्या विकासामुळे शक्य झाला व मिळालेल्या पु फुरसतीचा उपयोग कसा करावा, ही समस्या निर्माण झाली. शारीरिक व मानसिक (फारसे सर्जनशील नसलेले) परिश्रम केल्यावर विरंगुळा म्हणून कांहीहि करण्याचा अधिकार सहजपणे मान्य होतो. समाजाच्या या गरजा भागविण्यासाठी रेडिओ, दूरदर्शन, पॉकेट बुक प्रकाशनें, भानगडी व सनसनाटी बातम्यांवर पोसणारी नियतकालिके पोसणारी नियतकालिकें,  लोकाभिरुचीस पोसणारी नृत्य, नाट्य, संगीत यांचीं भ्रष्ट रूपें, सामान्य जनतेच्या 'थ्रिल'च्या आकांक्षा पोसणारी व वाढवणारी रहस्यकथा, लैंगिक कथा, विज्ञानकथा, भूतपिशाच्च कथा, भडक व कलागुणशून्य जाहिरातीच्या पातळीवरचीं चित्रे, या सर्वांतून एक गर्दीची संस्कृति (?) जोपासली जाते व तीत अस्सल व शुद्ध स्वरूपाची समाज-संस्कृति विरून जाऊं लागते. ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची व आश्चर्य वाटावे इतकी शक्तिशाली असते की, मोठ्या मोठ्या विचारवंतांनाहि ती पचवू शकते. गर्दी बघितल्यावर गर्दीला आवडणाऱ्या कोपरखळ्या व फिरक्या घेणारे, मुद्द्यांपेक्षां गुद्द्यांवर उतरणारे, तिरकसपणे बोलून गुदगुल्या करणारे, समाजांत बौद्धिक व वैचारिक वातावरण जिवंत ठेवणाऱ्या कांहीं थोडक्या विद्वानांची टिंगल करीत अज्ञानवंताची लोकांना रुचणारी पण छद्मी मुद्रा धारण करणारे, मैदानमारू व सभाजितसिंह वक्ते या गर्दीच्या संस्कृतीला बळी पडलेले असतात. लोकानुनय केवळ राजकीय स्वार्थासाठीं राजकीय नेतेच करतात असे नव्हे, तर प्रतिष्ठित लेखक-धुरीणहि करीत असतात.


या गर्दी-संस्कृतीचे भवितव्य काय असेल तें असो. जें घडत जातें तें अटळच आहे व त्यापुढे मान तुकवूनच लव्हाळी जिणें जगणें भाग आहे, अशी माणसांची वृत्ति मोठ्या प्रमाणावर बनत आहे. या सर्वव्यापी सांस्कृतिक विनाशाचा सामना करणारी काही मोजकी मंडळी असतात. कांहीं मोजक्या संस्था असतात. यांतील कांहींना आपल्या अंतिम पराजयाची कल्पना असते. पण ते अभिमन्यु वृत्तीनें चक्रव्यूहाचा भेद करीत आंत जात असतात कांहींच्या ठिकाणी बळकट आशावाद असतो. त्यांत कदाचित अननुभवीपणाचा उत्साहहि असण्याची शक्यता असते. या थोडक्या मोजक्या प्रयत्नांत 'आलोचने' सारख्या निष्ठेनें, जिद्दीने व त्यामानाने चालविलेल्या प्रयत्नाचा समावेश करावा लागेल. 'आलोचने'च्या या व्यापाचा विचार करतां हे मासिक तडजोड न करतां वीस वर्षे चाललेंच कसें याचें आश्चर्य वाटावें. खरोखर एका बाजूला भडक, सनसनाटी 'व्हल्गर' रुचि पोसणारी नियतकालिकें व दुसऱ्या बाजूला 'आलोचने' सारखे मासिक यांचा विचार केला, तर 'आलोचना' चालवणाऱ्या व त्यासाठी लिहिणाऱ्या लेखकांचा कितीहि गौरव केला, तरी तो थोडाच आहे. एकूण आजच्या साहित्यिक परिस्थितींत (वाचकवर्गाची आवड, संख्या, लोकप्रिय कला व साहित्यप्रकारांचे वाढतें पीक, दर्जेदार साहित्याचा मोबदला मिळण्याची अशक्यता इ.) चांगले साहित्य कां लिहिले जात नाहीं याची चिंता करतांना जें थोडेसें मोजके साहित्य निष्ठेनें लिहिलें जाते आहे ते कसे निर्माण होतें याचेच आश्चर्य वाटावें अशी एकूण स्थिति आहे. म्हणूनच सांस्कृतिक ऱ्हासाच्या व विनाशाच्या छायेखाली 'आलोचने'ने वीस वर्षे दिलेला जीवनमरणाचा मूक लढा फार महत्त्वाचा व मोलाचा वाटतो.


साठोत्तरी मराठी कादंबरीतील पर्यावरणीय अनुभवाचे स्वरुप

 मराठी कादंबरी: सृष्टी आणि दृष्टी 

डॉ. सुहास पुजारी

साठोत्तरी मराठी कादंबरीतील पर्यावरणीय अनुभवाचे स्वरुप

लेखकः अनंत मनोहर पुस्तकः अरण्यकांड (मौज प्रकाशन)

जंगलनाशाचे अनेक संदर्भ 'अरण्यकांड' मध्ये विखुरले आहेत. जंगल जगले पाहिजे ही मनोहरांची प्रेरणा त्यामागे दिसते. पर्यावरणाच्या रक्षणाचे मूल्यभान त्यांना आहे. त्यामुळे ललितकृतीत देखील अनेक संदर्भाची ते जाणीवपूर्वक पेरणी करतात. निवेदनाच्या ओघात येणारे हे तपशील पहा, "आता जंगल तुटत चालले. कबिनी, नुगू, लिंगनमक्की, भद्रा, काळीनदी या योजनांमुळे जंगलाचा संकोच झाला. दांडेलीला पेपरमिल आली. या कारखान्यामुळे अमाप वृक्षतोड झाली. नव्या वस्तीसाठी जंगल आणखी आखडले. हत्तींची तर कत्तल चालल्येय. नुसत्या १९८२ ते १९९२ या दहा वर्षांत चोर-शिकाऱ्यांनी सुळेवाले एकशे सव्वीस नर हत्ती पाडले आणि आता मोठे हत्ती मिळत नाहीत तर ते सुळेवाल्या तरण्या व लहान हत्तींचीही शिकार करतात. पूर्वी पाच माद्यांमागे दोन नर असे प्रमाण होते, त्यामुळे हत्तींची संख्या वाढत होती. आता हे प्रमाण शंभर माद्यांमागे एक नर एवढे कमी झालेय." (अरण्यकांड, पृ. १२६-१२७) विकासाच्या विविध योजनांमुळेही पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. 'अरण्यकांड' ला कर्नाटकातील अगुंब्याच्या जंगलाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कर्नाटकातील विकास योजनांचा परिणाम तिथल्या पर्यावरणावर व जंगलक्षेत्रावर कसा होत आहे, याचे संदर्भ'अरण्यकांड' मध्ये येतात.

'अरण्यकांड' मधून व्यक्त होणारे हे वन्यपशूंच्या हत्येचे, ऱ्हासाचे वास्तव चित्र तथाकथित मानवी संस्कृतीला खाली मान घालायला लावणारे आहे."... अगदी पंधरा वर्षांपूर्वीही, हत्तींच्या कळपाचा फोटो काढायचा झाला तर कळप चार हत्तींचा असला तरी त्यांत एखादा तरी सुळेवाला नर असायचाच. आज मात्र तीस-तीस, चाळीस-चाळीस हत्तींच्या कळपांत एकसुद्धा सुळेवाला नर दिसत नाही ... मोठा नर तर सोडाच, सुळेवाला छोटा नरही दिसत नाही चटकन." (अरण्यकांड, पृ.१२६-१२७) मानवाच्या हव्यासापोटी घडणारी हत्तींची शिकार अथवा हस्तिदंतासाठी घडणारे हे क्रौर्य अवघ्या जीवनालाच विरूपतेकडे नेणारे आहे. अरण्यसंपत्तीचे हे पुनर्भरण मानवाला कधीतरी शक्य होईल का, असा प्रश्न हे निवेदन आपल्यासमोर ठेवते.

आकडेवारीसह येणारे तपशील आणि मूळ समस्येमागचे  अर्थनिर्णयन पर्यावरणीय भान जागृत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. वन्य अथवा जलीय जीवांची होणारी शिकार व त्यामागची कारणमीमांसा पुढील निवेदनातून कशी व्यक्त होते. ते लक्षणीय आहे. "राहण्यासाठी जागा, अधिकाची हाव, बेपर्वा वृत्ती, संहाराची म्हणजे शिकारीची अमानुष क्रीडा आणि कायदा अमलात आणण्यात होणारी कुचराई या पाच कारणामुळे वाइल्ड लाइफ आणि वनस्पतीचं भयानक नुकसान झालं. याची उदाहरणं म्हणजे देवमासा, हत्ती आणि गेंडे, मांस, तेल आणि इतर पदार्थ यांसाठी मानवानं गेली दोनशे वर्षं देवमाश्यांची क्रूर हत्या केली. एकेकाळी आफ्रिका खंडात एक कोटी हत्ती होते. आता त्यांतले जेमतेम पाच लक्ष हत्ती शिल्लक असतील. केनियामध्ये नळ्याण्णव टक्के गेंड्यांचा संहार झाला. भारतात १९७० मध्ये असलेल्या सत्तर हजार गेंड्यांपैकी आता जेमतेम हजार गेंडे उरले आहेत." (अरण्यकांड, पृ. ९०) हे आपल्या देशातील आणि विदेशातील पर्यावरणाचे दुर्दैवी आणि विनाशकारी वास्तव 'अरण्यकांड' मधून प्रकटले आहे.

इस्राएलमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या मित्राच्या तोंडचे भारतातील पर्यावरणीय नतद्रष्टपणाविषयीचे उद्‌गार पीटर लोबो व्यक्त करतो. ते असे, "आमच्या ताब्यात इस्राएलची भूमी आली तेव्हा ते नुसतं वाळवंट होतं. आम्ही तिथं वाळवंटात जगतील अशी झुडपं लावली. त्यांनी आपल्या मुळांशी वाळू धरून ठेवली. त्यांचं भूमीत रूपांतर केलं. त्यातून आम्ही शेतं तयार केली, बागा उठवल्या. झाडं वाढवली. देवानं ब्राझिल, आफ्रिका, भारत यांना अमाप वृक्षसंपत्ती आणि भूमी दिली; तर हे देश बेसुमार जंगलतोड करून सुवर्णभूमीचं वाळवंटात रूपांतर करताहेत. तुमची भूमी आम्हाला लीजवर पन्नास वर्ष द्या. आम्ही सगळ्या जगाला धान्याचा, फळा-फुलांचा पुरवठा करू, कसली कसली झाडं आणि औषधी वनस्पत्या यांचा संहार केलात तुम्ही. तैमुरलंग आणि नादिरशहा तुमच्या क्रौर्यापुढं लाजतील..." (अरण्यकांड, पृ.८९) या सर्व पर्यावरणनाशाच्या संदर्भांनी 'अरणयकांड' अस्वस्थ करते. अधूनमधून काहीशी अशी 'रिपोर्टाज' शैलीत पुढे सरकणारी ही ललितसुंदर कादंबरी पर्यावरणीय प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते. 


बनगरवाडीचे रसग्रहण

कादंबरीच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत वाहत असलेली 'बनगरवाडी-मास्तर' य संबंधांची कथा ही या कादंबरीतील प्रमुख धारा असली तरी ती या कादंबरीच्या केंद्रस्थानी नाही. ती या कादंबरीतून साकार होणाऱ्या ग्रामव्यवस्थेच्या चित्राचा प्रमुख भाग आहे अन्य काही घटना आणि कथा मास्तरच्या कथेला स्पर्श करत आणि स्वतंत्रपणे विकणिन होत या ग्रामव्यवस्थेचे एक अर्थपूर्ण चित्र साकार करतात.

माणसाने आपल्या सोयीसाठी ही ग्रामव्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे या ग्रामव्यवस्थेचा घटक असलेला प्रत्येक माणूस तिला जपतो. तिच्यावर होणाऱ्या अन्य व्यवस्थांची आक्रमणे परतवून लावतो. ती टिकावी म्हणून माणसाच्या वर्तनासंबंधी, त्याच्या आपसांतील संबंधांविषयी त्याने एक संकेतव्यवस्था घडवली. तिच्या नियंत्रणाखाली या ग्रामव्यवस्थेतील माणसे वर्तन करतात. माडगूळकरांनी जर या संकेतव्यवस्थेप्रमाणे वागणारी माणसे रंगवली असती तर त्यांना केवळ प्रातनिधिक रूप प्राप्त झाले असते. परंतु माणसाच्या विवक्षित रूपात माडगूळकरांना रस आहे. त्यामुळे त्यांची माणसे या ग्रामव्यवस्थेतील संकेतांचे कधी पालन करत, कधी त्यांना मुरड घालत, तर कधी त्यांच्याविरूद्ध द्रोह करत जगतात. या माणसांच्या वैयक्तिक प्रेरणा आणि त्यांचो सार्वजनिक संकेतव्यवस्था यांत कधी संवादी, कधी विपरीत, तर कधी विरोधी ताण निर्माण झालेले असतात. माडगूळकर या सर्व गोष्टींसह बनगरवाडीतील माणसे उभी करतात. माणसाच्या वर्तनाला आणि मनोवस्थांना आकार देणारी मुख्य शक्ती ही ग्रामव्यवस्था असल्यामुळे या व्यक्तींच्या चित्रणातून आपणांस या ग्रामव्यवस्थेचा प्रत्यय येतो.

या पारंपरिक ग्रामव्यवस्थेत कुठलीही नवी गोष्ट शिरू द्यायची नाही यासंबंधी ही माणसे दक्षता बाळगतात. तिच्यात शिरू पाहणारी नवी गोष्ट धोकादायक असू शकेल, अशी यामागे भावना असते. म्हणूनच मास्तरच्या वागण्याबोलण्यावर ही माणसे नजर ठेवतात. शाळेसारख्या, या व्यवस्थेच्या दृष्टीने अनावश्यक असलेल्या गोष्टीला ते विरोध करतात. "साळा चालतीय कुटं  हतं? पोरं हायबी कुटं वाडीत" अशी गावकर्‍यांची शाळेबद्दल प्रतिक्रिया आहे. 'गावात तालीम बांधू या' या मास्तरच्या प्रस्तावावर 'तालीम बांधायला कुटं पहिलवान हायेत गावात?' अशी प्रतिक्रिया दिली जाते. ग्रामव्यवस्थेची परंपरेने चालत आलेली घडी टिकवायची. या व्यवस्थेच्या चौकटीत न बसणारी गोष्ट तर अजिबात स्वीकारायची नाही. तिच्याशी सुसंगत ठरू शकणाऱ्या नव्या गोष्टीही अगदीच नाईलाज झाला तरच स्वीकारायच्या किंवा अशा गोष्टी अधिक फायदेशीर असल्याची खात्री पटल्यावर त्या स्वीकारायच्या हे या ग्रामव्यवस्थेत वर्तनाचे एक सूत्र आहे. गावात तर तालीम बांधली गेली तर प्रचलित ग्रामव्यवस्थेला कसलाही धक्का पोचला नसता. असे असूनही या कल्पनेचे थंडे स्वागत गावकरी करतात. सर्वांसाठी शाळा ही तर या व्यवस्थेला विरोधी अशीच गोष्ट आहे. लिहिता-वाचता येणे हे या व्यवस्थेतील ठरावीकांचे काम; इतर जण जी कामे करतात त्यात लिहिण्या-वाचण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे त्यांना लिहिणे-वाचणे शिकण्याची गरज नाही. या उप्पर जर एखादा लिहायला-वाचायला शिकला तर तो परंपरेने चालत आलेले काम करणार नाही. त्याला 'पांढरे कपडे घालून हिंडायचा नाद लागतो,' तो कामातून जातो. आता जर सरकारने शाळा काढल्याच आहेत तर थोडेबहुत शिकावे, आपापले उद्योग करण्याइतपत मोठे झाले की शाळा विसरून आपापल्या उद्योगधंद्याला लागावे, अशी या पारंपरिक ग्रामव्यवस्थेची शिक्षणाबद्दल भूमिका आहे. म्हणूनच मास्तरच्या पहिल्या भेटीत सरकारने या गावाला मास्तर पाठवण्याबद्दल दादू बालट्या म्हणतो, 'हं, हतं काय करायचा गा मास्तर ?... रिक्कामा फाजीलपणा.'

पुस्तकः सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी
लेखकः सुधीर रसाळ


विनोबांची माधुकरी

अस्पृश्यता आणि सतीची चाल याला कित्येक हजार वर्षांची परंपरा असून देखील या गोष्टी हिंदू धर्मातून जवळपास नष्ट झाल्यात जमा आहेत. गांधीजी, विनोबा भावे, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या द्रष्ट्या नेत्यांनी प्रसंगी स्वतःचा जीव पणाला लावून हे घडवून आणले याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही. लोकमान्य टिळक, भगतसिंग अशा नेत्यांकडे स्वातंत्र्याचे जनक म्हणून पाहायला देखील हरकत नाही.  पण जे प्रश्न सोडविण्यात या थोर विभूतींना सपशेल अपयश आले त्याचे काय? अपयश अनुल्लेखाने मारले तर ते खरेच मरते का? किंवा तसे ते मरू द्यायचे का हाच एक मोठा प्रश्न आहे. "त्यांनी लाख प्रयत्न केले पण नाही जमले" असे कबूल करण्यात त्यांच्या अनुयायांना / भक्तांना शरम का वाटते? विचारांचे परीक्षण किंवा वस्तुनिष्ठ मूल्यमापन होऊच द्यायचे नाही हा काय प्रकार आहे? दिवंगत व्यक्तीचे पोस्टमार्टेम हे त्याचे नातेवाईक तसेच हितचिंतक करू देत नाहीत. त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे कारण पुढे करतात. विचारांच्या पोस्टमार्टेमला देखील त्याच कारणाने विरोध होत असला तरी खुद्द विनोबांना हा प्रकार फार आवडत असे.  त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रीय शाळा एकामागून एक बंद पडल्यावर त्यांनी एक लेख लिहून त्याचा आढावा घेतला होता.  "मुलें निघून जातील" या लेखात त्याची कारण मीमांसा वाचायला मिळेल. हा लेख सुमारे  शंभर वर्षांपूर्वी  म्हणजे १९२४ साली "महाराष्ट्र धर्म" या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता. त्या साप्ताहिकातील विनोबांच्या निवडक लेखांचे पुस्तक पुढे "मधुकर" या नावाने १९३६ साली प्रसिद्ध झाले. त्या व्यतिरिक्त "म्हातारा तर्क" आणि "जशास तसें" असे दोन लेख देखील अतिशय वाचनीय असल्यामुळे खाली देत आहे.

विनोबांनी आणिबाणीत इंदिरा गांधीची पाठराखण केल्यामुळे खूप मोठा वर्ग त्यांच्यापासून दुरावला गेला. हे कारण असेल किंवा त्यांचे विचार काळाच्या खूप पुढे किंवा काळाच्या खूप मागे असल्यामुळे लोकांना प्रॅक्टिकल वाटले नसावेत. पण त्यामुळे त्यांचे सर्वच साहित्य मागे पडल्यासारखे झाले आहे.

उदाहरण म्हणून त्यांनी हिंदू - मुसलमान झगडा सोडवायचा काय उपाय दिला होता ते पाहू.

आज हिंदु-मुसलमानांच्या झगड्याचा प्रश्न मोठा बिकट होऊन बसला आहे. माझ्या समजुतीने हाहि प्रश्न सोडविण्याची सोय चरख्यात आहे. प्रत्येक मशिदीत आणि मंदिरात जर चरख्याचा प्रवेश झाला, तर सर्व भांडणें मिटतील. अर्थात आजच्या स्थितीत हे होण्यालाहि अवांतर गोष्टींची मदत लागेल. पण चरखा कांतणारा कोणीहि हिंदु किंवा मुसलमान एकमेकांची डोकी फोडण्याला सहसा तयार होणें शक्य नाही. ही वस्तु निश्चित आहे - ज्याप्रमाणे तलवारीच्या सहवासाने मनुष्य हिंसक बनतो, त्याप्रमाणे चरख्याच्या सहवासाने तो शांत बनतो. शांति किवा अहिंसा हा चरख्याचा सहचारी भाव आहे. समाजात शांति बाणून हिंदू-मुसलमानांतील झगडे मिटले तर स्वराज्य मिळणार नाही काय ?

कल्पनेला खूप ताण दिल्यावर देखील एखाद्या मशिदीत चरख्याचा प्रवेश झाला आहे असे चित्र मी डोळ्यासमोर आणू शकत नाही.

पन्नास - शंभर वर्षांपूर्वी कदाचित एखाद्या मंदिरात चरख्याचा प्रवेश होऊ शकला असता पण आता ती देखील शक्यता नाही. तलवारीच्या निव्वळ सहवासाने मनुष्य हिंसक बनत नाही तर  हिंसक मनुष्यच येन केन प्रकारेण तलवारीच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो. चरख्याच्या सहवासाने मनुष्य शांत बनतो असे नसून शांत मनुष्यालाच चरख्याचा नाद लागू शकतो. हिंदु-मुसलमानांच्या झगड्याचा प्रश्न  शंभर वर्षांनंतर अजूनही "मोठा बिकट"च आहे. गांधी आणि विनोबांचा चरखा तर आता चित्रात देखील पाहायला मिळत नाही!

विनोबा भावे हे आई-वडिलांच्या ममतेने लिहीत असल्यामुळे त्याचे विश्लेषण करणे किंवा उपयुक्तता तपासणे योग्य नाही आणि माझी तशी पात्रता देखील नाही याची मला जाणीव आहे. पण मराठी भाषेत एखादा विचार किती सोप्या पद्धतीने मांडता येतो याचे उदाहरण म्हणून या लेखांकडे पाहता येईल. हे लेख शंभर वर्षांपूर्वी लिहिले आहेत असे वाटतसुद्धा नाही. अगदी काल परवा लिहिल्यासारखी ताजी टवटवीत शब्दरचना!

_____

म्हातारा तर्क

एखाद्या माणसाचे वय मोठे असलें म्हणजे आपण त्यास म्हातारा म्हणतो. असे म्हातारे आपल्या देशात अलीकडे फार थोडे आढळतात. आपल्या लोकांचें जगण्याचें सरासरी मान हल्ली चोवीस वर्षांचं आहे. हेंच मान विलायत वगैरे देशांत दुपटीच्या वर आहे, असें सांगतात. तिकडे म्हातारे लोक त्या रीतीने बरेच दिसून येतात.

पण आपल्याकडे असले म्हातारे कमी असले तरी दुसऱ्या एका तर्‍हेचे म्हातारे फार आहेत. हे म्हातारे कोण? नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा असे एका सत्पुरुषाने म्हटलें आहे. असले म्हातारे आपल्याकडे जिकडे जाल तिकडे दिसून येतील. लहानपणीं जें काय नशिबाला लागलें तें खरें ! त्यानंतर थोडा मोठा होऊन एखाद्या धंद्याला लागला म्हणजे मग एखादी गोष्ट शीक म्हटलें तर तें काही व्हावयाचें नाही. हा जडपणा शिकलेल्या आणि न शिकलेल्या दोन्ही वर्गाच्या अंगात, पुष्कळ वर्षांच्या गुलामगिरीमुळे, अगदी मुरून गेल्यासारखा झाला आहे. शिकलेल्या लोकांत थोडा जास्तच आहे पण कमी नाही.

एकदा एका राष्ट्रीय शाळेतल्या शिक्षकाला सहज सुचविलें: "अहो, तुम्ही थोडें हिंदी शिकून घ्या. हिंदी आपण राष्ट्रभाषा मानली आहे. राष्ट्रीय शाळेत तरी हिंदीचा अभ्यास झाला पाहिजे. त्यातून हिंदी काही कठिण भाषा नाही. सोपी आहे आणि म्हणूनच ती राष्ट्रभाषा होऊ शकली आहे. एखाद्या उन्हाळयाच्या सुट्टीत हिंदी भाषा सहज मौजेने शिकता येईल. तुम्ही शिकून घ्याल तर आपल्याला मुलांना थोडें हिंदी शिकविता येईल." त्यावर त्याच्याकडून सरळ जवाब मिळाला "तुमचें म्हणणें खरें आहे. हिंदी काही तशी कठिण भाषा नाही. पण आता आमच्याने नवीन काही शिकून होईलसें वाटत नाही. आम्ही जे काही शिकलो आहो त्यातून तुम्ही वाटेल तितकें काम करवून घ्या. पाहिजे तर चार तासांच्याऐवजी पांच तास शिकवू. पण नवीन शिकावयाचे सांगू नका. शिकून शिकून कंटाळलो बुआ!" विचारा जगून जगूनसुद्धा कंटाळलेला दिसला. ह्याचें नांव म्हातारा.

ही झाली साधी हिंदी शिकण्याची गोष्ट. त्याच्यापुढे जाऊन जर कोणी म्हणेल की - "हिंदु-मुसलमानांची एकी मजबूत करावयाची तर दोघांनीहि जवळ येऊन एकमेकांची नीट ओळख करून घेतली पाहिजे. तसें केल्याने बरेचसे गैरसमज आपोआपच नाहीसे होऊन जातील. ह्यासाठी देवनागरी-लिपीबरोबरच राष्ट्रीय शाळेत उर्दूलिपि शिकविण्यात यावी. आणि तसें करायचे म्हणजे शिक्षकांनी आधी ती लिपि शिकून घेतली पाहिजे." - तर तो वेड्यांतच काढला जाईल. "अहो, मुसलमानांचे सगळेच उलटें. आम्ही शेंडी ठेवतो तर ते शेंडी काढून टाकतात. आम्ही दाढी काढून टाकतो तर ते दाढी वाढवितात. तशीच त्यांची लिपि आहे असें म्हणतात. आम्ही डावीकडून उजवीकडे लिहिणार तर ते उजवीकडून डावीकडे लिहिणार ! असली लिपि आमच्याने कसली शिकून होणार!" हें त्यांचें उत्तर. हे कल्पनेने लिहीत नाही. वरील उत्तर एका गृहस्थाकडून प्रत्यक्ष मिळालेले आहे. त्यात मुसलमानांविषयीं त्यांची बोलण्याची तर्‍हा गमतीदाखल आलेली होती. तो त्यांच्या मनातला भाव नव्हता. त्यांच्या मनातली गोष्ट इतकीच की "नवीन शिकणें नको."

आणि सूत कांतावयाचें म्हटलें तर ? मग तर विचारूच नका. "आधी वेळहि थोडाच मिळतो म्हणा. पण वेळ जरी कसाबसा काढता आला तरी आजपर्यंत असलें कामच केलेलें नाही. तेव्हा ते आता कसें होणार ?" इथून सुरवात व्हावयाची. "जें आजपर्यंत झालें नाही तें ह्यापुढे होणार नाही" हा म्हातारा तर्क. ह्या म्हाताऱ्याला हे कसें समजत नाही की जें आजपर्यंत झालें नाही असें पुष्कळ ह्यापुढे व्हावयाचे आहे? आजपर्यंत माझ्या बाळ्याचें लगीन झालें नाही, तें अजून व्हावयाचे आहे, हे मला समजतें. पण आजपर्यंत माझ्या हातून सूत कांतून झालें नाही, तें पुढे व्हावयाचें आहे, हे मला कां समजत नाही? ह्याचा जबाव उघड आहे : आजपर्यंत मी स्वराज्य मिळविले नाही, तें पुढे मिळवावयाचे आहे, हे लक्षात नाही म्हणून. आणि त्याबरोबरच आजपर्यंत मी मेलो नाही, तरी ह्यापुढे मरावें लागणार आहे; फार कशाला, आजपर्यंत मेलो नाहो म्हणूनच ह्यापुढे मरावें लागणार आहे, ह्या गोष्टीचेंहि भान नाहीसे झाले म्हणून.

माझ्या मना, आजपर्यंत मेलो नाही म्हणून पुढे मरणार नाही असल्या म्हाताऱ्या तर्काला बळी पडू नकोस. नाही तर फसगत होईल.

_____

जशास तसें

"तलवारीशी तलवारीनेच लढले पाहिजे. त्याशिवाय चालावयाचे नाही." असा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वहीम आहे. त्यांतलें खरें कारण हे आहे की आज आपल्यापाशी तलवार नाही. पुष्कळ वेळा जी वस्तु आपल्यापाशी नसते तिची किंमत आपण उगीच वाढवीत असतो. तशी आपली दशा झाली आहे. आपल्या मनात तलवार का? म्यानात नाही म्हणून. खरोखर आपल्या म्यानात जर तलवार असती तर तिच्याविषयों आपल्या मनाला इतका मोह वाटला नसता.

मोह वाटला नसता. कारण आपल्याला खरी गोष्ट समजली असती. 'तलवारीशी तलवार'  हे म्हणणें जर आपल्या वडिलांच्या कानावर आले असतें, तर त्यांना हसू आवरतें ना. कारण त्यांना लढाईचा अनुभव होता. कसें लढावयाचें हे त्यांना माहीत होतें. त्यांनी आपल्याला सहज समजावून सांगितलें असतें की, "बाबा, तलवारीशी ढालीने लढावें लागतें." ज्या वेळेस लोक 'त' म्हटल्या 'तलवार' समजत होते, त्या वेळेस ही गोष्ट लोकाना माहीत होतो. आज आम्ही 'त' म्हटल्या 'ताकभात' समजतो त्यामुळे ही गोष्ट आमच्या गळी उतरत नाही.

आपण 'जशास तसें' पुष्कळ वेळा म्हणतो, पण आपल्याला त्यातला मतलबच समजत नाही. 'जशास तसें' ह्याचा अर्थ इतकाच करावा की, दुष्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपला ढाल मजबूत असली पाहिजे. 'जशास तसें' ह्याचा अर्थ तलवारीशी तलवार लढवावयाची असा करणें मंद बुद्धीचे काम आहे. तलवारीशी लढवावयाची तर ढालच. पण त्या ढालीचा सहन करण्याचा जोर तलवारीच्या मारण्याच्या जोरापेक्षा कमी पडता कामा नये. दुष्मनाच्या सवालात जर पांव शेर राग भरलेला असला तर आपल्या जबाबात पांच शेराहून कमी प्रेम नसावें.

शिक्षकाला मुलाच्या अज्ञानाशी लढावयाचें असतें. तो जर भलत्याच अर्थाने 'जशास तसें' घेऊन बसला आणि मुलांना म्हणू लागला की, "तुम्हाला जर एवढी साधी गोष्ट समजत नाही तर मला तरी कां समजावी? तुम्ही माझ्या सवालाचा जबाब देऊ शकत नाही; मी तुमच्या सवालाचा जवाब कां द्यावा ? तुम्ही आपल्यापाशी अज्ञान बाळगता तर मीच तेवढें काय म्हणून ज्ञान बाळगत बसावें?" उत्तर इतकेंच की "मुलें अज्ञान बाळगतात म्हणूनच तुझ्यावर ज्ञान बाळगण्याची खास जवाबदारी आहे." अज्ञानाशी लढावयाचे तर ज्ञानानेच लढता येईल. 'जशास तसें' ह्याचा अर्थ एवढाच की 'तोडीस तोड' पुरती झाली पाहिजे. समोरच्या माणसाचें अज्ञान जितकें खोल त्या मानाने आपलें ज्ञानहि खोल असले पाहिजे. म्हणूनच अगदी खालच्या वर्गाला शिकविणारी माणसें फारच वरच्या दर्जाची असावी लागतात. मागे पुराणकाळात ज्या लढाया झाल्या त्यांतसुद्धा एका बाजूने मेघाचें अस्त्र फेकले गेलें, तर दुसऱ्या बाजूने त्यावर वायूचें अस्त्र फेकीत. वार्‍याने ढगांना पिटाळून लावावयाचें कीं ढगावर ढग आपटवीत बसायचे? अज्ञानाच्या कपाळावर दुसरें अज्ञान घासावयाचें कीं ज्ञानाने अज्ञान दूर करावयाचें ?

ज्याला व्यवहाराची थोडीफार माहिती आहे त्याला ही गोष्ट समजण्याला काहीच अडचण पडू नये. विस्तव विझवावयाचा तर पाणी ओतावें, अंधार पडला म्हणजे दिवा लावावा, ह्या गोष्टी कोणाला समजत नाहीत? आणि जर ह्या गोष्टी समजतात तर क्रोधाला प्रेमाने जिंकावें, बुराईला भलाईने जिकावे, कंजूषपणाला दिलदारपणाने जिंकावें, खोट्याला खर्‍याने जिंकावे हे संताचें म्हणणे का समजू नये? ह्याहि गोष्टी व्यवहाराच्याच आहेत. पण आपण विचार करीत नाही म्हणून आपल्याला त्या समजत नाहीत. आपल्याच मनात जरा तपास घ्यावा म्हणजे सगळया गोष्टी निवळू लागतील.

_____

मुलें निघून जातील

'सहा महिन्यापूर्वी भुसावळची राष्ट्रीय शाळा बंद करून आलो. परवा हिंगणघाटची राष्ट्रीय शाळा बंद करून आलो. दोन्ही ठिकाणचे आवरण-समारंभ माझ्या हातून पार पडले. मी 'आवरण-समारंभ' म्हणतो, 'अंत्य-विधि' म्हणत नाही; कारण राष्ट्रीय शाळा मेली तरी तेवढ्याने राष्ट्रीय शिक्षण मरत नाही. आत्म्याच्या अमरत्वाने राष्ट्रीय शिक्षणाच्या अमरत्वावर माझा विश्वास आहे. कारण, त्याचा मी अनुभव घेतला आहे. प्रत्येक राष्ट्रीय शिक्षकाला त्याचा अनुभव घेता येण्यासारखा आहे. राष्ट्रीय शिक्षणाला मृत्यु आहे ही गोष्ट कोणीहि राष्ट्रीय शिक्षक स्वतः जिवंत असता कल्पू शकणार नाही. ज्याप्रमाणे आई म्हणजे घर; त्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षक म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. सबंध दुनियेला राष्ट्रीय शिक्षणाचा मृत्यु दिसला तरी राष्ट्रीय शिक्षकाला तो कधीच दिसू नये. लोकांच्या डोळयाला जिथे अंधार दिसतो तिथे सूर्याला अबार दिसणार आहे काय ? किवा एवढी मोठी उपमा कशाला ? एखाद्या लहानशा दिव्याला तरी अंधार दिसला आहे काय ? राष्ट्रीय शाळा हे राष्ट्रीय शिक्षणाच्या अनेक शरीरांपैकी एक शरीर मात्र आहे, शरीर मेलें तरी आत्मा मरत नाही. उलट कधी कधी तर शरीराच्या बंधनातून सुटला म्हणजे आत्मा अधिकच खुलतो. तीच आज राष्ट्रीय शाळांची स्थिति आहे. मरतुकड्या शाळात राहण्याचा लोभ सोडून देणें हे आज राष्ट्रीय शिक्षणाचे कर्तव्य होऊन बसले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षणाचा रात्रंदिवस जप करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला राष्ट्रीय शाळेचा (लौकिक दृष्टीने) अंत्य-विधि करतांनाहि दुःख होत नाही. एकदा एक राक्षस आणि एक माणूस काही करार करून मुसाफरीला निघाले. चार दोन दिवस त्यांचें नीट चाललें. पुढे राक्षस कराराच्या अटी एकामागून एक मोडू लागला आणि माणसावर एकएक नवीन नवीन शर्त लावू लागला. माणसाने जरा तक्रार केली की, 'खाऊन टाकतो' असें तो म्हणे. त्याने काही दिवस सहन करून पाहिलें पण त्यामुळे मंत्राचा जप अधिकच होऊ लागला. शेवटीं त्याने जिवाचा धडा केला आणि 'खाऊन टाकतो, खाऊन टाकतो म्हणतोस तर खाऊन टाक' असें एकदाचें राक्षसाला सांगून टाकले.

राष्ट्रीय शाळांच्या पाठीशी असा एक राक्षस लागून राहिला आहे. राष्ट्रीय शिक्षणाच्या करारांतील कोणतीहि अट तो पाळीत नाही. भलभलत्या अटी लादू पाहतो आणि जरा काही त्याच्या मर्जीविरुद्ध झालें की एका मंत्राचा प्रयोग करतो, "मुलें निघून जातील-" इंग्रजीचा जुलूम कमी करावा तर "मुलें निघून जातील." एक वेळ चरखा, एक वेळ शिक्षण म्हटलें तर "मुलें निघून जातील." ह्याचा अर्थ काय ? राष्ट्रीय शिक्षणाचें कोणतेहि तत्त्व दाखल करावें तर "मुलें निघून जातील!" पण मुले निघून जायला आधी आलीच होती कशाला? राष्ट्रीय शाळातून राष्ट्रीय शिक्षणाचीं तत्त्वें पाळावयाची नाहीत तर मग पाळायची तरी कुठे? राष्ट्रीय शाळेतून राष्ट्रीय शिक्षणाची तत्त्वें वजा करावयाची तर मग शिल्लक राहिलेल्या शेणगोळयाचा उपयोग काय? उपयोग इतकाच देशसेवेच्या दंभावर सारवण.

बरे. इतकें करून फळ काय निघालें ? भुसावळची राष्ट्रीय शाळा काय किंवा हिंगणघाटची राष्ट्रीय शाळा काय, कां मेली? मुलें निघून जाण्याच्या रोगानेच. म्हणजे जो रोग होईल म्हणून धास्ती बाळगली होती त्याच रोगाने. पुष्कळ वेळा रोगाचा इतर कारणांपेक्षा भावनेशीच जास्त संबंध असतो, असें मानसशास्त्रज्ञाने ठरविलें आहे. म्हणून एखाद्याला क्षयरोग लागू झाला म्हणजे आपण त्याला 'क्षयाची भावना' झाली आहे असें म्हणतो. त्याच भाषेत बोलावयाचें तर ज्या राष्ट्रीय शाळा मेल्या त्या मुलें निघून जाण्याच्या 'रोगाने' मेल्या असें म्हणण्यापेक्षा मुलें निघून जाण्याच्या 'भावनेने' मेल्या असें म्हटलें पाहिजे. जशी भावना तसें फळ हा ठरलेला सिद्धांत आहे.

म्हातारे लोक गोष्ट सांगत असतात: एक वेळीं दुपारच्या उन्हात चालून थकून गेलेला एक प्रवासी एका झाडाखालीं विसांवा घेण्यासाठी बसला. थोडा विसांवा घेतल्यानंतर "आता जर थंडगार पाणी मिळेल तर काय बहार होईल !" असा विचार त्याच्या मनात आला. त्याबरोबर जमीन दुभंग झाली आणि पाताळातील पाण्याची गोड धार त्याच्या तोंडात येऊन पडली. ज्या झाडाखालीं तो बसला होता तें सामान्य झाड नसून तो कल्पवृक्ष होता हे त्याला माहीत नव्हतें; त्यामुळे त्या प्रवाश्याला आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने आश्चर्याचे रूपांतर भीतीत झालें - "हें भूतबीत तर नसेल?" समोर एक अकराळविकराळ भूत उभे राहिलें. "आता मला हे खाल्याशिवाय राहत नाही !" झालें, प्रवास संपला !

समाजहि असाच एक कल्पवृक्ष आहे. त्याच्या सावलीत बसून "राष्ट्रीय शाळा मुलांनी भरून जातील" अशी जोरदार भावना करण्यात आली. त्या वेळीं राष्ट्रीय शाळा मुलांनी गजबजून गेल्या. पुन्हा, "मुलें निघून जातील" ही दुबळी भावना पैदा झाली. मुलें ओसरून गेलीं. त्यात समाजाचा काय दोष ? "मुलें उत्तरोत्तर वाढत जातील" अशी भावना ठेवून जर राष्ट्रीय शिक्षणाच्या तत्त्वांचा नीट अंमल केला असता, तर मुले निघून गेलींच नसती. निदान, "मुले निघून जातील तर जाऊ देत" असा राक्षसाला सडेतोड जवाब देऊन टाकला असता तर आजच्यासारखी "तत्त्वें गेली, मुले गेली, लुडबुड तेवढी हाती आली" अशी दशा झाली नसती.

टीका करण्याचा उद्देश नाही. झालें तें होऊन गेले. त्यापासून बोध घेतला पाहिजे, समाज एकमुखी असणें शक्य नाही. समाजात निरनिराळया विचारांचे अनेक लोक असतात. त्या सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न फुकट आहे. काहीतरी - कमीत कमी का होईना तत्त्वें निश्चित करून त्यांचा व्यवस्थित अंमल करीत राहिलें पाहिजे. आपण राष्ट्रीय शिक्षणाच्या तत्त्वांकडे तर दुर्लक्ष केलेंच पण लोकसंग्रहाच्या नादी लागून सामान्य शिक्षणाची तत्त्वेंहि झुगारून दिली. "ढिली परीक्षा घेऊन मुलें भराभर पास करून घेतो. कोणत्याहि मुलाला तो म्हणेल त्या वर्गात दाखल करतो. कोणीकडून मुलांचे पाय एकदाचे शाळेला लागोत म्हणजे झालें !" शेवटी लोकांचे समाधान झालें नाहीच. उलट "राष्ट्रीय शाळेतल्या शिक्षणात आणि सरकारी शाळेतल्या शिक्षणात फरक काय?" असा आक्षेप मात्र डोक्यावर आला. ही सारी लोक-संग्रहाची लीला आहे.

शंकर आणि पार्वती नंदीवर बसून फिरायला निघालीं होतीं. तें पाहून 'बैल झाला तरी त्याला असें राबवावें काय?" असा एकाने आक्षेप घेतला. त्याचें समाधान करण्याकरिता पार्वतीमाता खाली उतरून पायीं चालू लागल्या. त्यावर "सुकुमार अबलेची दरकार न करणारा हा घटिगण कोण हो ?" अशी शंकरांना शिवी मिळाली. नंतर मातु:श्री नंदीवर बसल्या. शंकर चालू लागले. "नवरा चालत असता नंदीवर बसणारी निलाजरी बाई आजच पाहिली" असा आईसाहेबांना टोमणा मिळाला. मग दोघे नंदीबरोबर चालू लागले. तेव्हा दोघे नंदीबैल ठरले. शेवटीं नारदांनी नंदीला डोक्यावर घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा दोघांनी पूर्वीप्रमाणे सरळ नंदीवर आसन ठेवलें. कारण, मुद्दा त्यांच्या लक्षात येऊन चुकला. "हातची तत्त्वें सोडून पळत्या लोकसंग्रहाच्या पाठीं लागण्यात काही हंशील नाही" एवढा बोध आपणास मिळाला, तरी बंद झालेल्या राष्ट्रीय शाळांचे सार्थक होईल.

पुस्तकाचे नावः मधुकर
लेखकः विनोबा भावे

वॉर्ड नंबर पाच, केईएम

 पुस्तकाचे नावः वॉर्ड नंबर पाच, केईएम

लेखकः डॉ. रवी बापट

शब्दांकनः सुनीति जैन


दोन शब्द..

या रुग्णालयात काम करत असताना आणि वरिष्ठांचे काम व निदानकौशल्य हाताळताना मला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे रुग्णाच्या हिताचं रक्षण करणं! म्हणजे असं की डॉक्टरनं स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी किंवा स्वतः करत असलेल्या प्रयोगासाठी रुग्णाला कोणतीही कल्पना न देता त्याचा साधन म्हणून वापर करता कामा नये. ते अत्यंत अयोग्य आहे. एखाद्या अवघड शस्त्रक्रियेमुळे माझ्या अनुभवात, ज्ञानात भर पडून माझी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठा त्यामुळे वाढणार आहे का, असा विचार न करता या शस्त्रक्रियेचा अथवा उपचाराचा त्या रुग्णाला फायदा होणार आहे का, त्याचा त्या रुग्णावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना, रुग्णाची अवस्था हा प्रयोग करून घेण्यासाठी सक्षम आहे ना, या गोष्टींचा विचार सर्वात आधी केला पाहिजे असं बाळकडू मला माझ्या गुरुजनांनी दिलं आणि तोच माझ्या वैद्यकीय व्यवसायाचा मूलाधार बनला. स्वतःची पत वाढवण्यासाठी केवळ प्रयोगाखातर रुग्णाला 'गिनीपिग' बनवता कामा नये हा विचार माझ्या मनात दृढ झाला आणि याच विचाराचा वारसा मी माझ्या विद्यार्थ्यांकडे, पुढच्या पिढीकडे सोपवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आणि म्हणूनच अनेक रुग्णांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रेमादराला मी पात्र ठरलो. आज हीच माझी गंगाजळी आहे, जी भौतिक समृद्धीपेक्षाही मला अधिक श्रीमंत करणारी आहे.

या माझ्या प्रदीर्घ सेवाकालात आणखीही एक गोष्ट माझ्या मनावर फार प्रकर्षानं बिबली गेली आणि ती म्हणजे, डॉक्टरनं रुग्णाकडं केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञान वापरून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे सारं समजावून घेऊन त्याच्याशी सुसंवाद साधणं आणि मग उपचार करणं फार गरजेचं असतं, असं माझं ठाम मत बनलं आहे. कारण वैद्यकशास्त्र हे शास्त्र असलं तरी ते संख्याशास्त्रासारखं बिनचूक नाही. दोन अधिक दोन बरोबर चार असं उत्तर येथे प्रत्येक वेळेला मिळतंच असं नाही. याचं साधं कारण असं आहे की, प्रत्येक रुग्णाची शरीररचना जरी सारखी असली तरी प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व सारखं नसतं. रोगाला सामोरं जाण्याची, झगडण्याची, उपचारांना प्रतिसाद देण्याची, दुखणं सोसण्याची प्रत्येक रुग्णाची क्षमता भिन्न असते. तसंच वैद्यकीय व्यवसायामध्ये आजाराचं निदान व उपचारही भिन्न असू शकतात. त्याचप्रमाणे रोगाचं प्रकटीकरणही वेगवेगळे असू शकतं. म्हणूनच डॉक्टरसाठी प्रत्येक रुग्ण हा वेगळा व नवा अनुभव असतो.

या सर्व गोष्टी विचारात घेता रुग्णाच्या आजाराची निदान प्रक्रिया आणि उपचार पद्धतीचं नियोजन करताना रुग्णाचा आजार, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि वैद्यकशास्त्राने सिद्ध केलेल्या कसोट्या वापरून केलेले उपचार हे सूत्र अमलात आणलं जातं आणि त्या संदर्भात काही प्रमाणातील धोकाही गृहीत धरून उपचार करावे लागतात. तसंच इतका सखोल विचार करूनही रुग्ण बरा होईलच याची शंभर टक्के खात्री संख्याशास्त्राप्रमाणे देता येत नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रत्येक रुग्ण डॉक्टरला वेगळं काहीतरी शिकवत असतो. हे शिकणं म्हणजे नुसता अनुभव नसतो तर ती एक शास्त्रीय व सामाजिक प्रक्रिया असते.

आणि यासाठी मला असं वाटतं की वैद्यकीय व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून हे परस्पर संबंध फार महत्त्वाचे असतात आणि हे वारंवार अधोरेखित करणंही अतिशय गरजेचं असतं. समाजाच्या विविध स्तरातील रुग्ण, त्यांची व्यक्तिमत्त्वं, त्यांच्यावर झालेले उपचार, त्यातून निर्माण होणारे प्रश्न किंवा त्यांचं फलित या सर्व गोष्टी वैद्यकीय व्यावसायिक आणि समाज या दोघांसाठी दस्तऐवजाच्या स्वरूपात नोंदवणं, मला गरजेचं वाटतं. कारण असं केल्यानं समाजमन वैद्यकीय उपचारांसाठी आणि डॉक्टर हा रुग्णसेवेसाठी अधिक सक्षम होईल असा मला विश्वास वाटतो. म्हणूनच हा लेखनप्रपंच !

_____

कट प्रॅक्टिस

आता तर एक्स-रे, अल्ट्रा साऊंड, सी. टी., एम. आर. आय., लॅबोरेटरी व तत्सम सगळ्यांकडूनच डॉक्टर मंडळींना कट मिळतो हे वास्तव आहे. स्वतःचं नर्सिंग होम नसेल तर कट मध्येच बरीच फी जाऊन हातात काही उरत नाही अशीही तक्रार ऐकू येते. कारण लॉजिग बोर्डिंगचे पैसे नर्सिंगहोमवाला आणि मोठा कट रुग्ण पाठवणारा काढून घेतो. म्हणजे ज्ञान व मेहनत तज्ज्ञाची पण कमाईतील ५० ते ६० टक्के रक्कम मात्र दुसऱ्याची असा न्याय झाला. 'कट प्रॅक्टिस' हा खरं तर स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. पंचतारांकित रुग्णालये व नर्सिंग होम्स याची बिलं पडताळून पाहणं, या संदर्भात अतिशय मनोरंजक ठरेल. मात्र 'विविध तपासण्यांचे' उत्पन्नही 'गरज' आणि 'सहज' या दृष्टिकोनातून तपासायला हवं.

पण एकदा का व्यापारी व्यावसायिक पद्धत स्वीकारली की मग व्यापारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपोआप ओघाने येणारच. कमिशन, प्रसिद्धी, विविध माध्यमांचा वापर, दलाल, औषध विक्रेते, औषध कंपन्या, उपकरणे व तपासण्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री बनवणाऱ्या कंपन्या या सर्वांकडूनच व्यापार वाढवण्यासाठी मदत घ्यावी लागते आणि नंतर ती गरजच बनत जाते.

हे दृष्टचक्र भेदणार कसं?

वैद्यकीय व्यवसायाच्या आजच्या घसरणीला वैद्यकीय व्यावसायिक व समाज दोघेही जबाबदार आहेत. व्यवसायाचे मूळ स्वरूप होते 'सेवा.' पण त्या नंतर व्यवसाय, धंदा, उद्योग आणि आता तर शेअर बाजारात उत्तरेपर्यंत घसरले आहे. म्हणजेच विचार फक्त नफ्या-तोट्याचा असतो. यात रुग्ण हा ग्राहक आणि डॉक्टर हा विक्रेता. अमेरिकेसारख्या भांडवलदारी देशातील व्यवस्थेचे हे अंधानुकरण आहे. बरं, अमेरिकेचं अंधानुकरणही फक्त आपल्या फायद्यापुरतंच करायचं. म्हणजे आम्ही वैद्यकीय 'धंदा' करणार पण आमच्या धंद्याला मात्र कुठलंही तत्त्वं वगैरे लावू नका, ग्राहक संरक्षण कायद्यासारख्या कायद्याच्या कक्षेत आमचा व्यवसाय/धंदा आणू नका हा अट्टाहास. 'प्रत्येक रुग्ण हा फिर्यादी असतो' हे अमेरिकेतील वैद्यकीय व्यवसायाचं बोधवाक्यच आहे. म्हणून ज्या वैद्यकीय व्यावसायिकांना जास्त धोक्याचं काम करावं लागतं व ज्या बाबतीत उपचारांचे दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते, त्या डॉक्टरांच्या व्यावसायिक विम्याचा हप्ताही जास्त असतो. त्यामुळे अधिक जबाबदारीनं व्यवसाय करण्याचं बंधनही आपोआपच डॉक्टरवर येत असतं. पण आपल्याकडे मात्र आम्ही बेज़ाबाबदारपणे वागलो तरी आम्हाला कायद्याच्या कैचाट्यात न सापडण्याची सवलत हवी, कारण आमचा व्यवसाय हा उदात्त व्यवसाय आहे! ही विसंगती आहे.

त्यात पुन्हा आपल्या देशात मानवी आयुष्य अगदीच स्वस्त आहे. रुग्णालये, डॉक्टर्स, त्यांच्या चुका, भेसळयुक्त औषधे याविरूद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची क्षमता आमच्या आम जनतेत नाही. न्यायालयात गेल्यानं 'आमचा मृत पावलेला आप्त काय परत येणार आहे का' हीच भावना आपल्याकडे रुढ आहे आणि म्हणूनच सगळे सोकावत आहेत.

तर अशी आहे आपल्या उदात्त वैद्यकीय व्यवसायाची आजची स्थिती. हे एक दृष्टचक्र बनलंय याची सर्वांना जाणीव आहे पण ते भेदायची कुणाचीच मानसिकता दिसत नाही. रुग्ण हा पिळवटून निघणारा घटक, पण त्याच्याही संवेदना पार बधीर झाल्या आहेत. अगदी शिक्षित रुग्ण देखील 'मला काय झालंय हे समजावून सांगाल का' असा साधा प्रश्न डॉक्टरला विचारीत नाहीत. दुसरीकडे वैद्यकीय व्यवसायातील स्पर्धा दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. या स्पर्धेत निरोगी माणसालाही रुग्ण बनवण्याचे प्रकार होत आहेत. म्हणूनच वैद्यकीय व्यावसायिकांनीच या व्यवसायाची विश्वासार्हता जपण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी व्यावसायिकाला रुग्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लागेल. रुग्णाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याच्या पातळीवर जाऊन त्याच्याशी संवाद साधावा लागेल. व्यवसायाची नीतिमत्ता पाळून जर हा व्यवसाय केला आणि धंद्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं नाही तर हा व्यवसाय कायमच उदात्त राहील असा मला विश्वास आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी मी आशावादी आहे. परिस्थिती नेहमीच बदलत असते. व्यवसायात घुसलेल्या या बाजारी वृत्तीतील फोछपुमा तवीन पिढीच्याही लक्षात येईल आणि हीच पिढी या व्यवसायाला पुनःप्रतिष्ठा मिळवून देईल आणि हा व्यवसाय भविष्यातही उदात्तच राहील अशी मला पूर्ण आशा आहे. माझं या नव्या व्यावसायिकांना एकच सांगणं आहे- व्यवसायाच्या सुरुवातीला, जरा संयम ठेवला तर धनप्राप्ती दूर नसते. व्यवसायाचं पावित्र्य राखा, समाज तुमचं नाव आदरानेच घेत राहील आणि हे समाधान धनप्राप्तीपेक्षा नेहमीच अधिक राहील. शिक्षक आणि डॉक्टर म्हणून मला हे समाधान मिळालं याबद्दल मी कृतज्ञ आहे.

संत तुकारामांचा सांप्रदायिकांना संदेश

डॉ. माधव पुटवाडी

(प्राध्यापक, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)

परंपरेने चालत आलेली जातव्यवस्था आणि अंधश्रद्धांच्या कचाट्यातून सर्वसामान्य जनतेची सुटका करणे आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणे, हा वारकरी संप्रदायातील सर्वच संतांचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र या संप्रदायाची सूत्रे आपल्या हाती घेऊन तथाकथित बाबा-बुवा-महाराजांनी स्वतःचाच उत्कर्ष साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. संतश्रेष्ठ तुकारामांनी अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांची झाडाझडती कशी घेतली आहे ते सांगणारा लेख-

जगातल्या ज्या-ज्या धर्माची किंवा पंथाची बदनामी झाली आहे वा होत आहे, त्याला त्या-त्या धर्माचे किंवा पंथाचे अनुयायीच सर्वाधिक कारणीभूत होते आणि आहेत.
स्वतःला धार्मिक समजणाऱ्या लोकांचा आरोप असा असतो की, निरीश्वरवादी व विवेकी लोक धर्माची बदनामी करत असतात; मात्र हे खरे नाही. निरीश्वरवादी व विवेकी लोक एका बाबतीत नक्कीच धार्मिक लोकांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात, ती बाब म्हणजे ते धार्मिक असल्याचे ढोंग करत नाहीत.  लोक धार्मिक आहेत, हा मानवजातीपुढचा प्रश्न नाही. लोक धार्मिक असल्याचे ढोंग करत आहेत, धार्मिकतेच्या ढोंगाआड अधर्माचरण करत आहेत आणि भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धाभावाशी खेळत आहेत; हा खरा आणि गंभीर प्रश्न आहे.  त्याला ज्या धर्माचे वा धर्मपंथाचे अनुयायी असल्याचे लोक सांगतात, त्या धर्माचे वा धर्मपंथाचे मूळ तत्त्वज्ञान व्यवहारात असणारा आणि धर्माने वा धर्मपंथाने सांगितले आहे तसे तंतोतंत वागणारा मानवसमूह पृथ्वीच्या पाठीवर कुठेच नाही. भूतकाळातही नव्हता आणि भविष्यातही असणार नाही. जर असेलच, तर व्यक्तीचा अपवाद असू शकतो.
या प्रयत्नात  जे स्वतःला हिंदू धर्माचे किंवा हिंदू धर्मातील एखाद्या पंथाचे अनुयायी समजतात ते लोक वेदांतील तत्त्वप्रणालीस प्रमाण न मानणाऱ्या व देव-दैववादी नसणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणत असतात. त्यांच्या दृष्टीने नास्तिक लोक धर्मभ्रष्ट असतात. धर्मभ्रष्टतेमुळे ते महापातकी झालेले असतात. मृत्युनंतर ते नरकात जातात.
जे धार्मिक असल्याचे ढोंग करतात ते लोक स्वतःला आस्तिक समजत असतात. त्यांचा असा गैरसमज असतो की, ते धर्मपरायण आणि ईश्वरोपासक आहेत. ते धर्मप्रामाण्यवादी असल्यामुळे पुण्यवंत आहेत आणि त्यामुळे मृत्यूनंतर ते पुण्यलोकात म्हणजेच स्वर्गात जाणार आहेत. वस्तुतः, हा त्यांचा भ्रम आहे.
तात्पर्य, बदललेल्या काळाची व सभोवतालाची जाणीव न ठेवता अविवेकीपणे एखाद्या धर्मग्रंथाला प्रमाण मानण्यात कोणत्याच प्रकारचे शहाणपण नाही. मग तो धर्मग्रंथ कोणत्याही धर्माचा असो, तो कितीही प्राचीन असो आणि कोणीही लिहिलेला वा सांगितलेला असो.
अर्थात, 'माणूस म्हणजे विचार करणारा प्राणी होय,' हे विशेषण मिरवणाऱ्या माणसासाठी त्याने ग्रंथप्रामाण्यवादी नि देवदैववादी असणे ही बाब गौरवाची ठरत नाही. उलट प्रयत्नवादी आणि विवेकवादी असणे ही बाबच 'माणूस' असण्याची खरी खूण जपणारी जपणारी आहे. इथे आपणास हिंदू धर्माचा एक भाग असणाऱ्या आणि भागवत संप्रदाय ते वारकरी संप्रदाय असा प्रवास करत आलेल्या वारकरी संप्रदायाची चर्चा करावयाची आहे. ती चर्चा संत तुकारामांच्या अभंगांच्या संदर्भाने करायची आहे.
संतांनी वारकरी संप्रदायाची उभारणी केली. परमार्थाचा एक लोकविलक्षण नवा मार्ग सांगितला. संतांनी सांगितलेला मार्ग साधा, सोपा आणि सोयीचा होता. बहुसंख्य लोकांना तो आचरणसुलभ वाटला. साध्यरूप वाटला. आवडला. हजारो लोक वारकरी संप्रदायाशी जोडले गेले. संत नामदेवांसाठी औंढा येथील नागनाथांच्या मंदिराचे दार फिरल्याची कथा खूप सूचक आहे. संतांनी इतिहास घडवला आहे, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही.
संतांनी त्यांच्या संप्रदायाचे म्हणून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते चांगलेच आहे. त्यामुळेच बहुसंख्य लोक या संप्रदायाकडे वळले. संत नामदेवांनी पाया रचलेल्या या संप्रदायाचा संत तुकारामांच्या काळापर्यंत खूप विस्तार झाला होता. संत तुकारामांच्या दृष्टीने ही गोष्ट अतीव आनंदाचीच होती; परंतु या संप्रदायाच्या विचारांचे सत्त्व जपणेही तेवढेच आवश्यक असून सांप्रदायिकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे, याचेही त्यांना भान होते. ही जाणीव संत नामदेव व इतर संतांनाही होतीच. सांप्रदायिकांनी काही पथ्य पाळावे व या संप्रदायाचे पावित्र्य नि सत्त्व जपावे हे अत्यंत तळमळीने त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
या संप्रदायाच्या स्थापनेपासूनच संतांना तसे सांगावे लागले याचा अर्थ असा होतो की, अगदी प्रारंभापासूनच अनेक जण या संप्रदायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध वागत होते. स्वतःला वारकरी म्हणवून घेणारे आणि वारकरी असल्याचे ढोंग करणारे अनेक जण सांप्रदायिक विचारांचे पावित्र्य जपत नव्हते. परिणामी संत नामदेवांपासून सगळ्या संतांना अशा ढोंग्यांवर टीका करावी लागली. संत तुकारामांचा काळही त्याला अपवाद नव्हता. स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्यांच्या अपप्रवृत्ती तुकारामांच्याही अनुभवाला आल्या आणि त्यांनी तशा प्रवृत्तींवर प्रहार केले. त्या दृष्टीने संत तुकारामांच्या पुढील अभंगांचा विचार करता येईल.
संतांनी विठ्ठलाला दैवत मानले. विठ्ठलभक्तीचा मार्ग प्रस्थापित केला. त्या मार्गाचे तत्त्वज्ञान सांगितले. ते तत्त्वज्ञान स्वतः आचरणात आणून त्या तत्त्वज्ञानाला सत्त्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. मात्र, अनेक ढोंगी वारकऱ्यांनी विठ्ठलालाही विकले. विठ्ठलभक्तीचा बाजार मांडून स्वतःची पोटे पोसली. कीर्तनासाठी पैसे घ्यायला सुरुवात केली. वारकरी संप्रदायाला बदनाम केले. अशा पोटार्थी लोकांवर संत तुकारामांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे-
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । शि यातिशीं कारण नाहीं देवा ॥
आशाबद्ध नये करूं तें करिती ।  तुका म्हणे जाती नरकामधीं ।। (१२३)
'जो माणूस मुलीची, गाईची आणि हरिकथेची विक्री करतो तो माणूस दुर्जन समजावा. देवाला सद्गुणी माणूस प्रिय असतो. जो दुर्गुणी असतो तो अप्रिय असतो. देव माणसाचे गुण पाहतो. जन्म-जातं कोणती ते पाहत नाही. जी माणसे लोभी असतात ती अनुचित कर्म करतात आणि नरकात जातात. '
वरील अभंगात संत तुकारामांनी माणसांच्या हावरटपणावर आणि अहंगंडांवर टीका केली आहे. देवाला माणसाची जात नव्हे, तर गुण प्रिय असतो हे नोंदवले आहे. आपण जन्मानेच श्रेष्ठ आहोत असा अहंकार बाळगणाऱ्यांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे जो कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे केल्याचे पैसे घेतो तो माणूस कमालीचा दुष्ट होय, असा निर्वाळा दिला आहे. कीर्तनासाठी पैसे घेणे म्हणजे पोटच्या मुलीला विकून पैसे घेतल्याइतके वाईट असल्याचे म्हटले आहे. अशा कीर्तनकाराला संत वा महाराज म्हणता येणार नाही, कारण ते कमालीचे चोडाळ असतात. अधम असतात.

संत तुकारामांनी म्हटले आहे- 'पैशाच्या आशेने कीर्तन करणारा कीर्तनकार आणि पैसे देऊन कीर्तन ऐकणारा श्रोता हे दोन्ही अधर्माचरणी नि महापातकी होत.' त्यांनी लिहिले आहे -

आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥
वायां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ।।
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥
माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ।।
(६७९)
"वक्ता जर केवळ पैशाच्या लोभापायी कीर्तन करत असेल, तर श्रोता शांतचित्ताने ते कीर्तन ऐकेल कसा ? कारण श्रोत्याच्या मनात वक्ता पैसे किती मागेल ? याची काळजी असते. तशा भजनांतून दोघांच्याही हाती काहीही लागत नाही. कोणालाही काही फायदा होत नाही. बहिरा माणूस आणि मुका माणूस एकत्र येऊनही त्यांचा परस्परांना काहीही फायदा होणार नाही. कारण मुका बोलू शकत नाही आणि बहिऱ्याला ऐकू जाणार नाही. त्याच न्यायाने आशाळभूत वक्ता आणि लोभी श्रोता यांच्या एकत्र येण्याने कोणाचाही फायदा होणार नाही. त्यांचा सगळा हरिकथेचा उद्योगच निरर्थक आहे. गोणीतले धान्य बाहेर काढले आणि मापाने मोजून दुसरीकडे टाकले. आता मापही रिकामे आणि गोणीही रिकामी. त्याच न्यायाने लोभी वक्ता आणि श्रोता दोन्ही रिकामे असतात. त्यांचे जीवन व्यर्थ जाते.

संत तुकारामांचा वरील आशयाचा आणखी एक अभंग उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लोभी वक्त्याला ज्ञान नसते, तर तो काहीतरी मिळेल म्हणून निरर्थक बडबड करत असतो. घरोघर फिरून पोट भरणाऱ्या लोभी मांजरासारखा तो तोंड वासून घरोघर भीक मागत फिरत असतो, फुकटचे खात असतो, असे म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे-
आशाबद्ध वक्ता ।  भय श्रोतियाच्या चित्ता ॥
गातो तें चि नाहीं ठावें ।  तोंड वासी कांहीं द्यावें ॥
जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ।।
माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ।। (१४८२)
संत तुकारामांनी म्हटले आहे- 'कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेसाठी पैसे घेणारे तथाकथित संत, साधू, कीर्तनकार, भजनी, प्रवचनकार हे लोक जेवढे पातकी असतात तेवढेच त्यांना पैसे देणारे लोकही पातकी असतात.' त्यांनी लिहिले आहे-
त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयतासी जातां ॥
माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥
देतां घेतां नरकवासी उभयतांसी रवरव ।।
तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ।। (४०३३)
'जे लोक पैशासाठी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करतात आणि जे लोक कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करणाऱ्यांना पैसे वा इतर स्वरूपात मोबदला देतात ते घेणारे नि देणारे दोघेही नरकात जातात. एवढेच नाही, तर तशा हरिकथेसाठी पैसे देणाऱ्यांचे आणि पैसे घेणाऱ्यांचे तोंडही पाहू नका. कारण, त्यांचे तोंड पाहणेही पापकर्म ठरते. त्यांचे तोंड पाहणारेही नरकात जातील. हरिकथा ही बाब जन्मदात्या आईपेक्षाही थोर असते. हरिकथेसाठी पैसे घेणे म्हणजे स्वतःची आई उपभोगार्थ दुसऱ्याला देऊन त्याच्याकडून पैसे किंवा मोबदला (भाड) घेण्याइतके वाईट आहे. तेव्हा कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेसाठी कोणाकडूनही पैसे घेऊ नका आणि कोणाला पैसे देऊ नका. कारण, अशी देवघेव करणाऱ्यांचा नक्कीच अधःपात होईल. अशी नीच व लोभी माणसे नरकात पडतील.

संपत्ती जमवावी, पण ती चांगल्या मार्गाने. त्या संपत्तीचा उपभोग घ्यावा. माणुसकी जपत आनंदाने जगावे, ही संत तुकारामांची स्वच्छ भूमिका होती. " जोडोनियां धन उत्तम व्यव्हारें । उदास विचारें वेच करी ।। ....” (२८६४) हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. मात्र, उचित नि सन्मानाचा मार्ग सोडून पोट पोसण्यासाठी देव आणि धर्माचा बाजार मांडणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात अत्यंत चीड होती. त्यांनी लिहिले आहे-

कथा करोनियां द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ।। (१४७०)

जे कोणी द्रव्यासाठी हरिकथा सांगतात आणि जे तशा लोकांना द्रव्य देतात ते दोघेही नरकात जातील. देवाधर्माच्या नावाने अशी देवघेव करणारी माणसे कुंभीपाक आणि रौरव नावाच्या नरकात वेदना भोगतील. देवालाही त्यांची करुणा येणार नाही. धारदार तलवारीने त्यांच्या अंगांचे तुकडे केले जातील. त्यांना तापलेल्या जमिनीवरून चालवले जाईल. अशा माणसांचा नरकवास कदापि चुकणार नाही. कारण ते यमाच्या हाती लागलेले आहेत.

कथा करोनियां मोल ज्यापें घेती । तेही दोघे जाती नरकामध्यें ||
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ।।
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ।।
तुका म्हणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ।। (१४७८)

कीर्तन, भजन इत्यादींसाठी पैसे घेणारे आणि देणारे दोघेही निःसंशय नरकात जातात. खरे कल्याण केवळ नामभक्तीने होते. त्यासाठी कर्मकांडांची गरज नाही. केवळ नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय इतर शब्दांच्या प्रेमात पडू नका. मग ते कितीही गोड असोत. अन्यथा तुम्ही नरकात जाल. नामभक्तीचा मार्ग स्वीकारा सर्व काही मिळेल. ब्रह्मांडही लहान वाटेल. आयुष्यात कधीच लाचार होऊन कोणापुढे हात पसरू नका. भजन-कीर्तन करून पैसे मागू नका.  तसे पैसे मागून भिकाऱ्यांसारखे जीवन जगणाऱ्यांचा धिक्कार असो. तसले लाजिरवाणे जगणे व्यर्थ आहे.
संत असल्याचे ढोंग करणाऱ्यांना, त्यासाठी तशी बाह्य लक्षणे सांभाळणाऱ्यांना नि अंतर्मनात स्वहित जपणाऱ्यांना व पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करत फिरणाऱ्या पोटार्थ्यांना संत तुकारामांनी ‘मैंद' (लबाड, लुटारू, विश्वासघातकी) म्हटले आहे. अशा नाटकी लोकांविषयी त्यांनी लिहिले आहे-
टिळा टोपी माळा देवाचें गबाळें । वागवी वोंगळें पोटासाटीं ।।
तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥
कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ।।
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ।। ( ७८८ )

मनात भक्तिभाव नसताना कपाळाला गंध लावणे, डोक्यावर टोपी घालणे आणि गळ्यात माळा घालणे ही संत असल्याची बाह्यलक्षणे मिरवणे म्हणजे वेंधळेपणा होय. पोट भरण्यासाठी केलेला हा घाणेरडा प्रकार होय. तुळशीची पाने कानात घालून मौनव्रताचे नाटक केल्याने, शेंडीत दर्भाची काडी खोवून पुरोहित वा अग्निहोत्री असल्याचे सोंग केल्याने आणि नाक दाबून धरून प्राणायाम केल्याचे ढोंग केल्याने काहीही साध्य होणार नाही. कीर्तन करताना खोटेखोटे भावनिक झाल्याने, लटिकेच रडल्याने आणि मनात प्रेम नसताना डोळ्यात पाणी आल्याचा देखावा केल्याने काहीही साध्य होणार नाही. असा दांभिकपणा करणाऱ्या लुच्चा लोकांजवळ (मइंदाजवळ) देव नसतो.

माणसाने श्रम करून सन्मानाने जगावे ही संत तुकारामांची भूमिका होती. संत असल्याचे ढोंग करणाऱ्यांविषयी आणि पोट पोसण्यासाठी देवाच्या नावाने मनाला येईल ती बडबड करत फिरणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची चीड होती. अशा ढोंगी, ऐतखाऊ नि धूर्त लोकांविषयी त्यांनी लिहिले आहे-
न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका व्यवहार करीतसे ॥
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥
द्रव्यइच्छेसाटी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ।
पोट पोसावया तोंडें बडबडी ।  नाहीं धडफुडी एक गोष्टी ।।
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनियां भंड जनामध्यें ।। ( ३८८८)

ज्यांना कोणतेच ज्ञान नाही आणि उचित- अनुचित कळत नाही, तर केवळ पोट पोसण्यासाठी जे संत असल्याचे ढोंग करतात त्यांचा जन्म म्हैसीपोटी (विश्वामित्री पोटीं) झाला असे समजावे. त्यांना दुर्जन समजावे. जो पैसे मिळवण्यासाठी हरिकथा करतो आणि टाळ कुटीत फिरतो तो महापातकी होय. त्याला चांगल्या मार्गाने श्रम करून जगता येत नाही का? ज्याला काही कळतही नाही आणि ज्याचे आचरण नीट नाही त्याने पोटासाठी कशाला बडबड करत फिरावे? हरिकथेची वल्गना ( भंड) करत फिरणाऱ्याला त्याच्या आईने व्यर्थ जन्म दिला.

पोटासाठी वारकरी संप्रदायाची अप्रतिष्ठा करणाऱ्यांविषयी संत तुकारामांच्या मनात कमालीची चीड दिसते. ती चीड अभिव्यक्त करताना ते लिहितात-
मुखें सांगे ब्रह्मज्ञान ।  लोकाची कापितो मान ॥
ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ।।
कथा करितो देवाची  अंतरीं आशा बहु लोभाची ।।
तुका म्हणे तो चि वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ।। (४०२१)

जो लोकांना ज्ञान सांगतो. मात्र, आपण तसे वागत नाही; उलट लोकांना फसवतो. पैशाची हाव धरून भजन, कीर्तन करतो. असे शब्दपांडित्य मिरवणाऱ्याला नालायक समजावे. मूर्ख समजावे. तशा माणसाचे थोबाड फोडावे.

संत तुकारामांनी वारकरी सांप्रदायिकांसाठी आणि सांप्रदायिक कीर्तनकारांसाठी पुढील आचारसंहिता सांगितली आहे. त्यांनी लिहिले आहे-
जेथें कीर्तन करावें ।  तेथें अन्न न सेवावें ॥
बुका लावूं नये भाळा |  माळ घालूं नये गळां ।।
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ।।
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ।। ( ३०८४)

कीर्तनकाराने कीर्तन केलेल्या ठिकाणचे अन्न खाऊ नये. अर्थात, तिथून काही द्रव्य मिळवण्याची वा अन्न मिळवण्याची आशा कीर्तनकाराला असू नये. कीर्तनकाराचे जगणे विरक्त असावे. कीर्तनकाराने दुसऱ्यांच्या कपाळाला बुका लावून व त्यांच्या गळ्यात माळ घालून इतरांचा गुरू होऊ नये. शिष्यसंप्रदाय तयार करू नये. कीर्तनकारांसोबत जर त्यांचा घोडा, बैल वगैरे असेल, तर त्यांच्यासाठी चारासुद्धा मागू नये. त्याची सोय स्वतःच करावी. तात्पर्य, कीर्तनकाराने निःस्पृह असावे. कीर्तनकाराने कीर्तन केल्याचा मोबदला म्हणून पैसे (द्रव्य) घेऊ नये आणि सांप्रदायिकांनी त्यांना तसा मोबदला (द्रव्य) देऊ नये. अन्यथा तसा मोबदला (द्रव्य) देणारे आणि घेणारे नरकात जातील.

पिंडपोषकाच्या जळो ज्ञानगोष्टी ।  झणी दृष्टिभेटी न हो त्याची ।।
नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ।।
पोहों नेणे कसे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥
सिणलें तें गेलें सिणलियापासीं । ॐ जाली त्या दोघांसी एक गति ।।
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ।। (४०६१)
स्वतःचे पोट पोसण्यासाठी जे धार्मिक असल्याचे सोंग करतात, लोकांना परमार्थाच्या गोष्टी सांगतात त्या ढोंगी लोकांच्या ज्ञानाला आग लागो. तसली अनीतिमान माणसे चुकूनही नजरेला न पडोत. जो स्वतः सद्विचारी नि सद्वर्तनी नाही त्याने दुसऱ्याला उपदेश करू नये. जर स्वतःला पोहता न येणारा माणूस दुसऱ्याला पोहायला शिकवत असेल, तर त्या मूर्खाला काय म्हणावे? जर एखादा थकलेला माणूस दुसऱ्या थकलेल्या माणसाकडे गेला, तर त्याचा फायदा काय होणार ? कोणालाही कोणाचा फायदा होणार नाही. उलट दोघांचेही दुःख वाढेल. त्याच न्यायाने अंगी पात्रता नसणाऱ्यांच्या उपदेशाने कोणाचाही फायदा होणार नाही. दीननाथ असणाऱ्या देवा, तसले मूर्ख लोक माझ्या नजरेला पडू नयेत. जे लोक पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन, वारी, दिंडी, यात्रा, सप्ताह वगैरे करत फिरत असतील, लोकांना निरर्थक तत्त्वज्ञान सांगत असतील; पण जर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कोणतीच संगती नसेल, तर त्यांच्याकडून लोकांना काहीही फायदा होणार नाही. अशा पोटभरू लोकांचे निःसत्त्व ज्ञान म्हणजे स्वप्नातल्या श्रीमंतीसारखे आहे. कागदावर साखर असा शब्द लिहून तो चाटल्याने तो शब्द गोड लागणार नाही. त्याच्याने पोट भरणार नाही. कोणताही फायदा होणार नाही. त्याच न्यायाने पैसे घेऊन कीर्तन करणाऱ्यांना आणि तशा कीर्तनकारांना पैसे देणाऱ्यांना कोणताच पारमार्थिक लाभ होणार नाही. पैसे देणाऱ्यांच्या प्रपंचाचे मात्र वाटोळे होईल. मुळात हा सगळा व्यवहारच तत्त्वशून्यतेचा होय. तिरस्करणीय होय. असा व्यवहार करणारी माणसे नादान आणि कर्तृत्वशून्य असतात. ढोंगी आणि नालायक असतात, ही संत तुकारामांची भूमिका होती. तसे लोक नक्कीच नरकात जातील, हेही त्यांनी नोंदवले आहे. त्यांनी लिहिले आहे-
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठी नाहीं ।
तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी ।  ज्ञान पोटासाटीं विकों नये ।।
बोलाचीच कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ।।
कागदी लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ।।
तुका म्हणे जळो जळो त्याचें ज्ञान । यमपुरी कोण दंड साहे ।। (४३९३)
स्वप्नात जरी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आणि व्याजाच्या रुपयांची व्यवस्थित नोंद (काळांतर लेखा) करून ठेवली, तरी प्रत्यक्ष जाग आल्यावर त्यातला एक पैसाही मिळत नाही. त्याच न्यायाने पोट पोसण्यासाठी शब्दज्ञानाच्या केलेल्या कोरड्या बडबडीने काहीही साध्य होणार नाही. तेव्हा तसले अनुचित काम करू नये. पोट भरण्यासाठी पारमार्थिक होऊ नये नि लोकांना देवाधर्माचे पोकळ ज्ञान सांगत फिरू नये. बोलाचा भात व बोलाचीच कढी खाऊन कोणाचे पोट भरत नसते किंवा कागदावर लिहिलेला 'साखर' शब्द चाटल्याने तो शब्द गोड लागत नसतो. तसेच जी बाब आपण लोकांना सांगतो ती बाब जर आपल्या अनुभवाचा भाग नसेल आणि आपल्या व्यवहाराचा भाग होत नसेल, तर ते सगळे सांगणे व ऐकणेही व्यर्थ आहे. अशी व्यर्थ बडबड करत फिरणाऱ्याचे ते ज्ञान जळून जावो. त्यांच्या नादी लागू नका. अन्यथा तुम्हालाही यमपुरीच्या वेदना भोगाव्या लागतील.

कीर्तन, भजन, प्रवचन इत्यादींसाठी पैसे घेणारे लोक आणि तशा आपमतलबी लोकांना पैसे देणारे लोक यांच्याविषयी संत तुकारामांच्या मनात कमालीची चीड होती. देवाधर्माचा बाजार मांडून पोट पोसू नये आणि लोकांनी देवाधर्माचा बाजार मांडणाऱ्यांना साह्य करू नये, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी असेही म्हटले आहे की, कीर्तन करण्यासाठी पैसे घेणे म्हणजे मातृगमनाइतके वाईट आहे, कीर्तनासाठी पैसे घेणे म्हणजे स्वतःच्या आईला वेश्या व्यवसाय करायला लावून त्याचे पैसे (भाड) घेण्याइतके वाईट होय. 'विठ्ठलाचे गुणकीर्तन' ही बाब वारकऱ्यांसाठी आईपेक्षाही थोर आहे. मग पोट भरण्यासाठी कीर्तन करणे याच्याइतके वाईट काय असू शकते ? पोटासाठी स्वतःच्या आईलाच विकणार का ? हा त्यांचा रास्त प्रश्न आहे. वाईटातला वाईट माणूसही पोट पोसण्यासाठी आईची भाड खात नाही, मग जर वारकरी आपल्या आईला (हरिगुणकीर्तनाला) विकत असतील, तर त्याच्याइतके लाजिरवाणे दुसरे काय असणार? संत तुकारामांनी म्हटले आहे की, पैसे घेऊन कीर्तन करणारे लोक आणि तशा कीर्तनकाराला पैसे देणारे लोक नक्कीच नरकात जातील. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अशा पापांमुळे त्यांचे पूर्वजही नरकात जातील. तशा माणसांचे तोंडही पाहू नये. कारण त्यांचे तोंड पाहणाऱ्यांचेही पूर्वज नरकात जातील. त्यांनी लिहिले आहे -

कीर्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाई धन विटाळ तो ।।
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति । एक इजवर पोट भरती चांडाळ ते ।
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईना जननीची ॥
तुका म्हणे त्याचें दर्शन ही खोटें । कापूर्वासि नेटें नरका धाडी ।। (४४१०)

संत तुकारामांची भूमिका रास्त आहे. ते म्हणतात- (माणसाने देवाधर्माला विकून लाचारीचे व तत्त्वशून्य जीवन जगू नये, तर कष्ट करून सन्मानाचे जीवन जगावे.
वारकरी सांप्रदायिकांनी आपले दैवत असलेल्या विठ्ठलाला विकायला काढू नये, वारकऱ्यांनी वारकरी संप्रदाय बदनाम करू नये आणि सांप्रदायिक तत्त्वज्ञानाला काळिमा फासू नये, ही त्यांची अंतःकरणापासूनची तळमळ होती. त्या तळमळीपोटीच पुनःपुन्हा सांगत राहिले की - 'बाबारे! पोटासाठी आपल्या दैवताला विकू नका, संप्रदायाची बदनामी करू नका, सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचे सत्त्व जपा व ते तत्त्वज्ञान आचरणात आणा.
संत तुकारामांनी लोकांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. वस्तुस्थिती हीच आहे की, सांप्रदायिकांनी संत तुकारामांचे म्हणणे फार काही मनावर घेतले नाही. उलट निर्लज्जपणे संत तुकारामांचे सोयीचे अभंग आधाराला घेऊन कीर्तन करत राहिले. विठ्ठलाला विकत राहिले. विठ्ठलभक्तीचा बाजार मांडत आले. मांडत आहेत. कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेंसाठी पैसे घेणाऱ्या आणि पैसे देणाऱ्या लोकांना जर कोणी संत तुकारामांच्या उपरोक्त अभंगांची आठवण करून दिली आणि त्यांना परमार्थ मार्गात अशी पैशांची देवघेव उचित ठरत नाही; तेव्हा तुम्ही पैसे घेऊ नका नि वारकरी संतांनी लिहिलेले अभंग, वारकऱ्यांचे दैवत असणारा विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांची विक्री करू नका असे सांगितले, तर त्यांचे उलट उत्तर तयारच असते. ते उत्तर पुढील दोन पद्धतीचे असते. १) ते लोक संत तुकारामांच्या अभंगांचा इतरांनी लावलेला अर्थ नाकारतात आणि त्यांच्या सोयीचा अर्थ लावतात. त्यांनी त्यांच्या सोयीने लावलेला अर्थ इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आत्मा, परमात्मा, ब्रह्मज्ञान, परब्रह्म इत्यादी शब्दांचा भडिमार करतात. थोडक्यात म्हणजे शब्दच्छल करतात. इतरांना गोंधळून टाकतात. आणि (२) जर शब्दच्छलाने काम जमले नाही, तर स्वतःच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित करतात. जर आम्ही पैसे घेतले नाहीत, तर मग आम्ही जगायचे कसे ? आमच्या लेकरांना पोसायचे कसे? असे त्यांचे प्रश्न असतात.

संत नामदेवांपासून ते संत तुकारामांपर्यंत सगळ्या संतांनी पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन, वारी, दिंडी, यात्रा, सप्ताह वगैरे करत फिरणाऱ्या लोकांवर आणि आपमतलबासाठी देवाधर्माचा बाजार मांडणाऱ्या दुष्प्रवृत्तींवर प्रहार केले आहेत. याचा सरळ अर्थ असा की, त्या काळातही ही प्रवृत्ती होतीच. स्वहितासाठी देवाधर्माला विकणारे लोक तेव्हाही होतेच. त्या काळातही कीर्तनकार पैसे घेत होते. जर तसे नसते, तर संतांनी तशा लोकांवर टीका केली नसती. दुसरे म्हणजे परमार्थमार्गात पैशाची देवघेव करणारे लोक आज जसे स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करतात, शब्दच्छल करतात वा नको ते प्रश्न उपस्थित करतात तसेच त्या काळातल्या लोकांनीही केले असेल. थेट संत तुकारामांनाही प्रश्न विचारले असतील आणि मग संत तुकारामांनीही त्यांना थेटपणे उत्तरे दिली असतील.
प्रापंचिक माणसाला त्याच्या कुटुंबाचे पोषण करावे लागते नि त्यासाठी द्रव्य लागते याची जाणीव संतांना होतीच. तुम्ही प्रपंच सोडून परमार्थाच्या मागे लागा, भजन, कीर्तन वगैरे करत फिरा असा संतांचा कोणालाही आग्रह नव्हता. उलट संतांनी लोकांना, तुम्ही तुमचा संसार नीट करा, प्रामाणिक व्यवहार करून आपले कुटुंब नीट पोसा, एकमेकांना समजून घेत व साह्य करत बंधुभावाने जगा, जेथे आहात तेथे व जसे आहात त्या स्थितीत केवळ नामस्मरण करा, तोच खरा परमार्थ आहे... असे ठणकावून सांगितले. त्याची सविस्तर चर्चा मागे आली आहेच.
संत तुकारामांनी सांगितले की, 'बाबारे! प्रपंच सोडून परमार्थ करण्याची गरज नाही. माणुसकी जपत प्रामाणिकपणे नीट संसार करण्यातूनच पुण्य मिळवता येते. तसा संसार करणे म्हणजेही एक प्रकारचा परमार्थच होय. संसार करणाऱ्यांनी संतांसारखा वेगळा परमार्थ करण्याचा मार्ग स्वीकारू नये. तशी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाही वा जबाबदारी टाकलेली नाही आणि तुम्ही या मार्गात आला नाहीत म्हणून काही कोणाचे नुकसानही होणार नाही. सामान्य लोकांना संतांसारखे अनासक्त वृत्तीने परमार्थ करणे जमणार नाही. तेव्हा त्यांनी उगीच पारमार्थिक असल्याचे भक्ती ही सुळावरल्या पोळीसारखी कठीण गोष्ट आहे. जो कोणी या मार्गाची निवड करतो नि विहित मार्गाचे अनुसरण करतो त्याला अपवादात्मक शूर म्हणायला हवे. पाहावे तेथे केवळ भक्तीचे ढोंग दिसत आहे. खरी भक्ती दिसत नाही. हा सगळा प्रकार म्हणजे पाया मजबूत नसणाऱ्या भिंतीसारखा आहे. तकलादू आहे. जर मनातून आणि नीट स्वयंपाक केला (कामावले), तर त्याला रुची असते. अन्यथा ते अन्न चवहीन होते. उगीच नको ते साहित्य नको त्यात मिसळले, तर सगळेच बिघडते. त्या तशा अन्नाला कितीही चवदार म्हटले तरीही ते मुळात चवहीनच असते. ते अन्न खाण्याच्या लायकीचेही नसते. वरवरच्या भक्तीचेही तसेच असते. जर तुमचे तुमच्या विकारांवर नियंत्रण असेल आणि तुम्ही नेहमी सावध असाल, तरच पारमार्थिक व्हा. जर हे शक्य नसेल, तर मग संसार नीट करा. परमार्थाच्या मागे लागू नका.
जुझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ।।
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ।।

ढोंग करून हा मार्ग कलंकित करू नये. निर्विकारपिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वृत्तीने परमार्थ करणे, म्हणजे सुळावरची पोळी होय. तेव्हा याच्या नादाला लागू नये.
जे लोक कमालीच्या निर्लज्जपणे असे म्हणतात की, 'जर आम्ही पैसे घेतले नाहीत, तर मग आम्ही आमच्या लेकरांना काय खाऊ घालायचे?' त्यांनी संत तुकारामांचे पुढील अभंग नीट समजून घ्यायला हवेत. संत तुकारामांनी म्हटले आहे-
भक्ति तों कठिण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर |
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ।।
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ।
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ।। (१५४१)

तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ।। (३८७४)

युद्धाच्या गोष्टी ऐकायला छान असतात, प्रत्यक्ष युद्ध करणे सोपे नसते. हरिभक्तीचेही तसेच आहे. पारमार्थिक असणे हे जिकिरीचे काम आहे. जीव धोक्यात घालून करावयाचे काम आहे (सुळावरची पोळी आहे. ) तेव्हा एकमेकांचे ऐकून परमार्थाच्या नादी लागू नका. पोट पोसण्यासाठी पारमार्थिक होणे म्हणजे इंद्रियांच्या अंकित असणे होय. असल्या लटक्या भक्तीने कोणाचेही काहीही भले होणार नाही. '
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे 1
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ।। 55
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ।
तुका म्हणे करुनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ।। (७११)

परमार्थाच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत; परंतु तसे अनासक्त वागणे अवघड आहे. वैराग्य ही सहजसाध्य बाब नाही. त्यासाठी जीव संकटात घालावा लागतो. लोक 'मी संन्यस्त वृत्तीने जगतो' असे म्हणतात, पण ते काही खरे वाटत नाही. सर्वसंगपरित्याग करून निरिच्छ वृत्तीने जगणे म्हणजे प्रत्येक घासाला विष खाण्याइतके अवघड आहे. ज्याने तसे वागणे आत्मसात केले आहे त्याला धन्यच म्हटले पाहिजे. जो ‘मी संन्यस्त वृत्तीने जगतो' असे म्हणतो, तो जर खरेच तसे जगत असेल, तर मी त्याचे पाय माझ्या अंतःकरणात जपेन.' अर्थात, परमार्थ ही सहजसाध्य होणारी गोष्ट नाही. तेव्हा उठसूट कोणीही परमार्थाच्या फंदात पडू नये. ज्यांना शक्य आहे आणि ज्यांच्या अंतर्यामी वैराग्यभाव आहे त्यांनीच परमार्थमार्गात यावे. अशीच सच्ची माणसे या मार्गाचे पावित्र्य टिकवून ठेवू शकतील. सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचे सत्त्व जपतील आणि अशीच माणसे जनसामान्यांना जीवनाचा योग्य मार्ग दाखवतील, यावर संतांचा विश्वास होता.
अशी माणसे फार असणार नाहीत, याचेही त्यांना भान होते. पण ती अपवादात्मक माणसेच वारकरी संप्रदायाचे महत्त्व टिकवतील, तशा माणसांमुळेच संप्रदायाला नैतिक अधिष्ठानाचे बळ मिळत राहील, ही त्यांची रास्त भूमिका होती. विशेष म्हणजे अशा अपवादात्मक माणसांनीच वारकरी संप्रदायाचे सत्त्व जपले आहे. संत गाडगेबाबा हे त्याचे अलीकडचे उत्तम उदाहरण होय. परमार्थमार्गात खूप लोक जमवून परमार्थाचा बाजार भरवायचा नसतो याची संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत कबीर, संत रोहिदास, संत तुकाराम इत्यादींना जाणीव होती. म्हणून ते सांसारिकांना 'तुम्ही तुमचा संसार नीट करा. परमार्थाच्या फंदात पडू नका.' असा थेट
सल्ला देत होते.

वारकरी संप्रदायाने सांसारिकांसाठी सांगितलेला भक्तिमार्ग सोपा आहे. त्यांनी केवळ 'विठ्ठल - विठ्ठल' किंवा ‘रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा' या नामाचा जप करावयाचा आहे. मात्र, ज्यांना विरक्त पारमार्थिक व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाही. जर या मार्गात आलात, तर तुम्ही संसाराला मुकाल, असे संतांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. अर्थात, प्रापंचिकांनी आपला प्रपंच करताना केवळ नामभक्ती करावी, 'विठ्ठल - विठ्ठल' किंवा 'रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा' या नामाचा जप करावा. त्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, सोवळे-ओवळे असे कोणतेही बंधन नाही. व्यवहारांत माणुसकीचा धर्म पाळावा, समूहभाव जपत समूहजीवन जगावे, ही त्यांची भूमिका आहे. संत तुकारामांनी लिहिले आहे-
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥
भक्तीची ते जाती ऐसी सर्वस्वासी मुकावें ।।
भिक्षा आणि वेवसाव काला करितो गाढव ।।
करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ।
तुका म्हणे होंई शूर । किंवा निसुर मजुर ।। (९०२)

भक्ती ही सहजसाध्य बाब नाही. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. विरक्त पारमार्थिक होण्यासाठी संसार सोडावा लागतो. ज्यांना असे करणे शक्य नाही, ज्यांचे मन संसारात गुंतले आहे आणि ज्यांना संसार सोडवत नाही त्यांनी या मार्गाच्या फंदात पडू नये. भिक्षा आणि व्यवसाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या एक समजू नयेत. भीक मागणाऱ्यांनी 'मी भीक मागण्याचा व्यवसाय करत आहे.' असा समज करून घेऊ नये. त्याच न्यायाने विरक्त असणे आणि सांसारिक असणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एक समजू नयेत. जो तसे समजतो तो मूर्ख (गाढव ) होय. स्वार्थासाठी कीर्तन, भजन, प्रवचन करत फिरणाऱ्यांनी निःस्वार्थीपणाचे ढोंग करू नये. दुसऱ्यांचे काव्य चोरून आपल्या रचनेत मिसळणे आणि आपली रचना सुंदर (प्रासादिक) असल्याचा भ्रम निर्माण करणे म्हणजे तुपामध्ये पाणी मिसळण्यासारखे होय. मूर्खपणा होय. त्याच न्यायाने ढोंगी साधूने खऱ्या सात्त्विक हरिदासाचे ढोंग करणेही गाढवपणाचेच लक्षण होय. एक तर तुम्ही शूर सिद्धपुरुष (पारमार्थिक) व्हा किंवा मजूर (सांसारिक) व्हा. तात्पर्य हे की, सांसारिकांनी पारमार्थिक असल्याचे नाटक करू नये. आपला संसार नीट करावा.'

येणें मार्गों आले । त्यांचें निसंतान केलें ॥
ऐसी अवघड वाट । ऐकोन आलों मी बोभाट
नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ।। (२७८२)

जे विरक्त होऊन परमार्थ मार्गात येतात ते संसारापासून तुटतात. त्यांचा वंश पुढे वाढत नाही. अर्थात, ही वाट अतिशय अवघड आहे. जे या वाटेवरून चालत आहेत त्यांचा आक्रोश (बोभाट ) मला माहीत आहे. तेव्हा विचार करूनच या फंदात पडा. पुन्हा दुःख उगाळत बसू नका. इथली नागवण अशी आहे की, लंगोटीही शिल्लक राहत नाही. तो
पंढरपूरचा विठ्ठल पुन्हा तुम्हाला मागे फिरू देणार नाही. अर्थात, परमार्थात सर्वस्वाचा त्याग अपेक्षित आहे.
 
सदासर्वकाळ अंतरी कुटिल  तेणें गळां माळ घालूं नये ।।
तुका म्हणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें भगवें हातीं धरूं नये ।। (२७८९)

मनातून कपटी असणाऱ्या माणसाने माळकरी होऊ नये. ज्यांच्या अंगी दया, क्षमा, शांती हे गुण नाहीत आणि जो माणुसकीचा धर्म पाळत नाही त्यांनी अंगाला विभूती लावू नये. ज्याला भक्ती म्हणजे काय? हे माहीत नाही त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करू नयेत. ज्याचे स्वतःच्या मनावर व इंद्रियांवर नियंत्रण नाही त्यांनी संसार सोडून साधू होण्याचे सोंग करू नये. ज्याला हरिभक्तीचे मर्म कळाले नाही त्यांनी हाती भगव्या पताका घेऊन दिंडीत सामील होऊ नये. वारकरी असल्याचे ढोंग करू नये.
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचें काम नाहीं येथें ॥
बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ।।
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईल कळों ।। (१२०४)

संत असणे ही बाब वेगळी आणि वंदनीय आहे. केवळ शब्दांचे खेळ करून कीर्तन केल्याने कोणी संत होत नाही. एखादी म्हैस किंवा गाय खूप दूध देते म्हणून त्या म्हशीला वा गायीला कामधेनू म्हणता येणार नाही. तसेच केवळ चांगला कीर्तनकार म्हणजे चांगला संत असे नसते. संत होण्यासाठी संतत्व अंगी रुजवावे लागते. संतांसारखे आचरण असावे लागते.

आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हां चि गोसावी व्हावें तेणें ।।
नाहीं तरि सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ।।
आशा मारूनियां जयवंत व्हावें । ज्यासी नाहीं धर्म दया क्षमा शांति ।
तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ।। तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥
तुका म्हणे जरीं योगाची तांतडी
वारकरी जयासी न कळे भक्तीचें महिमान । आशेची बीबुडी करीं आधीं ।। (१४३६)
तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये ।।
ज्याचें मन नाहीं लागलें हातास ।

जर संत व्हायचे असेल, तर प्रथम आशा व स्वार्थाचा पूर्णतः त्याग करावा लागतो. ज्याला हे जमले आहे तोच संत असतो. केवळ त्यांनी लोकांना परमार्थाच्या गोष्टी सांगाव्यात. बाकीच्यांनी संत असल्याचे ढोंग करण्यापेक्षा नीट आपला संसार सांभाळावा. श्रम करून बायको व लेकरांना पोसावे. दुसऱ्यांना फसवू नये आणि संसारात स्वतःची फजिती करून घेऊ नये. मनातील इच्छा, वासना, लोभ वगैरेंवर नियंत्रण ठेवणे ज्यांना जमले आहे, ते विजयी (जयवंत ) होत. अशा लोकांनीच सर्वसंगपरित्याग करून घराबाहेर पडावे. ज्याला संत व्हायचे आहे त्यांनी प्रथम इच्छा, वासना, लोभ इत्यादींचा बीमोड (बीबुडी) केलाच पाहिजे. ज्यांना हे जमत नाही त्यांनी संसार सोडू नये नि संत असल्याचे ढोंग करू नये.

अनेक ढोंगी कीर्तनकार संत तुकारामांच्या पुढील अभंगाचे दाखले देत असतात
मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ।।
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ।।
सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥
तुका म्हणे आलें ।

थोडक्यात म्हणजे संत नामदेव, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत कबीर, संत तुकारामादी सगळे संत मुळात प्रापंचिक होते. त्यांनी लोकांना संसार करताना आचरणात आणता येईल असा एक नामभक्तीचा सोपा मार्ग सांगितला. प्रपंच करतानाच नामभक्ती करावी, ही त्यांची भूमिका होती. महत्त्वाचे म्हणजे संतांनी स्वतःच्या संसाराचा त्याग केला नाही. त्यांनी संसार करतानाच संप्रदायाची उभारणी केली, सांप्रदायिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली, संप्रदायाचा प्रसार केला, प्रचार केला. लोकांना कर्मकांडरूप वैदिक धर्माच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला.
हे असे करण्यापाठीमागे संतांची भूमिका लोकांना परमार्थमार्गात गोवण्याची नव्हती, तर लोकांना फसव्या परमार्थमार्गातून सोडवण्याची होती. पारलौकिक सुखाच्या भ्रमातून मुक्त करण्याची होती. लोकांना आत्मभान यावे, त्यांना आत्महिताची व आत्मसन्मानाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रपंच नीट करावा व लौकिक जीवन नीट जगावे, ही त्यांची अंतर्मनाची तळमळ होती. त्यासाठीच त्यांनी दैनंदिन कामकाज करताना नामस्मरण करावे आणि आचरण चांगले ठेवावे हा हितोपदेश केला, ही बाब खूप महत्त्वाची आहे.

वारकरी संप्रदायाचे मूळ मर्म सर्वसामान्य समाजाच्या लक्षात आले नाही. दुसरे म्हणजे काही आपमतलबी लोकांनी या संप्रदायाचा गैरफायदा घेतला. स्वतः चे पोट पोसण्यासाठी सांप्रदायिक विचारांची सोयीने मांडणी केली. पंढरपूरच्या बडव्यांनी विठ्ठलाला घेरले. विठ्ठलाचा ताबा मिळवला. त्यांनी तिथे दुकानदारी सुरू केली. श्रमिकांनी निर्माण केलेला देव श्रमिकांनाच विकण्याचे कृष्णकृत्य सुरू केले. विठ्ठलाच्या नावाने दक्षिणा घेऊन ते मस्तीत जगले. बडव्यांनी विवेक, माणुसकी आणि आत्मसन्मान यांपासून फारकत घेतली.

घरा वैकुंठ सगळें ।। (१८९५)

ढोंगी कीर्तनकार लोकांना सांगत असतात की ‘माणसाने सोनेही मातीसारखे समजावे. धनावर आशा ठेवू नये. लोभी असू नये. दानधर्म करावा.' लोकांना असे सांगणारे हे पाखंडी लोक स्वतः मात्र धनाचे लोभी असतात. कीर्तन केल्याचा मोबदला घेतात. जास्तीचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करतात. विशेष म्हणजे हे लोक स्वतः कधीच दानधर्म करत नसतात. अर्थात, दांभिक कीर्तनकारांनी आणि त्या दांभिक कीर्तनकारांच्या ढोंगाला भुलून त्यांना महाराज समजणाऱ्या भोळ्याभाबड्या लोकांनी संत तुकारामांचे वरील अभंग नीट समजून घ्यावेत. ढोंगी महाराजाची सेवा करू नये, त्यांचे कीर्तन ऐकू नये आणि तशा ढोंग्यांना पैसे देऊ नये. आपण सद्धर्म करत आहोत तेव्हा आपणास सद्गती मिळेल या भ्रमात राहून अधर्म करू नये नि आपल्या अधःपतनाला आपणच तथाकथित महाराजांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, भजनकऱ्यांनी खेड्यापाड्यांतल्या
गोरगरिबांना लुबाडले. या ढोंगी लोकांचे ऐकून परमार्थाच्या नादी लागलेल्या भोळ्याभाबड्या समाजाचे लौकिक जगणे नासले आणि नैतिक अध:पतन झाले. भोळेभाबडे लोक अर्धपोटी आणि अर्धनग्न अवस्थेत जगत राहिले. स्वतःला कीर्तनकार, महाराज, प्रवचनकार, भजनकरी, टाळकरी म्हणवून घेणारे दांभिक लोक गोरगरिबांच्या श्रमांवर जगत आले. फुकटचे खात राहिले. खात आहेत.  मुळात संतांनी भोळ्याभाबड्या लोकांच्या मुक्तीसाठीच या संप्रदायाची उभारणी केली होती. मात्र, या संप्रदायाची सूत्रे लोकांच्या हाती गेली आणि पुन्हा एक शोषणाचे नवे षड्यंत्र आकाराला आले. आपमतलबी कुटिल लोकांनी वारकरी संप्रदायाच्या आधाराने शोषणाचा नवा मार्ग निर्माण केला. विठ्ठलाच्या नावाने श्रद्धेचा बाजार भरवला. भोळ्याभाबड्या माणसांचे शोषण केले. त्यांच्या श्रद्धाभावाचा गैरफायदा घेतला.
जे ब्राह्मणी व्यवस्थेचे लाभधारक होते ते सामान्यतः जन्मजातीने ब्राह्मण होते. वर्णव्यवस्थेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन केले. कारण त्या व्यवस्थेत त्यांचे हित दडले होते. मात्र, खरी अधिसत्ता होती ती ब्राह्मणांच्या हाती. आपल्या अस्तित्वाला नि हिताला धक्का लागू नये म्हणून त्यांनी 'ब्राह्मणी व्यवस्था' जपण्याचा अतीव प्रयत्न केला. प्रसंगी ब्राह्मणांनी जन्मजातीने ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले. इतर संतांचा कमालीचा छळ केला. आणि वारकरी संप्रदाय 'हायजॅक' केला. जन्मजातीने ब्राह्मण असलेल्या संधिसाधू कीर्तनकारांनी व प्रवचनकारांनी संतांच्या समाजहितकारक विचारांना अनपेक्षित दिशा दिली.
बहुजन जातींतील संतांनी निर्माण केलेल्या या संप्रदायात स्वहिताची चांगली संधी आहे, हे लक्षात येताच जन्मजातीने बाह्मण असलेले अनेक जण वारकरी सांप्रदायिक झाले. कीर्तनकार व प्रवचनकार झाले. नव्याने त्यांनी त्यांची दुकानदारी सुरू केली. भोळाभाबडा समाज त्यांच्या डावपेचांचा बळी ठरला.
दुसरे म्हणजे खेड्यापाड्यांतून अन्य विविध जातींतील ढोंगी संत आणि भजनकरी निर्माण झाले. त्यांनीही स्वतःच्या पोटाची सोय लागावी म्हणून बहुजनांतील भोळ्याभाबड्या लोकांना लुबाडले. लोकांना निःस्वार्थतेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला. लोकांना दानाचे व दक्षिणेचे महत्त्व सागून त्यांनी लोकांकडून दान आणि दक्षिणा उकळली. या पोटार्थी लोकांनी वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाचा बाजार मांडला आहे. हे सगळे पूर्वीपासूनच होत आले आहे. त्या- त्या काळातल्या संतांनी या स्वार्थमूलक अनुचित प्रवृत्तींवर टीका केली आहे. आजही अनेक जण वारकरी असल्याचे ढोंग करत ऐतखाऊ जीवन जगत आहेत. हे सत्त्व गमावलेले व तत्त्वशून्य जीवन जगणारे लोक या संप्रदायाला बदनाम करत आहेत. संतांचेच अभंग आधाराला घेऊन कीर्तन करत आहेत, संतांनी सांगितलेला विचार आपल्या सोयीने लोकांना सांगत आहेत आणि आपला मतलब साधत. आता समाजाने सावध होणे, विवेकी होणे आणि संतांचे मूळ विचार काय आहेत ते नीट समजून घेणे व या संप्रदायाचे सत्त्व जपणे आवश्यक आहे.
थोडक्यात म्हणजे, वारकरी संप्रदायाची उभारणी जन्मजातीने ब्राह्मण असणाऱ्यांनी केली नाही, तर बहुजन जातींतील संतांनी केली आहे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या कचाट्यातून भोळ्याभाबड्या लोकांना सोडवणे हे संतांनी त्यांचे जीवनध्येय मानले होते. त्यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले. मात्र, झाले ते उलटेच. जे लोक जन्मजातीने ब्राह्मण होते आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे कट्टर विरोधक होते, त्यांनी या संप्रदायावर ताबा मिळवला. ब्राह्मणांनी स्वार्थासाठी स्वतःच्या मूळ भूमिकेला तिलांजली दिली

मराठी संशोधन पत्रिका / जाने.- फेब्रु.- मार्च २०२४
page ९६ to १०७